Sovereign Gold Bond: सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना; नेकमी काय आहे ही योजना? 

Sovereign Gold Bond दरवर्षी दुप्पट तिप्पट महागाईन त्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी सोन्याच्या किंमती ज्या वेगाने वाढत आहेत ते पाहून सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. तरी देखील लग्न, साखरपुडा अशा विविध कौटुंबिक सोहळ्यांसाठी सोने खरेदी करावीच लागते. म्हणूनच रिझर्व्ह बँकेने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरु केली आहे. या योजनेमार्फत नागरिकांना स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक संधी दिली जाते. काही कालावधीसाठी फक्त सोने बाँड खरेदीचा कालावधी ठेवला जातो आणि नागरिकांना RBI ने ठरवुन दिलेल्या  कालावधीतच हे बाँड खरेदी करायचे असतात.  आत्ताच फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्‍ड बॉन्‍ड योजनेची चौथी सीरिज संपली. Sovereign Gold Bond\

सॉव्हरिन गोल्ड बाँड या योजनेतंर्गत केंद्र सरकारमार्फत बाजारभावापेक्षा कमी किमतीत शुद्ध सोने विकले जाते.  या योजनेंतर्गत सोने खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करता येतंच, पण त्यासोबतच मोठा परतावाही मिळतो. केंद्र सरकारची योजना गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच, फायदेशीर आणि  उत्तम पर्याय ठरत आहे.  चला तर मग या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजने संदर्भात अधिक माहिती मिळवूया, म्हणजे पुढच्यावेळेस RBI ने बाँड खरेदीचा कालावधी जाहिर केल्यानंतर तुम्ही तत्काळ गोल्ड बाँड खरेदी करु शकाल. Sovereign Gold Bond

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना कधीपासून सुरु झाली?

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2015 सालापासून सुरू झाली.  Reserve bank of Indiaमार्फत हे गोल्ड बाँड खरेदीदारांना विकले जातात. ज्या बँकेत ग्राहकांचे बचत खाते  असते त्याच बँकेतूनही गोल्ड बाँड खरेदी करत येतात. Sovereign Gold Bond

काय आहे सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना?

सॉव्हरिन गोल्ड बाँड या योजनेअंतर्गत ग्राहक 6,263 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने खरेदी करू शकतात. सॉव्हरिन गोल्ड बाँडद्वारे, ग्राहकांना 24 कॅरेटच्या 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी सरकारकडून दिली जाते. हे बाँड आरबीआयने जारी केलेले असतात.  Sovereign Gold Bond

सॉव्हरिन गोल्ड बाँड  खरेदी करताना ऑनलाइन पेमेंट केल्यास सूट मिळते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा गोल्ड बाँड खरेदीचा कालावधी RBI मार्फत सुरु करण्यात आला, तेव्हा सरकारने एका ग्रॅमची किंमत 6,263 रुपये निश्चित केलेली होती. SGB ​​2023-24 मालिका IV ची इश्यू किंमत 6,263 रुपये होती. ऑनलाइन पेमेंट करून ग्राहक प्रत्येक ग्राम सोन्यामागे 50 रुपये वाचवू शकत होते. दरवर्षी ही रक्कम बदलत राहते. यावर्षी ऑनलाइन पेमेंट केल्यावर गोल्ड बाँडची किंमत 6,213 रुपये झाली. Sovereign Gold Bond Scheme 2024

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची मॅच्युरिटी किती वर्षांची असते?

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची मॅच्युरिटी  8 वर्षे आहे. गोल्ड बाँड खरेदी करुन ग्राहक 5 व्या वर्षी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. Sovereign Gold Bond

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेमध्ये किती व्याज मिळते?

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याज दिले जाते.  या बाँडच्या व्याजाचे पेमेंट दर 6 महिन्यांनी केले जाते.

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे जाणून घ्या

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे अनेक फायदे असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे गोल्ड बाँड आपल्या आर्थिक कमाईत भरच टाकत असतात. मग कोणते आहेत हे फायदे चला जाणून घेऊया. 

  • सॉव्हरिन गोल्ड बाँडचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यात खरेदी कर्त्यांला दुप्पट नफा मिळतो.
  • सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला बाजार दरानुसार पैसे मिळतात आणि दुसरे म्हणजे, ग्राहकांना 2.5% व्याज दिले जाते.
  • प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यानंतर त्याच्या खरेदीदाराल चोरी होण्याची भीती सतत बाळगावी लागते, परंतु  SGB मध्ये मालकाला सुरक्षेचा ताण घ्यावा लागत नाही.
  • इतर सोन्यावर 3% GST आकारला परंतु सॉव्हरिन गोल्ड बाँड वर कोणत्याही प्रकारचा GST आकारला जात नाही.
  • गुंतवणूकदारांनी ऑनलाइन पेमेंटद्वारे सॉव्हरिन गोल्ड बाँड खरेदी केल्यास, त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळते. Sovereign Gold Bond