Maharashtra Shikshak Bharti 2024 महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षे रखडलेला प्रश्न म्हणजे शिक्षक भरतीचा आता मार्गी लागताना दिसत आहे. आजतागायत अनेक तरुण तरुणी या संधीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असून अनेक इच्छूक अर्जदार या भरतीसाठी पात्र ठरतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. महाराष्ट्र राज्यभरातील जिल्हापरिषदेचे सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. यातच अंतर्गत तब्बल 16, 500 जागांवर मुलखात न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे. चला तर मग आपण महाराष्ट्रात होणाऱ्या या शिक्षक मेगाभरती बद्द्ल अधिक माहिती मिळवूया. तुमच्या परिचयात कोणी इच्छूक उमेदवार असल्यास तुम्ही ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत जरुर पोहोचवा. जेणेकरुन त्यांना अर्ज करताना या माहितीचा फायदाच होईल. Maharashtra Shikshak Bharti 2024
कोणत्या इयत्तांसाठी किती शिक्षक पदसंख्या भरली जाणार आहे?
महाराष्ट्र शासनाच्या विविध जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामिण भागात ही शिक्षक नियुक्ती होणार असून. 1 ली ते 12 पर्यंतच्या शासनाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरतीसाठी ही जाहिरात शासनाकडून देण्यात आली आहे. तरी आपण पुढे पाहू कि कोणत्या इयत्तांसाठी किती पदसंख्यांवर भरती केली जाणार आहे. या पदसंख्येबाबत माहिती घ्या वर तुम्ही कोणत्या इयत्तांसाठी अर्ज करणार आहात त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना महाराष्ट्र भर कोणत्याही जिल्ह्यात नियुक्त करण्यात येईल. ज्या जिल्ह्यात नियुक्ती दिली जाईल तेथे जाण्याची अर्जदाराची तयारी असावी.
- 1 ली ते 5वी साठी 10240 इतक्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
- 6वी ते 8वी च्या वर्गांसाठी 8127 इतक्या पदांवर शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
- 9वी ते 10वी च्या वर्गांसाठी 2176 इतक्या पदांवर शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
- 11वी ते 12वी च्या वर्गांसाठी 1135 उतक्या पदांवर शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
एकूण 21,678 इतक्या पदांवर महाराष्ट्रभर शिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे. Maharashtra Shikshak Bharti 2024
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
2024 मधील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर एकदा शिक्षक मेगा भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता समजून घ्या.
- अर्जदार D.ED किंवा B.ED केलेला असावा
- अर्जदाराने TAIT आणि TET या परीक्षा पास केलेल्या असाव्यात.
- अर्जदार कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून पदवीधर असावा
शिक्षक भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
- अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 37 वर्षे इतके असावे
- अर्जदार आरक्षित असल्यास 5 वर्षांची सूट ग्राह्य धरण्यात येईल. Maharashtra Shikshak Bharti 2024
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी अर्जपद्धती
महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 अंतर्गत अर्ज करायचा असल्यास तुम्ही Online पद्धतीने अर्ज करु शकता. पुढे तुम्हाला शिक्षक भरतीसंदर्भातील अधिकृत वेबसाईट आणि जाहिरातीच्या PDF संबंधील लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करुन तुम्ही जाहिरात पाहू शकता आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी अर्ज करा
शासनाची अधिकृत वेबसाईट – https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
शिक्षक भरती संबंधीत शासकीय जाहिरात PDF स्वरुपात पहायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/17619MxnXB7rik10kTbAAUXm2Qy7jPBGW/view
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी इच्छून अर्जदारांनी भरतीसंबंधीत जाहिरात वाचून घ्यावी. तसेच भरतीसंबंधीत शैक्षणित आर्हता सिद्ध करणारे कागदपत्र देखील सोबत ठेवावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असल्याने आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरुपात लागणार आहेत, कारण ते अर्ज करताना अपलोड करावे लागतील. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. जुनी मार्कशिट्स नसतील तर ती शासनाच्या वेबसाईटवर जाऊन मिळवावी. तसेच संबंधी कागदपत्रे सोबत ठेवावी. आधारकार्ड आणि मोबाईलनंबर लिंक केलेला असावा जेणेकरुन भरतीसंबंधीत एखादे नोटिफिकेशन आल्यास चुकणार नाही. Maharashtra Shikshak Bharti 2024