Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024: महावितरण मध्ये मेगाभरती, ‘विद्युत सहाय्यक’ पदाच्या 5347 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी

Mahavitaran vidyut sahayak Bharti

Mahavitaran vidyut sahayak Bharti मुंबई शहराचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील सुमारे 1 कोटी 86 लाख ग्राहकांना महावितरण कंपनी वीज पुरविते. यात सुमारे 1 कोटी 31 लाख घरगुती, 30 लाख शेतकरी ग्राहक, 13 लाख 46 हजार व्यवसायिक ग्राहक व 2 लाख 50 हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून सुमारे 33 हजार कोटी रुपयांचा महसूल महावितरणला कंपनीला दरवर्षी मिळतो.

सध्या महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक या पदासाठी पदभरती जाहिर केली आहे.  तब्बल 5347 इतक्या रिक्त पदांवर कार्यक्षम उमेद्वारांची भरती करण्यात येणार आहे.  आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून महावितरण मधील मेगा भरती संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुम्ही लेख संपूर्ण वाचा आणि इच्छूक असाल तर अप्लाय करा किंवा तुमच्या नातेसंबंधात किंवा मित्रमंडळीमध्ये कोणी इच्छूक असल्यास त्यांना हा लेख जरुर शेअर करायला विसरु नका.  Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत

महावितरण कंपनीने जाहिर केलेल्या विद्युत सहाय्यक पदासाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर आधी समजून घ्या की तुम्हाला ऑनलाई पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे. तसेच https://www.mahadiscom.in/en/home/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्ज भरु शकता.  किंवा पुढे  लेखामध्ये एक लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमचा अर्ज भरु शकता.

विद्युत सहाय्यक पदाअंतर्गत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत समजून घेऊ

महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या विद्युत सहाय्यक पदासाठी विविध प्रवर्गातील आरक्षित जागा असून आपण जाणून घेऊ की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

 • अनुसूचित जाती- 673 जागा
 • अनुसूचित जमाती – 491 जागा
 • विमुक्त जाती (अ) –  150 जागा
 • भटक्या जाती (ब) – 145 जागा
 • भटक्या जाती (क) – 196 जागा
 • भटक्या जाती (ड) – 108 जागा
 • विशेष मागास प्रवर्ग- 108 जागार
 • इतर मागास प्रवर्ग – 895 जागा
 • ईडब्ल्यूएस – 500 जागा
 • अराखीव- 2081 जागा

या सर्व जागा मिळून एकूण 5347 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

अर्जादाराची आवश्यक वयोमर्यादा

महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या विद्युत सहाय्यक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे पूर्ण ते 27 वर्षे इतकी असावी. म्हणजेच 18 ते 27 वर्षापर्यंतच उमेद्वार अर्ज करु शकतील.

अर्जदाराचे शिक्षण किती असावे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पुढील संबंधीत जाहिरात पहा

जाहिरात पहा

https://drive.google.com/file/d/1O2ExRf22Tr4xxR8TCgmrvyRTn1LhpVrl/view

परीक्षा शुल्क किती असेल?

महावितरण कंपनी मार्फत जाहिर करण्यास आलेल्या रिक्त पदांसाठी घेण्यास येणाऱ्या अर्जासोबत शुल्क देखील आकारला जाणार आहे. ही परीक्षा फी असेल. ती पुढील प्रमाणे

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
 • आर्थिकदृष्टया दुर्बल, मागासवर्गीय व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

अर्ज करण्याची अंतीम तारीख

महावितरण मधील पदांना अर्ज करण्याची अंतीम तारीख दिनांक 20 मार्च 2024 असल्याने इच्छूक उमेद्वारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

ही पहा जाहिरात

https://drive.google.com/file/d/1O2ExRf22Tr4xxR8TCgmrvyRTn1LhpVrl/view

येथे अर्ज करा

https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

महावितरण कंपनीसंदर्भातील अधिक माहिती

महाराष्ट्र सरकारच्या मालकीची असलेली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड MSEDCL ही कंपनी आहे. दि. 31 मे 2005 रोजी कंपनी अधिनियमानुसार त्यावेळी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना केल्यानंतर शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी महावितरण या  कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

महावितरण या कंपनीचे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विद्युत कायदा 2003 च्या कलम 14 नुसार डिम्ड डिस्ट्रीब्यूशन परवानाधारक म्हणून, शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा ऊभारण्याचे काम करत कंपनी महाराष्ट्रात कारभार सांभाळत आहे. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024