Manoj Jarange Patil: आता काहीच दिवसांत लोकसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आचार संहिता संपल्यानंतर लगेचच निवडणूकांच्या प्रचाराला सुरुवात होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वामध्ये जे मराठा समाजाच्या बाजूने बोलतील किंवा मराठी समाजाच्या बाजूने लढतील त्यांना मराठा समाजाने मते द्यावीत असा महत्त्वाचा निर्णय मराठा आरक्षणातील चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट् राज्याच्या लोकसंख्येच्या 28% मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे मराठा समाज कोणाला मत देतं आणि येणाऱ्या निवडणूकांमध्ये कोणाला निवडून आणतं हे पाहण्यासारखे आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा, Manoj Jarange Patil
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रंगणार युद्ध
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने युद्ध रंगणार आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या विजयी होऊ शकेल अशा नेत्यांना तिकिटे देऊन कामाला सुरवात केली आहे. परंतू सर्वच पक्षांचे मराठा आरक्षणातील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. कारण मनोज जरांगे यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मराठ्यांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. वेळी उपोषणे करुन, जीव धोक्यात घालून मराठ्यांच्या मागण्या महाराष्ट्र सरकारकडून मान्य करवून घेतल्या आहेत. Manoj Jarange Patil
सक्रिय राजकारणात उतरणार नाही
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला होता, आंबेडकर आणि जरांगे यांच्यात अंतरवाली सराटीत दीर्घ चर्चा देखील झाली. हा प्रस्ताव चांगला असला तरी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा आणि राजकारणात न येण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. परंतु त्यांनी असे देखील सांगितले की राजकारणाच्या बाहेर राहून देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करण्याची क्षमता मराठ्यांमध्ये आहे. Manoj Jarange Patil
राजकारणात बहुमताची गरज असते
सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं. तर राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. समाजकारण करताना एकमताला अधिक किंमत असते. तर राजकारणाला बहुमताची गरज असते, असं सूचक वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आंबेडकरांसोबत जायचे की नाही, यावर आज 30 मार्च रोजी जरांगे पाटील निर्णय जाहीर करतील.Manoj Jarange Patil
मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्यांना मत द्या!!
निवडणूकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी खूप महत्त्वाचे मत जाहीर केले आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला मराठ्यांनी मतदान करा. कार्यक्रम मात्र शंभरटक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाची आपल्याकडे मतं आहेत मग उमेदवार कोणीही असूदे, मराठ्यांसाठी काम करणाऱ्यालाच जींकवून द्यायचे हे मत ठाम ठेवा.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, “सात महिन्यांत मी मराठ्यांना एकदाही हरू दिलं नाही. राजकारणाच्या नादात मी माझी जात हरू देणार नाही. पण या आव्हानावर उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवारही देता येणार नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्याचया. कोणालाही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये ज्यांना पाडायचं त्यांना पाडा” असे खूप महत्त्वाचे मत त्यांनी मांडले आहे. Manoj Jarange Patil
मराठ्यांच्य नादी लागायचे नाही!!
“गेली 10 वर्षे मराठा समाजासाठी चळवळींचे आयोजन करताना आणि वैचारिक लढाया लढताना अनेकांनी मराठा समाजासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांना समजू दे की मराठ्यांच्या नाती लागल्यावर काय होऊ शकते” असा अप्रत्यक्ष इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाच्या मतदारांना दिला आहे. जो मराठी समाजाच्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीच्यांना पाडून टाका. तुमच्या-आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेच्या आहारी जाऊन निवडणुकांना सामोरे जाऊ नका. कोणालाही मतदान करा, पण तो निवडून येणारा उमेदवार मराठ्यांच्या सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.Manoj Jarange Patil