Mhada Lottery 2024: म्हाडाची लॉटरी तुम्हाला लागली का? असा तपासा म्हाडाचा निकाल

Mhada Lottery 2024 महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई मंडळाने 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा लॉटरी 2024 अंतर्गत 2,030 फ्लॅटच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. या सोडतीसाठी एकूण 1,13,811 अर्जदारांनी अर्ज केले होते. संगणकीकृत लॉटरीद्वारे निवडलेल्या विजेत्यांना आता प्रोव्हिजनल ऑफर लेटर्स (POL) दिले जातील, त्यानंतर ते पेमेंट करू शकतील.Mhada Lottery 2024

मुंबईत या भागात फ्लॅट आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये म्हाडा लॉटरीची घोषणा करण्यात आली. म्हाडाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लॉटरी IHLMS 2.0 (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम) अंतर्गत घेण्यात आली. हे स्वयंचलित पद्धतीने करण्यात आले आहे. म्हाडाने मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, विक्रोळी, मालाड, दादर आणि लोअर परळ अशा विविध भागातील 2030 सदनिकांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 9 ऑगस्ट 2024पासून सुरू करण्यात आली होती. जवळपास 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते.  त्याचा निकाल आज 8 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला आहे.Mhada Lottery 2024

हे फ्लॅट आहेत

या फ्लॅट्सपैकी 1,327 नवीन बांधकामाचा भाग आहेत, 370 फ्लॅट्स पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून बांधले जात आहेत. यापूर्वीच्या योजनांतर्गत ३३३ सदनिका देण्यात आल्या होत्या. लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी 359, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 सदनिकांचा समावेश होता.Mhada Lottery 2024

कुठे मिळणार घरे

म्हाडाने मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, विक्रोळी, मालाड, दादर आणि लोअर परळ अशा विविध भागातील 2030 सदनिकांची ऑनलाइन लॉटरी जाहीर केली आहे. त्यामध्ये तुम्ही घरासाठी अर्ज भरला असेल आणि लॉटरीचा निकाल तुम्ही लाईव्ह बघितला नसेल तर तुम्ही पुढील पद्धतीने तुम्हाला घर मिळाले आहे की नाही याची खातरजमा करु शकता. Mhada Lottery 2024

घर मिळालं की नाही ते असे तपासा

सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात आले होते. परंतु  काही नागरिकांना कामानिमित्त थेट प्रक्षेपण बघता आलेले नसेल तर तुम्ही सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in  या वेबसाईटवर पाहू शकणार आहात. ही यादी 8 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबतच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही माहिती देखील दिली जाण्याती ऑनलाईन प्रक्रिया सेट करण्यात आली आहे. Mumbai MHADA Lottery 2024

म्हाडा ही शासकीय संस्था कशा पद्धतीने काम करते? जाणून घ्या

1976 च्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियमांतर्गत 1977 मध्ये  म्हाडा किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण संस्थेती स्थापना करण्यात आली.  ही संस्था विविध गृहनिर्माण योजनांतर्गत निवासी घरांच्या बांधकामांचे काम करते. म्हाडाने दिलेली पहिली कमी किमतीची गृहनिर्माण योजना 2012 मध्ये सुरू करण्यात आली होती.  ज्यामध्ये मुंबईतील 2593 सदनिका लॉटरी ड्रॉ पद्धतीने देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून अशाच योजना जाहीर केल्या जात आहेत. म्हाडाच्या लॉटरी योजनेंतर्गत, ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग), एलआयजी (कमी उत्पन्न गट), एमआयजी (मध्यम उत्पन्न गट), आणि एचआयजी (उच्च उत्पन्न गट) मधील लोकांना दरवर्षी विशिष्ट भागात कमी किमतीची घरे दिली जातात.  Mhada Lottery 2024

म्हाडा मुंबई विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईतील घरे  आणि येथील राहणीमान अत्यंत महाग असून घरांच्या किंमती दिवसागणिक वाढत जात असल्याने सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर जाऊ लागल्या आहेत.  सर्व उत्पन्न गटांसाठी, विशेषत: EWS आणि LIG विभागातील घरे परवडणारी घरे बनवण्यासाठी म्हाडाची लॉटरी योजना सुरू करण्यात आली. समाज या योजनेमुळे लोकांना मुंबई आणि पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरात मालमत्ता खरेदी करण्याची मुभा मिळते जी खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी ऑफर केलेल्या किमतीपेक्षा खूपच कमी असते. Mhada Lottery 2024