MPSC Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, खरं पाहिलं तर शासकीय नोकरी ही आजही लाखो तरुणांचं स्वप्न आहे. अशातच जर ती नोकरी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि कृषि क्षेत्राशी संबंधित असेल, तर या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणता येईल. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे ‘सहायक आयुक्त पशुसंवर्धन’ या पदासाठी तब्बल 311 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Recruitment 2025) पार पाडण्यात येणार आहे.
भरतीची सविस्तर माहिती
राज्यभरातील सर्वच इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही नोकरी म्हणजे केवळ उत्तम पगाराची हमी नसून, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्यासाठीची उत्तम संधी आहे. या भरतीतून मिळणाऱ्या सहायक आयुक्त पदासाठी दरमहा सुमारे ₹60,000 इतकं आकर्षक वेतन सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे ही सरकारी (Maharashtra government jobs) नोकरी सर्व इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.
- भरती विभाग: ही भरती कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे.
- भरतीचे माध्यम: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) (MPSC Group A Vacancy)
- पदाचे नाव: सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, गट-अ
- एकूण पदसंख्या: एकूण 311 पदांवर भरती होणार आहे.
- शेवटची अर्जाची तारीख: या भरतीसाठी अर्ज करण्याची 9 जून 2025 ही अंतिम तारीख असणार आहे.
- अर्ज पद्धत: या भरती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
आवश्यक पात्रता काय आहे?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर (Postgraduate) पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराने शासकीय विभाग, महामंडळ किंवा स्थानिक संस्थेमध्ये किमान पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असावा. वर दिल्या गेलेल्या अनुभवाशिवाय उमेदवाराची पात्रता अपूर्ण समजली जाईल.
वयोमर्यादा
- सर्वसामान्य प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असणार आहे.
- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे असणार आहे.
नोकरीचं स्थान
या भरती अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर (Agriculture Department Bharti 2025) या पदांसाठीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची ग्रामीण भागापासून ते शहरी विभागांपर्यंत कुठेही काम करण्याची तयारी असणं आवश्यक असणार आहे. पण याचा फायदा म्हणजे असा की उमेदवारांना वेगवेगळ्या भागांचा अनुभव आणि सर्व स्तरांवर समाजासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करताना तुम्ही शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, जातीचा दाखला (जर लागू असेल तर), पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी असलेली कागदपत्रे तयार ठेवावी.
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक खालीलप्रमाणे आहे
अधिकृत जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/1xUCB7_ldBs6fBhP5Z6sjfAvmvSb2fY8K/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
मित्रांनो, ही केवळ एक सरकारी भरती नसून, तुमच्या आयुष्याला नवा आकार देणारी संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल, तुमच्याकडे योग्य तो अनुभव असेल, आणि समाजासाठी काम करण्याची तुमची इच्छा असेल, तर ही संधी वाया जाऊ देऊ नका. आजच अर्ज करा.