MPSC veterinary officer vacancy: पशुपालकांची आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सेवा अधिक प्रभावी आणि तत्पर व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार द्वारे एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. नुकतीच पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांच्या भरतीची घोषणा झाल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली असून, या अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त या संवर्गातील ३११ पदांसाठीची भरती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.
ही भरती केवळ पदांची संख्या वाढवण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यासाठी करण्यात येणार आहे. ही संधी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो पशुपालकांसाठी एक नवा आशेचा किरणच ठरणार आहे.
भरतीची पार्श्वभूमी
राज्यातील पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांना आवश्यक सेवा मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. आणि आता याच पार्श्वभूमीवर, हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २,७९५ पदांनंतर आता सहायक आयुक्त पदासाठी ३११ जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
भरतीची महत्त्वाची माहिती
- पदाचे नाव: सहायक आयुक्त, पशुसंवर्धन (गट-अ)
- एकूण जागा: ३११
- शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन यामध्ये पदवी
- वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल)
- वेतनश्रेणी: ₹६०,००० ते ₹१,९०,८००/-
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० जून २०२५
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (mpsc.gov.in)
भरतीचे महत्त्व
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ग्रामीण भागातील पशुपालकांना अधिक चांगल्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे. नवीन अधिकारी नियुक्त झाल्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि पशुसंवर्धन क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील.
पंकजा मुंडेंचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय
राज्याच्या पशुसंवर्धन (MPSC veterinary officer vacancy) मंत्री पंकजा मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली असून विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं असल्यामुळे ग्रामीण भागात सेवा पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या अडथळ्यांना दूर करण्यासाठी त्यांनी एकामागोमाग एक निर्णय घेतले आणि सगळ्यात आधी पशुधन विकास अधिकारी पदांची मागणी आणि आता सहाय्यक आयुक्त पदांच्या भरतीसाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला असल्याचं दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) अधिकृत मागणीपत्रही पाठवण्यात आलं आहे. एमपीएससीने भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, २० जून २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Online Facilities” विभागात “Online Application System” निवडून नवीन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सादर करावा.
अर्ज शुल्क
- सामान्य प्रवर्ग: ₹७१९/-
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹४४९/-
ग्रामीण भागात कामाला येणार वेग
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाला नवे अधिकारी मिळणार असून, या अधिकाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी, लसीकरण, उपचार, आणि इतर सेवा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळणार आहेत.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात सांगितले की, ही भरती म्हणजे ग्रामीण भागात परिवर्तन घडवणारी एक सुरुवात आहे. विभागाला संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून शेतकऱ्यांना योग्य सेवा देण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.