Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form पहा असा आहे ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा फॉर्म; या 12 गोष्टी भरणे आहे आवश्यक.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहिण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील योजना पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 जुले 2024 पासून या योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु झाली असून ठिकठिकाणी सेतू केंद्रांवर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून योजनेचा अर्ज अर्जदार महिलांकडून भरुन घेतला जात आहे. असे असताना अजूनही काही महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांच्यासाठी आम्ही हा ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा अर्ज घेऊन आलो आहोत.  आमच्या लेखाच्या माध्यमातून तुम्ही अर्ज डाऊनलोड देखील करु शकणार आहात.

कोणकोणत्या गोष्टी अर्जात नमूद करण्यात आल्या आहेत?

महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहिण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी शासनाने अर्ज जाहीर केला आहे. या अर्जामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिलेचे नाव विचारण्यात आले आहे. त्यानंतर लग्नापुर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव. जन्मतारीख, अर्जदार महिलेचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक या सर्व गोष्टी नमूद करणे अपेक्षित आहे.

या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे, कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? असेल तर अर्जामध्ये हो  असे उत्तर  लिहावे लागेल.  अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती देणे बंधनकारक आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

अर्जदार महिलेच्या बँकेचा तपशील

अर्जामध्ये  महिलेच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती आणि बँक खाते क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. बँक अकाऊंट आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे की नाही? हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

अर्ज कोणाकडून तपासून घ्यायचा आहे?

लाडकी बहिण योजनेचा भरलेला अर्ज अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यापैकी कोणाकडूनही  तपासून घेतला जाऊ शकतो. तसेच यापैकी कोणाकडून अर्ज तपासून घेतला आहे हे अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

अर्ज डाऊनलोड करा

खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही माजी लाडकी बहिण योजनेचा अर्ज डाऊनलोड करु शकता. हा अर्ज भरुन वर सांगितल्याप्राणे सेतू केंद्रात सबमीट करावा. त्यासोबत पुढे सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

https://drive.google.com/file/d/1LGdcBSwHrFeQttw3CAyC-pykJJH0wXfP/view

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचे अधिवास\जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेचे हमीपत्र
  • अर्जदार महिलेचे  बॅंक पासबुक
  • अर्जदार महिलेचा फोटो

भरलेला अर्ज येथे जमा करा

अर्जदार महिलेने ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी भरलेला अर्ज नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे. तसेच सेतू सुविधा केंद्रावरही हा अर्ज जमा करता येईल. यासाठी राज्यभर सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीही शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे.

सेतू केंद्र महिलांकडून फी आकारु शकत नाही

अर्ज तपासून सबमीट करण्यासाठी सेतू केंद्र किंवा तहसिलदार कार्यालयात महिलांकडून कोणत्याही प्रकारीच फी आकारली जाणार नाही. फॉर्म भरण्यासाठी किंवा तपासून देण्यासाठी शासनाने नेमून दिलेले कर्मचारी अर्जदार महिलांकडून कोणत्याही प्रकारे पैसे मागत असतील तर त्याची तक्रार तत्काळ करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश गृहमंत्रालयाला दिले आहेत. सेतू केंद्रातून अर्जदार महिलांकडून पैशांची मागणी झाल्यास सेतू केंद्रांचे परवाने रद्द केला जाणार आहेत. शासन या कामासाठी प्रत्येक अर्जामागे 50 रुपये कर्मचाऱ्यांना देत आहे. या व्यतिरिक्त अर्ज भरण्याची, तपासण्याची जबाबदारी दिलेले अधिकारी, कर्मचारी तुमच्याकडे पैसे मागत असतील तर तुम्ही तत्काळ त्यांच्या विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे.