mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; बेरोजगार तरुणांना मिळणार प्रशिक्षण घेण्यासाठी 6 ते 10 हजार रुपये प्रती महिना

महाराष्ट्रभर सध्या माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरु आहे. राज्यातील गरजू महिलांना दर महिना 1500 रुपये शासन देणार आहे. या योजनेसाठी महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहे. या योजनेची चर्चा होत असताना असेही म्हटले जात होते की राज्यातील तरुणांसाठी देखील शासकीय योजना आखली जावी अशी नागरिकांकडून मागणी होत असताना आता शासनामार्फत बेरोजगार तरुणांसाठी नव्याने योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे या योजनेचे नाव असून आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून या योजनेची संपूर्ण माहिती मिळवणार आहोत. mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण पुरवून योग्य त्या नोकऱ्यांमध्ये नियुक्त करणे किंवा प्रशिक्षित तरुणांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे उद्दिष्ट आहे की राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे प्रशिक्षण देणे आणि विविध कंपन्यांसबोत टायअप करुन त्या त्या कंपन्यांमध्ये या प्रशिक्षित तरुणांची नेमणूक करणे. जेणेकरुन राज्यातील तरुणांना नोकरी मिळेल किंवा प्रशिक्षण घेऊन ते स्वतःचा व्यवसाय तरी करु शकतील. mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024

शिक्षणाप्रमाणे प्रशिक्षणासाठी मिळणार मानधन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करुन लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे शिक्षण पूर्ण असेल तसे विविध व्यवसायाचे किंवा विविध उद्योगांमधील तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील मानधन शासन देणार आहे. त्यानंतर हे मानधन प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांचे नोकरी मिळेपर्यंत सुरु राहील. चला तर पाहूया कोणाला किती मानधन मिळणार आहे.  

  • 12 वी पास बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासाठी 6000 रुपये प्रती महिना शासन देणार आहे.
  • आयटीआय, पदविका प्राप्त बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासाठी 8000 रुपये प्रती महिना शासन देणार आहे.
  • पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासाठी 10,000 रुपये प्रती महिना शासन देणार आहे. mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024

योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
  • बँक खात्याचे तपशील
  • जे शिक्षण पूर्ण आहे त्याचे प्रमाणपत्र

अर्जदाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्जदार इयत्ता 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावा
  • अर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

येथे पहा योजनेसंबंधित शासन निर्णय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर झाली. त्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसंबंधीत शासन निर्णय पाहू शकता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf

या योजनेसाठी कोण अर्ज करु शकेल?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. मगच या योजनेचा लाभ उमेदवाराला घेता येणार आहे. mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024

येथे करा योजनेसाठी अर्ज

प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला प्रशिक्षणासाठी ठरलेली रक्कम जमा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास संबंधित प्रशिक्षणार्थीला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही.असे देखील योजनेच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे फक्त पैसे मिळवून चालणार नाही, तर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून योग्यरित्या प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. mukhyamantri yuva kary prashikhsan yojna 2024