Namo Shettale Abhiyan: “नमो शेततळे” या अभियानाद्वारे मागेल त्याला शेततळे! जाणून घ्या सविस्तर!

Namo Shettale Abhiyan

Namo Shettale Abhiyan: महाराष्ट्रातील सुमारे ८२ टक्के जमीन ही कोरडवाहू आहे आणि ही जमीन पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. राज्यातील विविध भागात होत असणारे पावसाचे असमान वितरण आणि पाऊस पडण्यात निर्माण होणारे मोठ मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक समस्यांवर मात करण्यासाठी शेतावर शेततळे यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जलसाठा वाढवणे, तसेच पाण्याची साठवण करून ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे. शेतीला पूरक म्हणून मत्स्य व्यवसायासारखे शेतीशी संबंधित व्यवसाय उभारणे आणि यासाठी शेततळ्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्रोत्साहन देण्यासाठी नमो शेततळे हे अभियान सरकार द्वारे राबविण्यात येत आहे.
Namo Shettale Abhiyan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त 11 दिवसांच्या राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नमो शेततळे अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट महाराष्ट्रात 7300 नवीन शेततळे उभारण्याचे आहे आणि शेतकऱ्यांसाठी याचा नक्कीच आश्वासक फायदा होणार आहे.

मागेल त्याला शेततळे या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने अंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या शेततळ्यांचा समावेश हा नवीन शेततळे म्हणजेच नमो शेततळे (Namo Shettale Abhiyan) यामधे करण्यात येईल. हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने अंतर्गत कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध असणाऱ्या निधीद्वारे राबविण्यात येईल. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेने निश्चित केलेली मार्गदर्शक तत्त्वे या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी कायम राहतील.

नमो शेततळे मोहिमेचे फायदे काय आहेत | What are the benefits of Namo Farms campaign? |
शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर पाणी पुरवठा उपलब्ध असेल.
शेतकऱ्यांना वर्षभर सतत सिंचन सुविधा उपलब्ध असेल.
शेतकऱ्यांसाठी विविध पीके घेता येणार.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली जाईल.

शेततळे बांधकामासाठी लाभार्थ्यांना लागू असलेल्या अटी | Namo Shettale Abhiyan
1. लाभार्थी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाने शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या नियुक्त ठिकाणीच शेततळे बांधणे आवश्यक असणार आहे.
2. शेततळे बांधण्याचे आदेश प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत शेततळे बांधण्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
3. लाभार्थी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत किंवा अन्य बँकेतील त्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित कृषी सहायक किंवा कृषी सेवकांना पासबुकच्या झेरॉक्ससह देणे आवश्यक आहे.
4. कामासाठी कोणतेही आगाऊ पैसे दिले जाणार नाहीत.
5. शेततळ्याची देखभाल आणि वेळेवर दुरुस्तीसाठी लाभार्थी जबाबदार असणार आहेत.
6. लाभार्थ्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही किंवा गाळ साठून राहणार नाही.
7. शेततळे पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतारावर त्याबद्दलची नोंदणी करणे आवश्यक आहे.
8. लाभार्थ्यांना शेततळे पूर्ण झाल्यावर स्वखर्चाने शेततळे योजनेचा बोर्ड लावावा लागणार आहे..
9. शेताच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी झाडांची लागवड करणे अनिवार्य असणार आहे.
10. नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्याच्या नुकसानीसाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. लाभार्थी शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
11. इनलेट आणि आउटलेट नसलेल्या लाभार्थ्यांनी शेतात पाणी उचलून टाळणे आणि इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. गरज पडल्यास प्लॅस्टिकच्या अस्तराचा खर्चही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावा. Namo Shettale Abhiyan

शेततळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Namo Shettale Abhiyan
जमिनीचा 7/12 उतारा
8-A प्रमाणपत्र
दारिद्र्यरेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारसा प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया | Namo Shettale Abhiyan
1. शेततळे अनुदान योजना साठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक शेतकरी महा-ई-सेवा केंद्र तालुका कृषी अधिकारी या ठिकाणाहून अर्ज प्राप्त करू शकतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी विहित केलेला अर्ज भरणे आवश्यक आहे.

2. मागेल त्याला शेततळे या योजनेसंबंधित अर्ज हे [https://aaplesarkar.maharashtra.gov.in](https://aaplesarkar.maharashtra.gov.in) या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन अर्जाच्या पावतीची प्रत आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे.

योजनेशी संबंधित महत्त्वाच्या वेबसाइट्स | Namo Shettale Abhiyan

मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेची अधिकृत वेबसाइट: [https://aaplesarkar.maharashtra.gov.in](https://aaplesarkar.maharashtra.gov.in)

लॉग इन करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी, या वेबसाईट वर क्लिक करा: [egs.mahaonline.gov.in/Login/Login](egs.mahaonline.gov.in/Login/Login) Namo Shettale Abhiyan