Nari Shakti App Download Maharashtra: थेट या App वरून करा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज.. फॉलो करा या स्टेप्स..

Nari Shakti App Download Maharashtra: तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभांसाठी ऑनलाइन अर्ज करायचे असल्यास, सरकारने, नारी शक्ती दूत हे ॲप तुमच्यासाठी लाँच केले आहे. आता तुम्ही घरी बसूनच हे ॲप डाउनलोड करू शकता आणि माझी लाडकी बहिन योजनेसाठी या द्वारे ऑनलाइन अर्ज सुद्धा करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करता येणार आहे.

माझी लाडकी बहिन योजनेसाठी नारी शक्ती ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते आता आम्ही तुम्हाला प्रत्येक स्टेप द्वारे समजावून सांगणार आहोत.

असा भरा नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज | Apply online from Nari Shakti Doot App

स्टेप 1:
सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store वरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करून घ्या. हे ॲप लॉन्च केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर “Welcome to the Nari Shakti Doot app” असे लिहिलेले दिसेल.

स्टेप 2:
यानंतर, तीन स्लाइड्स पुढे जा आणि डन या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्लाइडवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंतर I accept या ऑप्शन वर क्लिक करून लॉगिन च्या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 3:
लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला या ॲपवर तुमच प्रोफाइल तयार करायच आहे. याठिकाणी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, सोबतच तालुका देखील निवडायचा आहे. मग तुम्हाला तुमचे प्रोफाइल अपडेट करून योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4:
पुढे, माझी लाडकी बहिण, या योजनेचे हमीपत्र डाउनलोड करून घ्या. मग तुम्ही मुख्य पृष्ठावर या. तेथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे बटण दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

स्टेप ५:
नंतर येथे महिलेचे नाव टाकावे लागेल, त्यानंतर महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडावी लागेल. जन्मतारीख निवडताना, अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असल्याची खात्री करा.

स्टेप 6:
यानंतर, तुम्हाला पुढील गोष्ट करावी लागेल ती म्हणजे जिल्हा, शहर/नगर निवडणे. तुमची स्थानिक स्वराज्य संस्था देखील निवडा. नंतर पिन कोड आणि तुमचा पत्ता प्रविष्ट करा. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील इथे टाकावा लागेल.

स्टेप 7:
तुम्हाला इतर सरकारी कार्यक्रमांचा लाभ होतोय का हे देखील विचारले जाईल. लाभ मिळत असल्यास होय क्लिक करा. नसल्यास, नाही वर क्लिक करा.

स्टेप 8:
नंतर तुमचे बँक तपशील प्रविष्ट करा. या सोबतच तुमचा बँक खाते नंबर आणि IFSC कोड देखील टाका.

स्टेप 9:
तुम्हाला काही कागदपत्रे त्यानंतर अपलोड करावी लागणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, निवासस्थान किंवा जन्म प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड आणि पासबुक यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो सुद्धा जोडावा लागेल.

स्टेप 10:
नंतर तुम्हाला accept हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवर खूण करायची आहे. त्यानंतर “सबमिट इन्फॉर्मेशन” या पर्यायावर क्लिक करा. आणि शेवटी तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

सरकारच्या नवीन निर्णयानुसार माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यास अपात्र असलेल्या महीला | Eligibility criteria for mukhyamantri Ladki Bahin Yojana

ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते आहेत त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र आहेत.

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून काम करत आहेत, सरकारी विभाग, कॉर्पोरेशन, सरकारी परिषद किंवा राज्य सरकारांच्या स्थानिक संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत किंवा ज्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत आहे ते देखील सहभागी होऊ शकत नाहीत.

अशा महिला लाभार्थी ज्यांनी इतर सरकारी विभागांमार्फत राबविलेल्या आर्थिक योजनेतून 1,500 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेतला आहे त्या महिलाही अपात्र ठरतील.

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार आहेत किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत अशा महिला देखील अपात्र असतील.

कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर व्यतिरिक्त) असलेल्या महिला देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. Nari Shakti App