online packing job घरबसल्या पॅकींग  व्यवासाय करुन महिना 15 ते 20 हजार कमवा

online packing job

online packing job:- 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकजण बेरोजगार झाले. कित्येकांना शहरातील राहती घरे सोडून ग्रामिण भागात असलेल्या त्यांच्या मुळ घरी परतावे लागले. या सगळ्याचा सर्वात जास्त प्रमाणात वाईट परिणाम झाला तो गृहिणींच्या जीवनावर. कारण संपूर्ण दिवसभर मुले आणि कुटुंबियांसाठी जेवण बनवण्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. स्वतःसाठी वेळ देणे किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टी शिकणे हे त्यांना करताच येत नव्हते. आर्थिक संकटांमधून अनेकांना जावे लागले.

कोरोना संकटानंतर एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे work from home ही संकल्पना भारतात रुजू होऊ लागली. सुरुवातीला कमी प्रमाणात घरातून काम करण्याची मुभा देणाऱ्या कंपन्या कालांतराने त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करा अशी पूर्ण स्वातंत्र्या देऊ लागल्या. तसेच इतर व्यावसायांमध्ये महिलांना पुरुषांना ऑनलाईन पद्धतीने काम करण्याच्या संधी निर्माण झाल्या.  त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे घरातून पॅकेजींक करण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय सध्या घरातून काम करु इच्छिणाऱ्या महिला परुषांना आत्मनिर्भर होण्यासाठी उपयोगी पडत आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घरातून पॅकेजींगचे काम करण्याच्या काही आयडीया, आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यांचा वापर करुन तुम्ही महिना 15 हजार ते 20 हजार कमाऊ शकता.

पॅकेजींगच्या कामाच्या काही संकल्पना – packaging work idea

      या पोस्टच्या माध्यमातून आम्ही पॅकेजींग व्यवसायातील काही संकल्पना तुम्हाला सांगणार आहोत ज्यांच्या वापर करुन तुम्ही महिना 15 ते 20 हजार आरामात कमाऊ शकता.

मसाला पॅकेजींगचे काम –   Spice packaging work

मसाला उद्योग हा भारतातील सर्वात मोठा लघुउद्योग समजला जातो. तुम्ही महाराष्ट्राच्या  कोणत्याही खेड्यापाड्यात राहत असाल तरी तुम्ही तिथे राहून हा व्यवसाय करु शकता. तुम्ही राहत असलेल्या नजदीकच्या मोठ्या मार्केटमध्ये जाऊन तेथील मसाला विक्रेत्यांना तुम्ही विचारु तुम्ही मसाल्याच्या प्रकारांप्रमाणे त्यांचे 1/2/5 किलोप्रमाणे पॅकेट्स बनवण्याचे काम घेऊ शकता. तसेच मसाल्याचे पदार्थ देखील विकत आणून त्याचे छोटे छोटे पॅकेट्स बनवून स्वतंत्र व्यवसाय करु शकता. या व्यवसायातू खूप नफा असतो कारण मसाला हा वर्षाचे बाराही महिने लागणारा पदार्थ आहे. तसेच हॉटेलिंग व्यवसायात तर मसाल्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही राहत असलेल्या जवळच्यात 10 ते 12 हॉटेल्सची यादी बनवून सुरुवातील त्यांना मसाला पुरविण्याचे कंत्राट देखील घेऊ शकता. अशावेळी बाजारातून घाऊन पद्धतीने मसाला खरेदी करुन तो हॉटेल्सला विकून तुम्ही नफा कमाऊ शकता.

सुकामेवा पॅकेजींगचे काम – dried fruit packaging work

सुकामेवा शरीरासाठी अत्यंत पोषक असतो. त्यामुळे लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच सुकामेवा दैनिक आहारात घेणे अत्यंत लाभकारक असते. तुम्ही सुकामेवा विक्रेत्यांना संपर्क करुन त्यांच्याकडून सुकामेव्याचे पॅकेजींगचे काम घेऊ शकता तसेच घाऊन बाजारातून सुकामेवा विकत आणून तो छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये भरुन दुप्पट किंमतीने विकू शकता. सध्या diet आणि जीमचे फॅड वाढत चालले आहे अशावेळी तुमच्या आजूबाजूच्याGym सोबत संपर्क करुन तुमचा व्यवसाय वाढवू शकता. 

online packing job स्वतःचे गिफ्ट शॉप सुरु करा – Gift Shop

गिफ्ट शॉपी हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. तसेच हा व्यवसाय वर्षातील बारा महीने चालणारा व्यवसाय आहे. अलीकडे एखाद्या नातेवाईकाचा, मित्राचा, कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा नातेवाईकातील लहान मुलांचा वाढदिवस असेल तर खूप सारे नव नवीन गिफ्ट्स दिले जातात.गिफ्ट पॅकिंग करते वेळी गिफ्टचे आकर्षक पॅकिंग सर्वांचे लक्ष वेधून घेते त्यामुळे gift packing करणे ही एक कला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करून या व्यवसायातून महिना एक fix income मिळवू शकता व यातून घरी बसून पॅकिंग काम सुद्धा मिळवू शकता.

पूजेचे व सणाचे साहित्य पॅकिंग काम  (worship and festival materials packing)

महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती ही सणांची आहे. येथे अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. यामध्ये गौरी गणपती पूजन असेल, महालक्ष्मी व्रत असेल, सोमवारचे शंकराचे व्रत असेल, नवरात्री उत्सव असेल, तुलसी पूजन असेल, एकादशी असेल, वारी असेल, दिंडी असेल, देवीची यात्रा असेल, सत्य नारायण पुजा असेल तर अशा विविध प्रकाराच्या पूजनाला अनेक प्रकारचे साहित्य लागते ज्यामध्ये अगरबती, कुंकू, हळद, पेढे, मिठाई, फळे, पाने, ताट, नारळ असे साहित्य महत्वाचे असते तर असे वेगवेगळ्या सणाला आवश्यक असणारे पूजनाचे साहित्य एकत्र करून व्यवस्थित पॅकेट मध्ये पॅक करून तुम्ही बाजारामध्ये विकू शकता.

पापड पॅकिंगचे काम  (Papad packing work)

महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये देखील पापड हा घरघुती व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणावर चालतो.  जेवणाबरोबर सॅलडच्या रूपात लोक सध्या वेग वेगळ्या प्रकारचे पापड खाणे पसंद करू लागले आहेत. त्यामुळे पापड बनवणार्‍या छोट्या उद्योगांना सुगीचे दिवस आले आहेत.सध्या घरगुती काम करणार्‍या महिला तांदळाचे पापड, उडीदाचे पापड, बटाट्याचे पापड, ज्वारीचे पापड, साबूदाण्याचे पापड तयार करून ते छोट्या छोट्या पॅकेट मध्ये पॅक करून त्यावर वजनानुसार किंमत छापून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. पापड विक्रीतुन महिला आर्थिकरित्या खूप सक्षम झाल्या आहेत.

Online packing job : घरबसल्या सुरू करा पॅकिंगचे काम आणि घरबसल्या करा ऑनलाईन कमाई! 

Online packing job

Online packing job आजचे युग हे ऑनलाईन युग आहे. आज आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करतो. प्रत्येक सुविधा आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे. सकाळच्या चहापासून तर किराणा, कपडे, जेवण अशा अनेक दैनंदिन महत्त्वाच्या गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो. त्याचबरोबर बिल भरणे, बँकेची कामे अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आज ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या शक्य झाले आहे. इतक्या गोष्टी घरबसल्या शक्य असताना आपला स्वतःचा व्यवसाय आपण घरबसल्या करून नक्कीच करू शकतो.

     शिवाय, सगळे बिल भरणं, बैंकेची सर्व कामे या सारखी आणखीही किती तरी महत्त्वाची कामं जर का आपल्याला घरी बसल्या करता येत असतील, तर आपण आपला स्वतः चा घरी बसून व्यवसाय का नाही करु शकत? पण घरी बसून ऑनलाईन व्यवसाय करायचा तरी कोणता? हा मोठा प्रश्न येतो  त्यामुळे आजच्या या लेखात जाणून घेऊया घरबसल्या पॅकिंगचे काम करून कसे ऑनलाईन पैसे कमवायचे.

     जर तुम्हाला घरबसल्या पॅकिंगचे काम Online packing job करून ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी एक बिझनेस प्लॅन आहे. ज्यामध्ये केवळ एक वेळ गुंतवणूक करून घरी बसल्या तेव्हा पॅकिंगचे काम करून कमाई करता येऊ शकते.

    पॅकिंगचे काम करणे कोणासाठी कठीण काम नाही. तुम्हाला पॅकिंगचे काम करायचे असेल तर काम फार सोपे आहे. त्यातून तुम्ही चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात. जर यासाठी तुम्हाला पॅकिंग मशीन ची देखील आवश्यकता लागेल.

    सर्वप्रथम तुम्ही सुकामेवा म्हणजे काजू, बदाम, बेदाणे, चिरंजी यांसारखा सुका मेवा जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो, त्यांची किंमत देखील खूप जास्त असते. जर तुम्हाला पॅकिंग व्यवसाय सुरू करून कमाई करायची असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पॅकिंग व्यवसाय सुरू करून कमाई करू शकतात.

संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.