Personal Lone मिळवा… या २५ बँकांकडून सर्वात स्वस्त दरात वैयक्तित कर्ज मिळवा

Personal Loan घेणे म्हणजे अनेक जणांना संकट ओढवण्यासारखे वाटते. कारण त्यावर भरमसाठ व्याज ( Interest Rate) द्यावे लागते. पण अडी-अडचणीला पर्सनल लोनच्या मदतीने अनेक कामे सोपी होतात. पर्सनल लोन अवघ्या काही तासात मिळते. काही वित्तीय संस्थांचे अॅपवर अवघ्या काही मिनिटात वैयक्तिक कर्ज दिले जाते.  या कर्जासाठी जादा कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण होते. लग्नकार्य, घराची डागडुजी, क्रेडिट कार्डचे बिल चुकते करणे तसेच वैयक्तिक कामासाठी अनेक जण पर्सनल लोन घेतात.

तुम्हाला Personal lone  देऊ शकणाऱ्या भारतात कार्यरत असलेल्या 25 बँकांची यादी पुढील प्रमाणे

क्र.बँकेचे नावइंड्रेस्ट रेटप्रोसेसिंग फी
HDFC Bank10.5% p.a. – 21.00% p.a. 2.50%
ICICI Bank 10.50% p.a. – 16.00% p.a. 2.50%
Yes Bank 10.99% p.a. – 20% p.a. 2% 
Axis Bank 10.49% p.a.- 22% p.a. 2%
Kotak Mahindra Bank 10.99%3% 
IndusInd Bank 10.25% p.a. – 26% p.a. 3%
Tata Capital 10.99%3.5% 
Bank of India 10.25%2% 
State Bank of India 11.05% p.a. – 14.05% p.a. 1.50% 
१०Karnataka Bank 12% and 17%  बँकेच्या नियमाप्रमाणे 
११Aditya Birla Capital 14% p.a. -26% p.a. 2% 
१२Bank of Baroda 10.90% p.a. – 18.25% p.a. 2% 
१३IDBI Bank 10.50% p.a. – 13.25% p.a. बँकेच्या नियमाप्रमाणे 
१४South Indian Bank 13.1% p.a. – 20.6% p.a. 2% 
१५City Union Bank बँकेच्या नियमाप्रमाणे 1.00%
१६Ujjiyan Small Finance Bank बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेच्या नियमाप्रमाणे 
१७Bank of India 10.25%2% 
१८Karur Vysya Bank 10.75% p.a. – 13.75% p.a. 0.50%
१९J&K Bank 12.40% p.a. – 13.40% p.a. 1%
२०Punjab National Bank 11.40% p.a.  1.00% 
२१Bank of Maharashtra 10.00% p.a.1% 
२२Central Bank of India 12.00% p.a. – 12.75% p.a. 1% 
२३RBL Bank 14% p.a. – 23% p.a. 3.5% 
२४IndusInd Bank 10.25% p.a. – 26% p.a. 3% 
२५Federal Bank 11.49% p.a. – 14.49% p.a. बँकेच्या नियमाप्रमाणे 

 Personal lone देणाऱ्या बँकांचे व्याजदर का जास्त का असतात?

Personal lone देणाऱ्या बँका अगदी कमी कागदपत्रांवर तुम्हाला कर्ज पुरवतात. म्हणजे केवायसीच्या फार बागुलबुवा न करता, कुठलीही हमी नसताना, हमीदार नसताना बँक कर्ज पुरवठा करते. म्हणजे बँक वैयक्तिक कर्जामध्ये अधिक रिस्क घेत असते. हा बँकेसाठी एक जुगार असतो. कारण सर्वचजण वेळेवर कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका देत असलेल्या वैयरक्ति कर्जावर जादा व्याजदर आकारतात. ते त्यांच्या आमदनीचे देखील एक साधन असतो.

Personal lone मिळविण्यासाठी पुढील कागदपत्रे तयार ठेवा

Personal lone मिळविण्यासाठी  अर्जदाराला काही कागदपत्रांची तरतूद करावी लागते. ती पुढीलप्रमाणे.

  • तुम्ही नोकरदार असाल तर वेतनाचा तपशील
  •  राहत्या ठिकाणाचा पुरावा
  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  बँक स्टेटमेंट
  •  फोटो

Personal lone मिळविण्यासाठी क्रेडीट स्कोअर चांगला असणे महत्त्वाचे

क्रेडिट स्कोर म्हणजेच तुमच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास. क्रेडिट स्कोअर Credit score चांगला  असेल तर वैयक्तिक कर्जावरील व्याज कमी होतो. जादा क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँका व्याजदर कमी आकारतात. तसेच त्यांना जादा कर्ज मिळू शकते. क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड बिल, कर्जावरील ईएमआय आणि इतर कर्ज वेळेवर चुकते करणे अर्जदाराला भविष्यात वैयक्तिक कर्ज मिळवताना फायद्याचे ठरते.

सॅलरी अकाऊंटचा वापर तुम्ही नोकरदार असाल तर कर्ज घेताना सॅलरी अकाऊंटचा वापर करणे आवश्यक आहे. तुमची सॅलरी हिस्ट्री पाहून बंका कर्ज देतात. त्यामुळे बँकांना तुमच्यावर विश्वास वाढतो. बँका तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देतात.