PF Advance Claim प्रत्येक कर्मचाऱ्याचे भविष्य आर्थिक सुरक्षित असावे यासाठी Employees Provident Fund (EPF) ही कल्याणकारी योजना शासनाने सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्याने सेवा सोडल्यानंतर आर्थिक लाभ देणारा हा एक मार्ग आहे. हा निधी जमा करुन त्याचे योग्य नियोजन करणारी संस्थेला Employees Provident Fund Organisation म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना स्थापन करण्यात आली आहे. यामध्येच प्रत्येत कर्मचाऱ्याचे पीएफ खाते असते. याबाबत शासनाने कर्मचाऱ्यांच्या सोयीचा एक निर्णय जाहिर केला आहे. त्याबद्दल आपण आपल्या या लेखात सविस्तर माहिती मिळविणार आहोत. PF Advance Claim
पीएफमधून ऍडव्हान्स पैसे काढणे झाले सोपे
एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढण्यासाठी याआधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. म्हणूनच Employees Provident Fund Organisation या संघटनेने त्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संस्थेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पिएफमधील पैले लवकर मिळवावे यासाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे. यामार्फत कर्मचारी चक्क 3 दिवसांत पैसे काढू शकणार आहेत. याआधी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून ऍडव्हान्स पैसे काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागत असत. भलिष्य निर्वाह निधी संघटनेच्या या निर्णयामुळे तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ॲडव्हान्स क्लेमची मर्यादा वाढला
भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांच्या नियमांमध्ये बदल करुन पीएफ खात्यातील ॲडव्हान्स क्लेमची मर्यादा वाढवली आहे. नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यामधून केवळ 3 दिवसांत 1 लाखापर्यंतची रक्कम काढता येणार आहे. याआधी मात्र कर्मचाऱ्यांना फक्त 50 हजारांची रक्कमच त्यांच्या पीएफ खात्यातून ऍडव्हान्स म्हणून मिळवता येत होती. PF Advance Claim
पेन्शन खात्यात आगाऊ पैसे काढण्याची मान्यता कोणाला आहे?
भविष्य निर्वाह निधीच्या ऑटो क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया एप्रिल 2020 म्हणजे करोना काळत निर्माण झालेल्या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत सुरू करण्यात आली होती, पण त्या वेळी केवळ वैद्यकीय कारणांमुळेच लोकांना आगाऊ पैसे काढण्याची परवानगी होती. परंतु आता मात्रत्र भविष्य निर्वाह निधी मंडळाने घर खरेदी, लग्न किंवा कौटुंबिक सोहळा अशा कारणांसाठी आगाऊ पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. मंडळाच्या या बदललेल्या नियमांमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सुटणार आहे. हे मात्र नक्की.
पीएफओ खात्यातून पैसे काढण्यासाठी कागदपत्रे
कर्मचारी भविष्य निधी संगठन मंत्रालयामार्फत करण्यात आलेल्या बदलामुळे कर्मचाऱी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. संस्थेने सुरु केलेल्या ऑटो सेटलमेंट मोडद्वारे आगाऊ निधी काढताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. फक्त त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे दाखवण्याची गरज असेल. त्यामध्ये KYC, दाव्याच्या अर्जाची पात्रता, बँक खात्याचा तपशील आवशयक आहे. PF Advance Claim
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया How to Claim PF Advance
- कर्मचारी भविष्य निधी संघठन या वेबसाईटला भेट द्या https://unifiedportal-emp.epfindia.gov.in/epfo/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता
- सर्वप्रथम UAN आणि पासवर्डद्वारे EPFO पोर्टलवर लॉगिन करा.
- त्यानंतर ऑनलाइन सेवांवर जाऊन ‘क्लेम’ विभाग निवडावा
- ऑनलाइन दावा करण्यासाठी Next बटणावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन झाल्यावर तुम्हाला PF Advance Form 31 हा पर्याय निवडा आणि तुमचे पीएफ खाते निवडा.
- पैसे काढण्याचे कारण, रक्कम आणि पत्ता भरा.
- तुमच्या बँकेचा चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा. त्यामध्ये तुमचा बँक खाते क्रमांक आणि इतर तपशील असणे आवश्यक आहे.
- तुमची संमती मागितली जाईल त्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत पडताळणी केली जाईल.
अशापद्धतीने तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधील पैसे आगाऊ मिळवू शकणार आहात. आणि ही रक्कम वाढवून शासनाने 1 लाख रुपये इतकी केली आहे. PF Advance Claim