Kharip season subsidy 2023: सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची तारीख झाली जाहीर, खरीप हंगाम 2023

Kharip season subsidy 2023 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत ठरावीक पिकांसाठी अनुदान देण्यात येते, हे अनुदान हंगाम कोणता आहे त्यानुसार ठरत असते. तसेच खरीप हंगामातील 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. त्यामुळे विशिष्ट भागातील शेतकऱ्यांना ठरावीक प्रकारचे पिक घेण्यात मदत व्हावी यासाठी राज्य शासनाचा हा उपक्रम आहे. चला तर मग 2023 मध्ये जाहीर झालेल्या खरीप हंगामातील अनुदान वितरणाची तारीख काय? अनुदानाची रक्कम देखील किती?  या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवूया.  

अनुदानाची रक्कम

महाराष्ट्र राज्य शासनाने ईपीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 ते 10,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान खरीप हंगाम 2023  मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. या अनुदानाचे वितरण 21 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. याबद्दल 29 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहिर करण्यात आला होता. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की,  शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT (Direct Benefit Transfer) च्या मदतीने जमा केले जाणार आहे. Kharip season subsidy 2023

सामूहिक क्षेत्र धारक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रक्रिया

सामूहिक क्षेत्र धारक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रक्रिया राज्य शासनाने जाहिर केली आहे.  राज्य शासनाने सामुहिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याच्या नावाचे सहमती पत्र आणि त्यांचा आधार कार्ड सोबतच संमतीपत्र मागवण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत.  खरीप 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणाच्या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या यादीत झालेल्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे नवीन यादी जाहिर करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन आणि तांत्रिक त्रुटी Kharip season subsidy 2023

जमाबंदी आयुक्तांनी ईपीक पाहणी करुन झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या राज्य कृषी विभागाला दिल्या होत्या.  परंतु अनेक पात्र ठरु शकतील अशा  शेतकऱ्यांची नावे या यादीतून गायब असल्याचे आढळले. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवला. या प्रकरणात काही कृषी विभागातील सहायकांना शेतकऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करण्याचे  प्रकार घडले.  कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी वर्गाने या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी झालेला घोष दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणे तात्पुरते थांबविण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ईपीक पाहणीची नोंद असून देखील त्यांची नावे यादीतून वगळली गेली होती, त्यांच्या नावांची दुरुस्ती करून नव्या याद्या लवकरच जाहीर करण्यात  येतील असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले Kharip season subsidy 2023

अनुदान वितरणाची तारीख झाली जाहीर

शेवटी जुलैमध्ये शासन निर्णय काढून महाराष्ट्र सरकारने असे जाहीर केले की, 23 ऑगस्ट 2024 पासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु केली जाईल.  ज्या पात्र शेतकऱ्यांचा डेटा कृषी विभागाकडे जमा आहे त्यांना पहिल्याच टप्प्यात अनुदान वितरण करण्यात येईल.  खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान प्रक्रियेसाठी  4,192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचेच वितरण आता 21 ऑगस्ट पासून सुरु झाले आहे. Kharip season subsidy 2023

निधी कमी पडण्याची शक्यता

खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस चे उत्पादन घेणाऱ्या आणि ईपीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असून शासनाने जाहीर केलेला 4,192 कोटी रुपयांचा निधी कमी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Kharip season subsidy 2023 

हंगाम निहाय अनुदानाच शेतकऱ्यांना फायदा

पावसाळ्या जी पिके घेतली जातात त्यांना खरीप हंगामातील पिके असे म्हटले जाते. जून ते ऑक्टोबर दरम्याने ही पिके घेतली जातात. राज्य शासनांतर्गत जाहिर होणाऱ्या या हंगाम निहाय अनुदानाचा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या देखभालीसाठी, बि बियाणे खरेदीसाठी हातात पैसे येतात. परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळीच जमा होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.