Pik Vima Yojana 2023: एक रुपयात पीक विम्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत! रब्बी हंगाम, गहू, हरभरा, कांदा आणि इतर पिकांचाही या योजनेत समावेश!

Pik Vima Yojana 2023

Pik Vima Yojana 2023 प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 साठी पिक विमा योजना एक रुपयात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिरायती ज्वारी पिकांचे कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर आणि असून गहू लागवड आणि हरभरा पिकांसाठी पीक विम्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर पर्यंतची आहे.

खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही सरकार विम्याचा हप्ता भरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयाचा पीक विमा मिळू शकेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यावर्षी किमान एक लाख शेतकरी खातेदार या योजनेमधे सहभागी होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास रब्बी पिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाते. यंदा जमिनीत ओलावा नसल्याने लागवड मंदावली आहे, मात्र यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग हा पूर्णपणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. वैयक्तिक कुळानुसार शेती करणारे किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत गहू, हरभरा, कांदा आणि इतर पिकांचा देखील समावेश आहे. Pik Vima Yojana 2023

या वर्षापासून, राज्याचे शासन शेतकरी हिस्सा भरणा करणार आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे, शेतकरी केवळ एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतो. या वर्षासाठी जोखीम पातळी 70 टक्के ठेवण्यात आली आहे. मृत व्यक्तीचा विमा काढल्यास हा प्रस्ताव रद्द करण्यात येईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

पिकानुसार रब्बी हंगामासाठी मुदत दिली गेली आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांनी गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी 14 डिसेंबरपर्यंत विमा काढला पाहिजे. उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्चपर्यंत पीक विमा काढता येणार आहे. शेतकऱ्यांनी यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. Pik Vima Yojana 2023

Pik Vima Yojana 2023 पेरणी आणि काढणी दरम्यानच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज पडणे, भूस्खलन, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, विशिष्ट भागात पूर येणे, भूस्खलन, दुष्काळ, पर्जन्यवृष्टीचा अभाव, पिकांचे होणारे नुकसान इत्यादींमुळे शेतीचे उत्पादन कमी होण्याचा धोका या सगळ्या गोष्टींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यातील गहू, ज्वारी आणि हरभरा बागायती या पिकांना लागू करण्यात आली आहे.

यावेळी सरकारने जोखमीची व्याप्ती वाढवली | government increased the scope of the risk | Pik Vima Yojana 2023

पेरणी आणि काढणी दरम्यानच्या कालावधीत घटलेले पीक उत्पादन, पेरणीपूर्व पीक उत्पादनाच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान, तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस, कापणी आणि काढणीनंतर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

बाधित पीक किंवा बाधित क्षेत्रात अशी काही घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला त्याबाबत कळवणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर कंपनी पंचनामा करेल. सामूहिक सेवा केंद्राच्या प्रमुखाच्या विनंतीनुसार 1 रुपया भरून कोणीही विमा योजनेत सहभागी होऊ शकतो. या रकमेपेक्षा जास्त मागणी केली गेली असल्यास त्वरित जवळच्या कृषी विभागाला कळवावे.

शेतकऱ्यांनी हा विमा लवकरात लवकर काढला पाहिजे | take out this insurance as soon as possible

रब्बी हंगामात फक्त एक रुपयात नोंदणी करता येणार आहे. 15 डिसेंबर ही या योजनेमधे सहभागी होण्याची अंतिम मुदत असल्याची सांगितलं जात आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. Pik Vima Yojana 202306:58 PM