Poultry Farm Subsidy: पोल्ट्री व्यवसाय सुरू करा आणि 50% सबसिडी मिळवा

Poultry Farm Subsidy

Poultry Farm Subsidy: कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी जोडधंदा असणं गरजेचं आहे. जोडधंदा शेतकऱ्यांना सुरू करण्यासाठी अनेक शेतकरी सक्षम नसतात. तसेच शेतकऱ्यांना कोणता जोडधंदा करावा हे देखील समजत नाही.‌ आम्ही तुम्हाला खास जोडधंदा सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला भरघोस अनुदान देत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना योजनेमार्फत थेट आर्थिक मदत करण्यात येते तर काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. जर आपण शेतीला असलेल्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करून शेतकरी चांगला पैसा कमवू शकतात.

Poultry Farm Buisness Plan
कुक्कुटपालन व्यवसायासाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. यामध्ये केंद्र सरकारची एक योजना आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचा विचार केला तर यामध्ये राष्ट्रीय पाळीव पशु कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 50% अनुदानावर 50 लाख रुपये कर्ज दिले जाते.

तुम्ही म्हणाल यामध्ये 50 टक्के अनुदानासारखे काय आहे? शेतकरी बांधवांनो, 50% सबसिडी मिळते म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाखाचे कर्ज घेतले तर तुम्हाला 25 लाख रुपये परत करावे लागतील. यामधील 25 लाख रुपये हे शासन परत करेल. तुम्हाला 25 लाख संबंधित बॅंकेत दोन हप्त्यांत जमावे करावे लागतील.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? (Kukut Palan Yojana 2023 Maharashtra)
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत ज्या काही संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी तुम्ही कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून अर्ज करू शकता.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) मतदार ओळखपत्र
4) सविस्तर प्रकल्प अहवाल
5) ज्या जागेवर तुम्हाला पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करायचा आहे त्या जागेचा फोटो
6) ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक
7) रहिवासी दाखला
8) आवश्यक असणारे फॉर्म
9) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
10) कौशल्य प्रमाणपत्र
11) स्कॅन केलेले सही

पोल्ट्री फार्म करिता अर्ज कसा करायचा? (Poultry Farm Loan)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. याकरिता सरकारने खास पोर्टल तयार केले असून त्याचे नाव आहे राष्ट्रीय पाळीव पशु मिशन पोर्टल म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन पोर्टल हे आहे. ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे आहे, त्या व्यक्तीकडे कमीत कमी 1 एकर जमीन असणं आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल तर तुम्ही लिजवर घेतलेल्या जमिनीवर देखील कर्ज घेऊ शकतात. परंतु, या पद्धतीने तुम्ही जर कर्ज घेतले तर स्वत: तुम्ही आणि जमिनीचा मालक यांच्या नावावर कर्ज दिले जाते. यासाठी तुम्हाला पोल्ट्री फार्म व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणं आवश्यक राहील.

अर्ज करताना ही काळजी घ्या (Poultry Farm Scheme in Maharashtra)
जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) येतो. तुम्हाला नेमके किती कर्जाची आवश्यकता आहे, याबाबत अर्ज भरत असताना नमूद करावे. अर्ज करण्यापूर्वी आपली सगळी कागदपत्रे नीट तपासून घ्यावी. तसेच प्रकल्प अहवाल खूप महत्त्वाचा असून यामध्ये तुमच्या व्यवसायाचे सर्व अहवाल नमूद करणं आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी संपर्क कुठे साधावा लागेल? (Kukut Palan Yojana in Marathi)
ही योजना केंद्र सरकार जरी राबवत असेल तरी देखील ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकार नोडल एजन्सी म्हणून काम करते. ऑनलाईन अर्ज केला तरी तुमचे अर्ज याच नोडल एजन्सीव्दारे बॅंकेपर्यंत पोहचविले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.