PM Kusum Yojana Maharashtra Online Apply कुसुम सोलर पंप योजना 2023 अशाप्रकारे अर्ज केला तरच दखल घेतली जाईल

PM Kusum Yojana Maharashtra Online Apply

कुसुम सोलर पंप महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | महाउर्जा कुसुम योजना | PM Kusum Yojana Maharashtra Online Apply | कुसुम योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती मराठी | कुसुम सौर कृषी पंप योजना | कुसुम योजना महाराष्ट्र | सोलर पंप योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे.  शेतकऱ्यांना विविध योजनांसह बळकट करण्यासाठी वीज दर सवलती देण्यात येतात शेतकऱ्यांना अधिक बळकट करण्यासाठी, केंद्रीय अनुदान, राज्य अनुदान आणि लाभार्थी वाटा लक्षात घेऊन कुसुम महाभियानची प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इव्हेट उत्थान महाभियान (PM KUSUM) अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना पुढील पद्धतीने केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सोलार पंप बसविण्यासाठी अनुदार देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्र सरकारकडून 30 टक्के, राज्य सरकारकडून 30  टक्के आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्यात जवळपास संपूर्ण वीजनिर्मिती औष्णिक पद्धतीने निर्माण केली जात आहे, त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवामानावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपदा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे, या सर्व महत्वपूर्ण कारणांमुळे पर्यावरण पूरक तसेच दीर्घकालीन उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा उर्जा निर्मितीसाठी वापर करणे हि काळाची गरज झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास घडून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक योजना सुरु केल्या आहेत. अपारंपरिक उर्जा स्त्रोतांमध्ये सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर स्वरूपाचा आणि महत्वपूर्ण आहे.

कुसुम योजना महाराष्ट्र राज्यस्तरीय सुकाणू समिती  

या अभियानाची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येत आहे, या अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार अभियानात सुधारणा आणि आवश्यक बदल करण्याचे अधिकार सदर समितीस राहतील.

कुसुम सौर पंप योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये 3814 विना पारेषण कृषी पंप आस्थापन केले जातील. ज्याच्यामुळे  शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • याशिवाय शेतकरी स्वखर्चाने इतर उपकरण जोडू शकणार आहेत.
  • कृषी पंपाच्या किमतीच्या 10 टक्के सर्वसाधारण वर्गातील शेतकर्‍यांना आणि 5 टक्के हिस्सा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना राहणार आहे.
  • शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार अर्ज केल्यानंतर 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सौरपंप उपलब्ध होतील.

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्जदाराची पात्रता

  • कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत स्व-गुंतवणुकीद्वारे प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता नाही.
  • अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु कृषी पंप वाटप न झालेले लाभार्थी या अभियानांतर्गत पात्र राहतील
  • अर्जदार त्याच्या जमिनीनुसार किंवा वितरण महामंडळाने ठरवून दिलेल्या किंवा निश्चित केलेल्या नियमानुसार 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्जदार कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अर्ज करू शकतात.

       कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र 2023 अभियानांतर्गत, पुढील पाच वर्षात पाच लाख नॉन ट्रान्समिशन सौर कृषी पंप बसविण्यास आणि पहिल्या वर्षात एक लाख नॉन ट्रांसमिशन सौर कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्याचे  केंद्र सरकारने राज्य सरकारांना आदेश दिले आहेत.  ऊर्जा विकास एजन्सीमार्फत अर्जदारांच्या ऑनलाइन अर्जाद्वारे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही योजना लागू केली  जात आहे. https://www.mahaurja.com/meda/ ही  कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे. येथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करु शकता.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमीनीच्या आकारानुसार सोलार पंप अनुदान पुरविले जाणार आहेत, या संबंधी अधिक जाणून घेऊ.

  • ज्या शेतकऱ्याची जमीन 2.5 एकर आहे त्याला  3 एचपी चा सौर ऊर्जा पंप अनुदान देण्यात येणार आहे.
  • ज्या शेचतकऱ्याची जमीन 5 एकर आहे त्याला 5 एचपी चा सौर ऊर्जा पंप  अनुदान देण्यात येणार आहे.
  • अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 7.5 एचपी डीसी पंप अनुदान देण्यात येणार आहे,

कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत महत्त्वाच्या सुचना

  • ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी पाण्याचा शाश्वत स्त्रोत आहे, याची खात्री महाऊर्जाव्दारे करण्यात येईल, तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या सौर कृषी पंपाची आवश्यकता आहे, असे शेतकरी 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचा कृषी पंप आस्थापित करू शकतात, परंतु ते 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र असतील, उर्वरित अधिकची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरणे  आवश्यक राहील.
  • सौर कृषी पंपाद्वारे उपलब्ध होणाऱ्या विजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलरचा वापर करता येईल. मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित लाभार्थ्याने करणे आवश्यक राहील.