scam Bank loan on your name: तुमच्या नकळत  कोणी तुमच्या नावावर बँकेचे कर्ज तर घेतलेले नाही ना? सतर्क रहा! आजच तपासा

scam Bank loan on your name

scam Bank loan on your name : सध्याचे राहणीमान इतके खर्चिक आणि कर्जांसाठी सुविधाजनक झाले आहे की, प्रत्येकजण कधी ना कधी आणि कुठे ना कुठे कर्ज घेतच असतो. पहिल्यांदा कर्ज मिळविण्यासाठी बँकांमधअये येरझाऱ्या माराव्या लागात पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही कोणलाही वैयक्तिक कर्ज हवे असल्यास ते सहज ऑनलाईन पद्धतीने मिळते. अगदी कमी कागदपत्रांमध्ये देखील हल्ली कर्ज मिळवती येते.  काही काही ठिकाणी तर कर्ज देण्यासाठी काही खाजगी संस्था चांगला सिबिल स्कोअर सुद्धा असण्याची गरज नाही असे नमूद करतात, दिलेल्या कर्जावर व्याज मात्र भरमसाठ लावतात.

हल्ली मोबाईल अॅप्सद्वारे, एसएमएसद्वारे किंवा मोबाइल फोनवर पाठवलेल्या लिंकद्वारे वारंवार कर्जासीच्या जाहिराती दिल्या जातात. यावेळी आपल्याकडून आपली  वैयक्तिक माहिती नकळत समोरच्या व्यक्तीला दिली जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि इतर कागदपत्रे या कर्जांवर किंवा त्यांच्या लिंकवर क्लिक करून नकळत जरी दिल्या गेल्या तरी या सर्व कागदपत्रांचा गैरवापर करुन एखादी व्यक्ती आपल्या नावावर कर्ज मिळवू शकते.  म्हणून अशा ऑलाईन कर्ज देणाऱ्या अॅप्सद्वारे पैसे घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच बँक शाखेद्वारे अर्ज करण्याची शिफारस केली जाते. आपली महत्त्वाची कागदपत्रे योग्य व्यक्तीच्या हातात दिली आहेत की नाही याची खात्री करणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे. कर्ज घोटाळ्यांना बळी पडू नये म्हणून सावध आणि जागरुक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

scam Bank loan on your name कोणत्याही शासकीय – अशासकीय योजनेसाठी किंवा बँकेत कागदपत्रे देताना घ्या काळजी

हल्ली विविध शासकीय अशासकीय योजना जाहीर केल्या जातात,  त्यासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड मागीतले जाते. अशावेळी अनोळखी कंपनीकडून किंवा एखाद्या ऑलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काळजी घ्या. भविष्यात समोरच्याकडून आपल्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही यासाठी आपणच काळजी घेणे गरजेचे असते. Bank loan Document

तुम्ही काढलेल्या करर्जाचे बाकी हप्ते वेळोवेळी तपासत रहा  Bank loan installment

तुम्ही एखाद्या  बँकेकडून कर्ज घेतले आसेल आणि तुम्हाला जो इएमआय भरावी लागतोय  त्याबाबत बँकेशी थेट संपर्क करुन किती हप्ते भरले आहेत आणि किती हप्ते भरायचे बाकी आहेत याबद्दल चौकशी करा. उर्वरित व्याजाची रक्कम याबाबत योग्य माहिती मिळेपर्यंत ठाम रहा.

cibil score म्हणजेच क्रेडिट स्कोर वेळोवेळी तपासत रहा.

तुम्ही एखादे कर्ज घेतले किंवा एखादी वस्तू इएमआय वर खरेदी केली या सर्व तपशिलाचा एक स्कोअर जनरेट होतो. म्हणजे सिबिल स्कोअर आपल्याला ऑनलाईन पाहता येतो. यावेळी तुम्ही तुमच्या कर्जाचे इएमआय़ वेळोवेळी पूर्ण भरत असाल आणि तरीही तुमचा क्रेडीट स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. अशावेळी तुम्ही तत्काळ तुमच्य बँकेशी संपर्क करा आणि याबद्दल विचारणआ करा. तुम्ही समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत तुम्ही ठाम रहा. कारण तुम्ही जर तुमचे आर्थिक व्यवहार नीट करीत असाल, घेतलेल्या कर्जाचे इएमआय वेळोवेळी भरत असाल तर नक्कीच तुम्ही सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असायला हवा म्हणजेच चांगला सिबिल स्कोअर तुम्ही मेंटेन केलेला आहे. मग अशावेळी नक्कीच त्यापेक्षा कमी सिबिल स्कोअर असेल तर कदाचित तुमच्या बँक नावावर कोणीतरी कर्ज घेतले असावे, याबाबत तुम्ही सायबर सेलकडे विचारणा करु शकता.

      सध्या ऑनलाईन पद्धीतने असे गैरव्यवहार किंवा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे कर्ज घेणे हे काही कठीण राहिलेले नाही. कागदपत्रांचा गैरवापर आणि बनावट सही बनवून अशी कामे करणाऱ्या अनेक टोळ्या राज्या राज्यात काम करीत आहेत. आता अशावेळी एकच गोष्ट आपण करु शकतो की आपली महत्त्वाची कागदपत्रे ही कोणत्याही अपरिचित किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागणार नाहीत यासाठी आपण खबरदारी बाळगू शकतो.