
Railway Recruitment 2025: भारतीय रेल्वेत नोकरी मिळणे हे आजच्या घSडीला लाखो तरुणांच स्वप्न आहे. स्थिर नोकरी, चांगला पगार, भत्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरीतील सुरक्षितता यामुळे रेल्वेच्या भरतीला नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. अशातच भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC Bharti Maharashtra) कडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना समान संधी दिली जात असून, एकूण 8868 जागांवर ही भरती होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
ही भरती कोणत्या जाहिरात क्रमांकांतर्गत आहे?
ही भरती दोन वेगवेगळ्या जाहिरात क्रमांकांतर्गत जाहीर करण्यात आली आहे. CEN No. 06/2025 या क्रमांकाच्या अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी भरती होणार आहे, ज्यात स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यांसारखी महत्त्वाची पदे उपलब्ध असणार आहेत. या पदांसाठी पदवी असणे आवश्यक आहे आणि काही पदांसाठी संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगचे कौशल्य असणे देखील बंधनकारक आहे.
याचबरोबर, CEN No. 07/2025 या क्रमांकाच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी देखील मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क यांसारखी पदे उपलब्ध आहेत. असे असले तरीही या पदांतर्गत पात्र असण्यासाठी उमेदवाराला बारावीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. यातीलही काही पदांसाठी संगणक टायपिंग सुद्धा आवश्यक आहे.
CEN No. 06/2025 अंतर्गत पदवीधर पदांसाठी उपलब्ध पदे
या गटातील पदांमध्ये केवळ पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी उपलब्ध असलेली काही मुख्य पदे खालीलप्रमाणे आहेत,
- स्टेशन मास्टर: 615 जागा
- गुड्स ट्रेन मॅनेजर: 3416 जागा
- चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर: 161 जागा
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट: 921 जागा
- सिनियर क्लर्क (Railway Clerk Recruitment) कम टायपिस्ट: 638 जागा
या पदांवर भरती होण्यासाठी संगणकावर टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
CEN No. 07/2025 अंतर्गत बारावी उत्तीर्ण पदांसाठी उपलब्ध पदे
या गटात 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी दिली आहे:
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क: 2424 जागा
- अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट: 394 जागा
- ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट: 163 जागा
- ट्रेन्स क्लर्क: 77 जागा
यासाठी 12वी (12th Pass Government Jobs India) मध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत.
वयोमर्यादा
ही भरती 18 ते 33 वयोगटातील उमेदवारांसाठी खुली करण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजेच ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा सर्वसामान्य पार्श्वभूमीतील तरुणांसाठी सुद्धा ही संधी खुली आहे.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क हे ₹500 आहे. तर महिला, अनुसूचित जाती/जमाती, एक्स-सर्व्हिसमन, ट्रान्सजेंडर आणि आर्थिक दुर्बल गटातील उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त ₹250 असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे परीक्षेला हजर झाल्यानंतर या शुल्काचा काही भाग उमेदवारांना परत मिळण्याचीही शक्यता आहे.
नोकरीचे ठिकाण
उमेदवारांची निवड झाल्यानंतर भारतातील कोणत्याही रेल्वे झोनमध्ये (Railway Jobs for Graduates) त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये काम करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवावी.
अर्ज कसा करायचा?
या भरतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतातील कोणत्याही रेल्वे झोनमध्ये नियुक्ती मिळू शकते. म्हणजेच देशातील विविध शहरांत काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. रेल्वे सेवेत काम करताना सुरक्षित भविष्यासोबत, निवास, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ते, पदोन्नतीच्या संधी अशा अनेक सुविधा मिळतात. त्यामुळे ही नोकरी फक्त उत्पन्नाचा स्रोत नसून तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे, फोटो, सही तसेच वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा. पदवीधर पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025, तर बारावी उत्तीर्ण पदांसाठी (Indian Railway Vacancy 2025) अर्जाची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.