Tatkal ticket booking tips: असं मिळवा कन्फर्म ट्रेन तिकीट, घाई-गडबड न करता आधी फक्त हे एक काम करा… 

Tatkal ticket booking tips: ट्रेन तिकीट बुक करताना एक मोठी समस्या अनेकांना भेडसावते आणि ती म्हणजे कन्फर्म तिकीट मिळत नाही. आपण कितीही तयारी केली, ट्रेन आधीच शोधून ठेवली, इंटरनेटची स्पीड फास्ट असेल, तरी बुकिंगच्या क्षणी काही सेकंदांमध्ये सगळे तिकिटं संपून जातात आणि आपल्या नशिबात उरते ती फक्त Waiting List. विशेषत: तात्काळ बुकिंगमध्ये ही स्पर्धा अगदी शर्यतीसारखी असते. यामध्ये अगदी पापणी लवताच सगळी तिकिटं संपून जातात आणि आपण फक्त स्क्रीनकडे बघत बसतो. पण खरं सांगायचं झालं तर, कन्फर्म तिकीट (Confirm train ticket trick) मिळवणं एवढं अवघड नाही. फक्त एक गोष्ट आपण आधी करून ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे IRCTC Master List तयार करणे.

आपण ट्रेन तिकीट बुक करताना जेव्हा प्रवाशांची माहिती, नाव, वय, लिंग, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, टाईप करत बसतो, तेव्हा आपण किमान 20 ते 30 सेकंद खर्च करतो. तात्काळ बुकिंग करताना हे 20 सेकंद म्हणजे सोन्यासारखे असतात. हे म्हणजे तिकीट मिळणार की जाणार, हे ठरवणारे काही सेकंद असतात. अनेकदा आपण नाव टाईप करत असताना स्क्रीन अडकते, कीबोर्ड उशीर करू लागतो किंवा इंटरनेट क्षणभर स्लो पडतो आणि तेवढ्यात सगळी तिकिटं संपून जातात. म्हणूनच इथे तुम्हाला मास्टर लिस्ट (IRCTC master list) मदत करते, ही लिस्ट म्हणजे तिकीट बुकिंगमध्ये तुमचा खरा आधार ठरते.

मास्टर लिस्ट बनवा

मास्टर लिस्ट बनवणे अत्यंत सोपे आहे. IRCTC ची वेबसाइट किंवा ॲप उघडा आणि तुमच्या खात्यात लॉगिन करा. नंतर My Account मध्ये जा आणि तिथे My Profile उघडा. तिथे तुम्हाला Add/Modify Master List हा पर्याय दिसेल. आता याठिकाणी फक्त तुम्हाला प्रवाशांची माहिती, नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल आणि आधार क्रमांक ही सगळी माहिती अगदी योग्य रित्या भरायची आहे. त्यानंतर एकदा आधार पडताळणी पूर्ण झाली की ही माहिती कायमची सेव्ह होते. आता पुढच्या वेळी तुम्ही तिकीट बुक करायला बसलात की तुम्हाला फक्त प्रवाशाचे नाव ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडावे लागेल. आता तुम्हाला कोणतीही टायपिंग करण्याची गरज नसेल आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही. फक्त एक क्लिक करून तुम्ही पेमेंटकडे जाऊ शकता.

इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट जरी उपलब्ध असेल तरी पेमेंटच्या वेळी जर तुमचा UPI अडकला, बँक सर्व्हर स्लो पडलं किंवा OTP येण्यासाठी उशीर झाला, तरी देखील हे तिकीट तुमच्या हातातून जाऊ शकतं. तिकीट बुकिंगच्या वेळी पेमेंट स्लो झालं, की तिकीट गेलंच समजा. म्हणून शक्य असल्यास (Train ticket booking hacks) IRCTC Wallet मध्ये आधीच ₹500-₹2000 रुपयांच Recharge करून ठेवा किंवा UPI QR द्वारे Instant Payment निवडा, यामुळे Booking फेल होण्याची शक्यता कमी होते.

आता पाहा, एवढं सगळं करताना आपला उद्देश काय असतो? कधी आपल्याला आपल्या घरी पोचायचं असतं, कधी कुणाची आतुरतेने वाट पाहणारी माणसं असतात, कधी एखादा आनंदाचा कार्यक्रम असतो, तर कधी कुणाला कुणाच्या मदतीसाठी धावून जायचं असतं. या सगळ्यात तिकीट Waiting List मध्ये असणं म्हणजे मनाला एकदम उदास करून जातं. म्हणून अगदी साधं, पण अत्यंत परिणामकारक असं हे पाऊल म्हणजे मास्टर लिस्ट तयार करणे. म्हणून पुढच्या वेळी ट्रेन तिकीट बुक (How to get confirmed tatkal ticket) करायचं असेल, तर स्क्रीन समोर बसण्यापूर्वी फक्त एवढं लक्षात घ्या की मास्टर लिस्ट आधीच तयार करून ठेवा.