Railway senior citizen concession: भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे! 15 फेब्रुवारी 2025 पासून सीनियर सिटिझन्ससाठी प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. महिलांना 50% आणि पुरुषांना 40% सवलत मिळणार आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे होणार आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही सवलत पुन्हा सुरू करण्यात आली आहे, याचा फायदा लाखो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे हा प्रवासाचा मुख्य आणि कधी कधी एकमेव पर्याय असतो. निवृत्त लोक, धार्मिक यात्रा करणारे आणि आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा आहे.
Railway senior citizen concession | सविस्तर माहिती
महिलांसाठी सवलत: 50% (58 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या महिला)
पुरुषांसाठी सवलत: 40% (60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे पुरुष)
लागू गाड्या: मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, दूरंतो
बुकिंगचे प्रकार: IRCTC ऑनलाइन पोर्टल आणि रेल्वे तिकीट काउंटर
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा इतर वैध ओळखपत्र
अतिरिक्त सुविधा: प्राधान्य आसने, व्हीलचेअर सहाय्य, स्वतंत्र रांगा
सवलत लागू होण्याची तारीख: 15 फेब्रुवारी 2025
ही सवलत कोणाला मिळू शकते? | Who will get senior citizen concession?
ही सुविधा घेण्यासाठी काही पात्रता निकष आखून देण्यात आले आहेत:
महिलांसाठी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 58 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे.
पुरुषांसाठी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे.
ही सुविधा फक्त भारतीय नागरिकांसाठीच उपलब्ध असणार असून Tatkal तिकिटांवर ही सवलत लागू करण्यात आलेली नाही.
रेल्वे तिकीट बुकिंग कशी करावी?
ऑनलाइन बुकिंग (IRCTC पोर्टलद्वारे) | Online Booking via IRCTC Portal
- यासाठी सगळ्यात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर पोर्टल वर लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.
- पुढे तुमच्या प्रवासाची माहिती भरा जसे की तारीख, स्थान, ट्रेन क्लास इ.
- त्यानंतर “Senior Citizen Concession” हा पर्याय निवडा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सवलतीसह पेमेंट करा आणि त्यानंतर तुमचे तिकीट डाउनलोड करा.
रेल्वे तिकीट काउंटरवर बुकिंग | Booking at Railway Ticket Counter
- रेल्वे तिकीट काउंटरवर बुकिंग करण्यासाठी जवळच्या रेल्वे आरक्षण केंद्रावर जा.
- तिकीट अर्ज भरून त्यात “Senior Citizen Concession” हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचे आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र दाखवा. सगळे कागदपत्र योग्य असल्यास तुम्हाला सवलतीच्या दरात तिकीट मिळेल.
अतिरिक्त सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी
प्राधान्य आसने: जनरल डब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसने उपलब्ध असणार आहेत.
व्हीलचेअर सहाय्य: ज्येष्ठ गरजू नागरिकांना रेल्वे स्थानकांवर मोफत व्हीलचेअर सेवा सुद्धा उपलब्ध असणार आहे पण त्यासाठी आधीच विनंती करावी लागेल).
स्वतंत्र रांगा: तिकीट बुकिंग प्रक्रियेसाठी स्वतंत्र रांगा असणार आहेत.
खालच्या बर्थला प्राधान्य: महत्वाचं म्हणजे Sleeper आणि AC डब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खालच्या बर्थला प्राधान्य दिले जाणार आहे.
ही योजना का महत्त्वाची आहे? | Why is senior citizen concession important?
- महागाईच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.
- नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास अधिक सोयीचा होईल.
- जे ज्येष्ठ नागरिक वारंवार धार्मिक स्थळांना भेट देतात. ही सवलत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.
भविष्यातील योजना
रेल्वे प्रशासन आणखी काही सुधारणा करण्याच्या विचारात आहे:
वंदे भारत आणि तेजस गाड्यांमध्येही ही सवलत लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे डबे राखीव करण्याची शक्यता असून स्वस्त प्रवासी विमा देण्याचा प्रस्ताव सुध्दा विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाची माहिती | Important note
रेल्वेच्या अधिकृत घोषणेनुसारच ही योजना लागू केली जाईल. तसेच या मधे काही बदल किंवा सुधारणा होऊ शकतात, त्यामुळे लेटेस्ट अपडेट्स बद्दल माहिती मिळवत राहा.
जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, तर हा निर्णय तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा असणारा आहे. यामुळे तुमचा प्रवास अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.