Maharashtra Ration Card New Update : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात जानेवारी 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्याच्या एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारने 2023 या वर्षात जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक मदतीचा आधार मिळेल अशी अपेक्षा आहे.
योजने अंतर्गत येणारे 14 जिल्हे खालीलप्रमाणे
- औरंगाबाद
- जालना
- नांदेड
- बीड
- उस्मानाबाद
- परभणी
- लातूर
- हिंगोली
- अमरावती
- वाशिम
- अकोला
- बुलढाणा
- यवतमाळ
- वर्धा
महाराष्ट्र राज्यातील वरील यादीतील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी हा नियम लागू असणार आहे.
Ration Card Update योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी
केशरी रेशनकार्ड धारकांना धान्या ऐवजी पैसे देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयासंबंधी काही महत्त्वाच्या बाबी आपण पुढे पाहणार आहोत.
- या जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना केवळ या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल कार्ज धारक दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.
- या निर्णयानुसार, जानेवारी 2023 पासून या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
येथून अर्ज डाऊनलोड करा
https://drive.google.com/file/d/1Zp_AnHZBYl_80QyijPt-xynrO2ojLmQ2/view
आर्जदारांनी कुठे व कसा अर्ज करावा यासंबंधी मार्गदर्शन
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित 14 जिल्ह्यातील ‘आरसीएमएस’वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित तहसिल कार्यालय (पुरवठा विभाग) येथून घ्यावा.
- किंवा वरील लिंकवरून तो अर्ज डाऊनलोड करावा. आणि त्याची प्रत घेऊन त्यात सर्व इत्यंभूत माहिती भरावी
- अर्जासोबत महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्डच्या पहिल्या पानाची प्रत, सर्व सदस्यांच्या आधारकार्डची प्रत व विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित स्वस्तधान्य दुकानदार यांच्याकडे तत्काळ जमा करावा.
- या योजनेसाठी आवश्यक अर्ज संबंधित एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा केला नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही.
- या योजनेअंतर्गत केवळ महिला कुटुंब प्रमुखांच्या खात्यातच लाभाचा पैसा वितरित केला जाणार आहे. यामुळे जर संबंधित महिला कुटुंबप्रमुख्याचे बँकेत खाते नसेल तर अशा महिला कुटुंब प्रमुखाचे बँकेत खाते ओपन करावे लागणार आहे. अन्यथा अशा कुटुंबाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असे म्हणता येईलय केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी थेट पैसे वितरित करण्याचा हा निर्णय शासनाकडून जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आला होता. परंतु या निर्णयावर मात्र काही लोकांनी आक्षेप नोंदवला तर विरोधकांकडून या निर्णयावर टीका करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचा विरोध केला मात्र काही शेतकऱ्यांनी हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी नमूद केला आहे
महाराष्ट्रात तीन प्रकारचे रेशन कार्ड आहेत
पिवळे, केशरी आणि पांढरे असे महाराष्ट्रात तीन प्रकारची रेशन कार्ड आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटनुसार, पिवळ्या रंगाचं रेशनकार्ड त्यांना मिळतं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत असते. यालाच बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी म्हटले जाते. केशरी रेशन कार्डसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 15 हजार पेक्षा जास्त, पण एक लाखपेक्षा कमी असते. यालाच एपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेवरील लाभार्थी म्हणतात. आताची सरकारची ही योजना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एपीएल लाभार्थ्यांसाठी आहे.
ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरं रेशन कार्ड देण्यात येतं.