Real Estate Tips: महिलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी केल्यास सरकारकडून मिळतील अनेक फायदे

Real Estate Tips भारतात सध्या रियल इस्टेटमध्ये गुंतवणूकीस अनेकांची पसंती दिसून येते. कारण वर्गागणित वाढत जाणारे घरांचे रेट आणि वाढत जाणारे जमिनीचे भाव त्यामुळे सगळेच  रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु इच्छितात. मोठ मोठ्या शहरांमध्ये घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करुन अनेकांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करुन ठेवण्याकडे जास्त कल दिसून येतो. ग्रामीण भागामध्ये देखील शेती किंवा घर, प्लॉटसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना महिलांच्या नावाने खरेदी केल्यास शासनातर्फे फायदा होतो. पण हे नक्की कोणकोणते फायदे आहेत आणि ते कसे मिळवता येतील याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. Home Buying Tips

स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळते.

कोणतीही मालमत्ता खरेदी करताना किंवा घर खरेदी करताना आपल्याला आपल्याला त्यावर स्टँपड्युटी म्हणजेच मुद्राक शुल्क द्यावे लागते.   हे  मुद्रांक शुल्क साधारणपणे 6 ते 8 टक्क्यांपर्यंत शासनामार्फत आकारले जात असते. खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत किती आहे त्यानुसार मुद्रांक शुल्क ठरत असतो. जर का खरेदी केलेली मालमत्ता  महिलेच्या नावाने असेल,  तर मुद्रांक शुल्कामध्ये  1 टक्क्यापर्यंत  सवलत मिळते. घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना सगळ्यात जास्त खर्च हा स्टँप ड्युटीवरच होतो तो खर्च भरपूर प्रमाणात वाचवता येतो. महिलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी करुन. Home Buying Tips

कर्ज  आणि व्याज दरामध्ये सवलत मिळते

सध्या घर किंवा एखादा मालमत्ता खरेदी करताना लोन घेणे हे अगदी सोपे झाले आहे. बरेचदा एखाद्या घराची किंवा प्रॉपर्टीची रक्कम ही एकत्रित रित्या आपल्याकडे नसते. त्यामुळे सगळेच होम लोन किंवा इतर कर्जाचे पर्याय निवडतात. अशावेळी जर का घर महिलेच्या नावाने खरेदी करायचे असल्यास बँकेतून कर्जाच्या व्याजावर सवलत मिळते. इतकेच काय बऱ्याच बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कर्द योजना राबवल्या जातात. आपण पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी चा विचार केला तर महिलांना गृहकर्जावरील व्याजदर हा 0.20 ते 0.50% पर्यंत कमी असतो. तसेच कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी देखील पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जास्त असतो. त्यामुळे नेहमीच महिलांच्या नावाने घर किंवा प्रॉपर्टि घेणे जास्त सोयीचे ठरते. Home Buying Tips

सरकारी योजनांचा फायदा मिळवता येतो.

महिलांच्या नावे प्रॉपर्टी असावी यासाठी शासनाने देखील अनेक योजना लागू केल्या आहेत. महिलांच्या नावे घर असावे म्हणून प्रोत्साहन देण्याकरिता सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात.  पंतप्रधान आवास योजना तसेच क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम यासारख्या  शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत असते. Home Buying Tips

करामध्ये सवलत मिळते

नवरा बायको दोघांनी संयुक्तपणे प्रॉपर्टी खरेदी केली  आणि प्रॉपर्टी बायकोच्या नावावर असेल तर त्यांना करामध्ये सवलत मिळण्यास मदत होते. कलम 80 C,24 आणि कलम 80 EE आणि 80 EEA अंतर्गत गृह कर्जाच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा फायदा महिलांना घेता येतो. Home Buying Tips

महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदीवर शासनाने सवलत देण्यामागचा हेतू

महिलांना आत्मनिर्भर करणे, आणि समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी आता शासन देखील पुढाकार घेत आहे. बरेचदा घरातील हिस्सा असो किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी आधी विचार मुलाचा केला जातो. त्यामुळे महिलांना त्यांच्या स्वतःचे असे कोणतेच घर किंवा आसरा उरत नाही. पतीच्या घरी देखील महिला आधी पतीवर आणि नंतर मुलावर निर्भर असतात. इतकेच काय तर महिला नोकरदार किंवा कमावती असली तरी घर किंवा प्रॉपर्टी मुलगा किंवा पतीत्याच नावे असण्याने महिलांना उतारवयात इतरांवर विसंबून रहावे लागते तसेच त्यांना समाजात देखील कोणी विचारत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, त्यामुळेच महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास अनेक करामध्ये, मुद्रांक शुल्कामध्ये आणि व्याजात अनेक सवलती शासनाकडून दिल्या जातात. Home Buying Tips