Kunabi nondi: तुमची कुणबी नोंद आहे का? ही नोंद कुठे तपासायची?

Kunabi nondi

Kunabi nondi मराठी आरक्षणाच्या निमित्ताने सध्या महसूल, शिक्षणविभाग,  ग्रामपंचायत, पोलिस विभाग अशा सर्वच शासकीय विभागाकडील 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दीड कोटी दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात 22 हजारांवर नोंदी आढळल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात देखील 20 हजारांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत.  वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने शासनाने मागितलेल्या खऱ्या कागदपत्रांसह तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला 45 दिवसांत जात प्रमाणपत्र शासनाकडून दिले जात आहे. हे जात प्रमाणपत्र मराठा आरक्षणाअंतर्गत दिले जात आहे.Maratha Aarakshan kunabi nondi

कुणबी नोंदीचा शोध कसा सुरु झाला?

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील  यांनी राज्य सरकारला वेळ ठरवून दिली होती. जरांगे यांना शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर राज्य सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्याचे  काम वेगात सुरू झाले आणि विविध शासकीय विभागांच्या मदतीने आतापर्यंत राज्यभरात कुणबींच्या लाखो नोंदी सापडल्या आहेत. Maratha Aarakshan kunabi nondi

कुणबी नोंदी आणि शासकीय प्रणाली

राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी कुठे सापडल्या असतील तर त्या नगर, धुळे, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये आढळल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 22 हजार नोंदी आढळल्या आहेत. 3 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला गेला आहे.  त्यामध्ये 1948 ते 1967 नंतरच्या  नोंदींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, वंशावळ जुळवून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही हा देखील शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेता आहे.  Maratha Aarakshan kunabi nondi

तुमची कुणबी नोंद नसेल तर तुम्ही काय केले पाहिजे.

तुम्हाला मराठा आरक्षणांतर्गत कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास सर्वप्रथम तहसिलदाराकडे किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कुणबी नोंदी तपासाव्या लागतील. या कुणबी नोंदी तपासण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हानिहाय वेबसाईट तयार केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे Maratha Aarakshan kunabi nondi

कुणबी नोंद प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराची वंशावळ  या पद्धतीने वडिल, आजोबा, पणजोबा काढून त्याची पुराव्यानिशी जुळवणी करावी लागणार.
 • अर्जदाराचा रहिवासी दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
 • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
 • जन्म- मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
 • कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे करावा?

 • महाराष्ट्र शासनाची ऑनलाई सेवा पुरवीणारी अधिकृत वेबसाईट https://mahasupport.in/kunbi-caste-certificate/ असून यावर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता. किंवा महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे देखील अर्ज करु शकता.
 • शासनाने सांगितलेली  योग्य कागदपत्रे जोडल्यास तुम्हाला केवळ 45 दिवसांच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र मिळते
 • कारण 45 दिवसांच्या आत कुणबी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
 •  कुणबी प्रमाणपत्रेसाठी अर्ज करताना  अर्जदाराला 53 रुपये इतके शासकीय शुल्क भरणे बंधनकारक आहे.
 • अर्ज करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार आहे.