RESERVE BANK Complaint Online: तुमची बँक ग्राहकांना योग्य सेवा देत नसेल तर, तक्रार करा एका क्लिकवर

RESERVE BANK Complaint Online

RESERVE BANK Complaint Online: बरेचदा आपल्याला आपल्या बँकेकडून योग्य वागणूक मिळत नाही, किंवा एखादे छोट्यात छोटे काम करण्यासाठी  विनाकारण वेळ वाया घालवत असल्याचे देखील दिसून येते. या सगळ्यात नोकरदार व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांना थांबून रहावे लागते आणि त्यांचा वेळ वाया जातो. इतकेच काय तर काही बँकांमधील अधिकारी  एका छोट्याशा कामासाठी ग्राहकांना अनेकदा फेऱ्या बँकेत मारायला लावतात. जे काम एका भेटीतर पूर्ण होऊ शकले असते तेच काम ग्राहकांना 3 ते 4 फेऱ्यांमध्ये पूर्ण करावे लागते. यामध्ये वेळ वाया जातोच परंतु मनस्ताप देखील होत असतो. मग बँकेच्या या मनमानी कारभाराची तक्रार नेमकी कुठे करायची आणि या मुजोर बँक अधिकाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे ते ग्राहकांना माहिती नसते. म्हणूनच आम्ही आज हा लेख घेऊन आलो आहोत. आता यापुढे तुम्हाला तुमच्या बँकेच्या व्यवहारांसंबंधीत काहीही तक्रार असेल तर तुम्ही रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडे तक्रार करु शकता. अगदी 30 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल असा भारत सरकारने नियम बनवला आहे. RESERVE BANK Complaint Online

भारतातील खाजगी तथा शासकीय बँकांवर नियंत्रण ठेवणारी बँक

रिझर्व्ह बँकेला सरकारची बँक म्हणून ही देखील ओळखले जाते. सरकारचे सर्व वित्तीय व्यवहार हे रिझर्व्ह बँकेद्वारेच पार पाडले जातात. रिझर्व्ह बँक कायदा, 1934 अन्वये केंद्र सरकारचा पैसा, विनिमय, कर्ज यांबाबत  रिझर्व्ह बॅंक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सरकारचे परकीय चलनासंबंधीचे व्यवहार नियंत्रित करणे, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांवर सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व करणे या प्रकारची कार्ये रिझर्व्ह बँकेद्वारेच केली जातात. मग तुमच्या बँकेने ग्राहकांना सेवा देताना कोणतीही दिरंगाई केली तर तुम्ही या RBI कडे तक्रार करु शकता. मग ही तक्रार कशी करायची ते आपण पुढे पाहूया. RESERVE BANK Complaint Online

कोणत्याही भारतीय बँकेचा ग्राहक आरबीआय बँकिंग लोकपालकडे थेट आरबीआय तक्रार दाखल करू शकतो

तुमच्या आरबीआयची तक्रार दाखल करण्यासाठी लोकपालाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला काही प्रक्रिया पाळाव्या लागतील.  ग्राहकांना आधी त्यांच्या बँकेकडे हा मुद्दा उपस्थित करावा लागेल, तुम्ही तक्रार केल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याचे उत्तर देणे तुमच्या बँकेला बंधनकारक आहे. जर बँक तुमच्या चिंता दूर करण्यात अपयशी ठरत असेल तर तुम्ही RBI लोकपालाकडे जाऊ शकता. RESERVE BANK Complaint Online

ऑनलाईन तक्रार कशी दाखल करायची?

https://cms.rbi.org.in/cms/indexpage.html#eng या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमच्या बँकेची तक्रार RBI कडे करु शकता. या RESERVE BANK OF INDIA च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि बँकेमार्फत कारवाई देखील केली जाते. तुम्ही ज्या बँकेबद्दल तक्रार करीत आहात त्या बँकेला सर्वप्रथम तुमच्या तक्रारीचे तपशील पाठवले जातात, त्याबद्दल विचारणा केली जाते. योग्य अधिकाऱ्यांकडून तक्रारीचे निवारण होण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला जातो. आणि ज्याने तक्रार केली आहे त्याला 30 दिवसांच्या आत उत्तर दिले जाते.

आरबीआई कडे तक्रार नोंदवण्याबद्दल अधिक माहिती मिळविण्याची माध्यमे – RESERVE BANK Complaint Online

तुम्हाला तुमचे खाते असलेली भारतातील कोणतीही बँक योग्य सेवा देत नसेल तर तुम्ही आरबीआयकडे तक्रार कशी करायची यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे.  ही तक्रार कशी करायची इथपासून कुठे करायची या सर्व बाबींची माहिती तुम्ही  पुढील क्रमांकावर फोन करुन मिळवू शकता. इतकेच काय तर इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम सुविधेद्वारे टोल फ्री क्रमांक 14448 येथे देखील दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस ही सेवा उपलब्ध आहे. RESERVE BANK Complaint Online

  • संपर्क केंद्राचे कर्मचारी हिंदी आणि इंग्रजीतून माहितीसाठी सकाळी 8:00 से रात्री 10:00 या वेळेत उपलब्ध असतात
  • तसेत प्रादेशिक भाषांमध्ये  म्हणजेच गुजराती, मराठी, आसामी, बंगाली, कन्नड़, मराठी, मल्याळम, ओरिया, पंजाबी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये देखील ग्राहकांना सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत ग्राहकांना विचारलेल्या प्रश्नांसंबंधी माहिती दिली जाते.

बँकेसंबंधीत तक्रार निवारण केंद्र

निक्षेप, विमा आणि क्रेडिट गॅरंटी निगम (डीआईसीजीसी)

महाव्यवस्थापक

डीआयसीजीसी, तक्रार निवारण कक्ष,

भारतीय खिर्ल्ड बैंक, दुसरा मजला,

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर,

दूरध्वनी क्रमांक 022-23028000 विस्तारित क्रमांक 8000 वर किया जेनेरिक ई-मेल dioge.complaints@rbi.org.in द्वारा संपर्क साधू शकतात. भायखळा, मुंबई-400008.