Solar Pump Scheme 2024: सरकार शेतकऱ्यांना देणार ९५% अनुदानावर सौर पंप; कसा घ्यावा या योजनेचा लाभ? आजच जाणून घ्या..

Solar Pump Scheme 2024

Solar Pump Scheme 2024 भारतातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतीत सिंचनासाठी विजेवर चालणाऱ्या पंपांचा उपयोग करतात. परंतु अनेक वेळा विजेचे उत्पादन पुरेश्या प्रमाणात न झाल्याने शेतकऱ्यांना लोडशेडिंग चा सामना करावा लागतो. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे पाण्याचा उपसा पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकदा तर हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी नष्ट होतात आणि शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस तोंड द्यावे लागते. यातूनच शेतकरी निराश होतात. आर्थिक नुकसानीमुळे अनेकदा ते जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची पुढची पिढी तर शेतीकडे पाठ फिरवताना दिसते.

हे सर्व टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना केंद्र सरकारतर्फे राबवल्या जात आहेत. यापैकीच एक योजना आहे पीएम कुसुम योजना PM Kusum Yojana. शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची असलेली ही योजना आहे तरी काय? त्याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचे संपूर्ण नाव आहे “किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान अभियान”. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना  ऊर्जा सुरक्षिततेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लोडशेडिंग मधून मुक्तता होईल व  सिंचनाअभावी पिकांचे होणारे नुकसान टळेल हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. PM Kusum Yojana.

काय आहे कुसुम सोलर पंप योजना 2024 – Kusum Solar Pump Scheme 2024

शासनामार्फत शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंपावर 95 टक्के इतके अनुदान देण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी सरकारतर्फे अनुदान दिले जाणार आहे. हा सोलर पंप सौर उर्जेवर चालेल. त्यासाठी विजेची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे पिकांना पाणी देण्यासाठी आता शेतकऱ्यांना वीज येण्याची वाट पहावी लागणार नाही. PM Kusum Yojana.

सौर पंपावर किती अनुदान मिळेल?

कुसुम सौरपंप योजने अंतर्गत Solar Pump Scheme 2024 सरकारकडून जवळ जवळ 90 ते 95% अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंपांसाठी फक्त 5 ते 10 टक्के इतकाच खर्च करावा लागेल. PM Kusum Yojana.

महाराष्ट्रपुरता विचार करायचा झाल्यास कुसुम सौरपंप योजने अंतर्गत (Solar Pump Scheme 2024) केंद्र शासनाचे 30 टक्के अनुदान मिळेल. तसेच राज्य शासनाचे 60 ते ६५ टक्के अनुदान असते. म्हणजे एकूण 90 ते 95 टक्के वित्तीय साहाय्य शेतकऱ्याला मिळू शकेल व त्याला स्वतःला फक्त 5 ते 10 टक्के इतकीच रक्कम भरावी लागेल.

हा सौर ऊर्जा प्रकल्प नापिक, पडीक तसेच लागवडीयोग्य जमिनीत बसवत येऊ शकेल. त्या व्यतिरिक्त तो कुराणात तसेच पाणथळ जमिनीतही बसवत येऊ शकेल. हे या योजनेचे मोठेच वैशिष्ट्य आहे. PM Kusum Yojana.

कुसुम सौरपंप योजनेच्या घटक अ अंतर्गत कोण कोण पात्र आहे?

खालील घटक या योजनेचा लाभ मिळवू शकतात.

१) वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे गट किंवा शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)

२) सहकारी संस्था, पंचायत संस्था, पाणी वापरकर्त्या संघटना (WUAS)

३) ज्या जमिनीवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव केलेला आहे ती जमीन जवळच्या वीज उपकेंद्रापासून ५ किलोमीटरच्या आत असावी. PM Kusum Yojana.

प्रधानमंत्री कुसुम योजनेची अंतिम मुदत काय आहे?

 • कुसुम सौरपंप योजना Solar Pump Scheme 2024 या योजनेची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 • कुसुम सौरपंप योजनेसाठी अर्ज कसा करावा?  Solar Pump Scheme 2024
 • केंद्र सरकारची प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर अर्ज करू शकता. 
 • pmkusum.mnre.gov.in ही उर्जा मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट आहे.
 • या साईटवर सर्वप्रथम लॉग इन करावे लागेल.
 • त्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय निवडावा लागेल.
 • सर्व माहिती नीट भरून, तपासून नंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • हे झाल्यावर तुमचा यूज़र आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल.
 • यानंतर तुम्हाला खालील आवश्यक  कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

 प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • विजेचे बिल
 • शेत जमीन 7/12 व 8अ
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • रद्द केलेला धनादेश (चेक)
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट आकाराचे फोटो