Second Hand Car : सेकंड हॅंड कार खरेदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

Second Hand Car

1) Second Hand Car : कार असणे ही आजकाल अनेकांची गरज बनली आहे. अनेकांचे स्वप्न देखील आहे. कारमुळे अनावश्यक टॅक्सीचे भाडे वाचेल, तर दुसरीकडे थंडी, पाऊस किंवा कडक उन्हापासून संरक्षण मिळते. यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तीही साधी कार घेण्याची आकांक्षा बाळगतो. 

प्रत्येकाला नवीन कार घेता येत नाही. त्यामुळे सेकंड हँड कार घेणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही कमी पैशात चारचाकी घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. सेकंड हॅंड कार म्हणजेच एखादी कार एक किंवा त्यापेक्षा जास्त मालकांनी वापरल्यास त्याला आपण सेकंड हॅन्ड कार म्हणतो.

पहिल्यांदाच सेकंड हँड कार खरेदी करणार असाल तर अनेक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येणार आहे. प्रश्न असा आहे की सेकंड हॅन्ड कार खरेदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या सेकंड हँड कार खरेदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला 5 बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

सेकंड हॅंड कार करिता कर्ज घेण्यापूर्वी या 5 बाबी लक्षात घ्या

1) आर्थिक नियोजन पक्के करा
आपण जर एखादी सेंकड हॅंन्ड कारसाठी जर कर्ज घेत असेल, तर त्यापूर्वी आपला होणारा महिन्याचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इतर खर्च यासोबतच इतर कर्जाचे हप्ते लक्षात घेऊनच सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावे. अन्यथा आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकते.

2) वाहन कर्जासाठी डाउन पेमेंटची व्यवस्था
सेकंड हॅंड कार खरेदी करत कारची स्थिती पाहून कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजुरीची रक्कम ही कारच्या किंमतीच्या 70 ते 80 इतकीच दिली जाते. सेकंड हॅंड कारची स्थिती जर जास्तच खराब असेल तर तुम्हाला इतर खर्च लागत असेल तर कर्जाची रक्कम मंजूर करून घेण्यासाठी डाउन पेमेंटची व्यवस्था करावी.

3) कर्जाच्या रकमेचे व्याज आणि कर्ज परतफेडीचा कालवाधी
सेकंड हॅंड कार करिता तुम्ही जर कर्ज घेतले तर 14% ते 20% व्याजदर आकारले जाते. नवीन कार करिता 8% ते 10% पर्यंत व्याजदर असतो. सेकंड हॅंड कारची कर्ज फेडण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी दिला जातो. (Second Hand Car Buying Tips)

4) कार खरेदीसाठी इतर आर्थिक पर्याय
सेकंड हॅंड कार घेण्यासाठी तुम्हाला कर्जाची रक्कम कमी पडत असेल तर तुम्ही इतर आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. या कर्जाचा कालावधी कार कर्जापेक्षा जास्त असतो. कारच्या किंमती इतकी रक्कम तुम्ही वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून सहज मंजूर करून घेऊ शकता.

5) सुवर्ण कर्ज
सेकंड हॅंड कार खरेदीसाठी तुम्ही सुवर्ण कर्ज देखील घेऊ शकता. second hand cars loan सुवर्ण कर्ज म्हणजे सोनं तारण ठेवून सोन्यावर कर्ज दिले जाते. या कर्जाला व्याजदर इतर कर्जापेक्षा कमी असते. सेकंड हॅंड कार खरेदीसाठी तुम्ही सुवर्ण कर्ज घेणं हा सुरक्षित पर्याय आहे.
सेकंड हॅण्ड कार कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

सेकंड हॅण्ड कार कर्जासाठी अर्ज करताना, तुम्हाला अनेक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. यामध्ये सामान्यत: तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र समाविष्ट असेल. त्याचबरोबर तुम्हाला तीन पासपोर्ट-आकाराच्या फोटोंसह सही केलेला कर्ज अर्ज फॉर्म देखील आवश्यक असेल. तुम्हाला तुमचा पत्ता कन्फर्म करण्यासाठी, तुमचा पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, तुमच्या नावावरील पोस्टपेड युटिलिटी बिले किंवा लागू असल्यास नोंदणीकृत भाडे करार यासारखी कागदपत्रे देण्याची आवश्यकता असेल.

तसेच तुम्हाला तुमच्या रोजगाराच्या स्थितीनुसार, अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागू शकते. ज्यामधे पगारदार व्यक्तींसाठी, मागील तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिप आणि फॉर्म 16 किंवा आयकर रिटर्न कागदपत्रांचा समावेश होतो. स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांनी त्यांचे मागील दोन वर्षांचे बॅलन्स शीट, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, लागू असल्यास सेवा कर नोंदणी, मागील दोन वर्षांचे ITR कागदपत्र, IT असेसमेंट/क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि ITR किंवा TDS प्रमाणपत्र किंवा फॉर्म 26AS सादर करावे

सेकंड हॅण्ड कारचा ताबा कसा मिळवाल?


एकदा का तुमचे सेकंड हॅण्ड कारसाठी चे कर्ज मंजूर झाले की त्यांनतर, तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम वितरित केली जाईल आणि त्यांनतर तुम्ही विक्रेत्याला आवश्यक डाउन पेमेंट करून तुम्ही सेकंड हॅण्ड कारचा ताबा घेऊ शकता.