HDFC Personal Loan : एचडीएफसी बॅंकेकडून मिळवा 10 सेकंदात 40 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज

HDFC Personal Loan

HDFC Personal Loan : तुम्हाला पैशांची गरज असेल आणि तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला HDFC बॅंक कर्ज देत आहे. या पोस्टद्वारे तुम्हाला एचडीएफसी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, व्याजदर आणि संपूर्ण कर्ज प्रक्रिया या पोस्टाद्वारे जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही आधीच HDFC चे ग्राहक नसाल तर तुम्ही HDFC कडून 4 तासांपेक्षा कमी वेळेत इन्स्टंट पर्सनल लोन मिळवू शकता. एचडीएफसीचा पर्सनल लोनचा व्याजदर सतत बदलत असतो. जर तुम्ही HDFC बॅंकेकडून पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

या बॅंकेकडून Personal Loan घेण्यासाठी तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. कर्जाची परतफेड करण्यासाठी आवश्यकतेनुसार तुम्ही परतफेड कालावधी निवडू शकता.‌ हे वैयक्तिक कर्ज मिळाल्यानंतर, तुम्ही कर्जाची रक्कम कुठेही वापरू शकता. तुम्हाला ही सुविधा HDFC बॅंकेकडून मिळते.

HDFC बॅंकेकडून 10 सेकंदात मिळवा कर्ज
एचडीएफसी बॅंक आपल्या ग्राहकांना फक्त 10 सेकंदात कर्ज उपलब्ध करून देते. परंतु, जे HDFC Bank चे ग्राहक नाहीत  त्यांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठी 4 तासांपेक्षा कमी कालावधी लागतो. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. कमी कागदपत्रांत सहजपणे कर्जासाठी अर्ज करू शकता.

HDFC बॅंकेकडून 40 लाखांपर्यंत कर्ज
एचडीएफसी बॅंकेकडून तुम्ही 50 हजार रुपयांपासून ते 40 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. यासाठी एचडीएफसी बॅंकेचा व्याज दर 10.75% ते 21.50% आहे‌. एचडीएफसी थकीत EMI दर 2% प्रति महिना आहे. कर्ज घेण्यापूर्वी बँकेच्या अटी व शर्ती पूर्णपणे जाणून घेणं आवश्यक आहे.

तुम्हाला HDFC वैयक्तिक कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी किमान 12 महिने आणि कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 60 महिने दिले जातात. HDFC कर्जाच्या EMI वर दर महिन्याला 2149 रुपयांच्या कर्जाची रक्कम परत करू शकता.

HDFC Personal Loan करिता पात्रता
एचडीएफसी बॅंकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
अर्जदाराने कोणत्याही ठिकाणी 2 वर्षे सतत काम केलेले असावे किंवा 1 वर्ष सतत काम करत असावे.
HDFC बँक वैयक्तिक कर्ज अर्जदाराचे मासिक उत्पन्न 12,000 रुपये असावे आणि शहरातील नागरिकांचे किमान उत्पन्न 15,000 रुपये दरमहा असावे.

HDFC Personal Loan घेण्यासाठी येथे करा अर्ज
एचडीएफसी बॅंकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही HDFC बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. तुम्हाला या वेबसाईटवर या कर्जाविषयी सविस्तर माहिती मिळून जाईल. पर्सनल लोन घेण्यापूर्वी एचडीएफसी बॅंकेत जाऊन विचारपूस करावी.

एचडीएफसी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता लागेल:

आवश्यक कागदपत्रे

  1. ओळख पुरावा (खालीलपैकी एक)
    • आधार कार्ड
    • मतदार ओळखपत्र
    • पासपोर्ट
    • ड्रायव्हिंग लायसन्स
  2. तुमच्या घटाचे प्रमाणपत्र
  3. बँक स्टेटमेंट: तुमच्या आर्थिक व्यवहारांची नोंद देण्यासाठी मागील 3 ते 6 महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट.
  4. उत्पन्नाचा पुरावा: तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागील सलग 2 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स तसेच तुमचा फॉर्म 16 सुद्धा अपलोड करावा लागेल.

एचडीएफसी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत:

  • HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यांनतर वेबसाइटवरील “borrow” लिंकवर क्लिक करा.
  • आता इथे तुम्ही “पेपरलेस लोन” हा पर्याय निवडायचा आहे.
  • आता तुम्हाला एका नवीन पेजवर निर्देशित केले जाईल जेथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे.
  • या फॉर्म मधे खालील माहिती भरा:
  • सगळ्यात आधी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इथे टाका.
    यांनतर तुमची जन्मतारीख इथे नमूद करा.
    पुढे तुमच्या मोबाईलवर एक OTP क्रमांक पाठवला जाईल. हा पाठवलेला OTP आता तिथे टाका.

पुढे कर्जाचा प्रकार निवडा आणि तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम निवडा.

वेबसाइटवर नमूद केलेल्या संबंधित कागदपत्रांशी संबंधित माहिती इथे प्रविष्ट करा.

सगळी माहिती बरोबर असल्याची खात्री करून फॉर्म सबमिट करा.

तुमच्या कागदपत्रांची कंपनीच्या सिस्टीम द्वारे संपूर्ण पडताळणी केली जाईल. त्यांनतर तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला 10 सेकंदात 50,000 रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तुमच्या अकाऊंट मधे मिळू शकते.

महत्त्वाचे मुद्दे:

HDFC बँक आपल्या विद्यमान ग्राहकांना 10 सेकंदात कर्ज उपलब्ध करून देण्याचे वचन देते. परंतू असे असले तरीही जर तुम्ही या बँकेचे ग्राहक नसाल तर मात्र तुम्हाला हे लोन मिळवण्यासाठी किमान 4 दिवस प्रतीक्षा करावी लागेल कारण बँक तुमची सर्व माहिती तपासून मगच तुम्हाला कर्ज देऊ शकेल.

तुमच्या पगारानुसार कर्जाचा व्याजदर 11% पर्यंत जाऊ शकतो. आणि यासाठी 4,999 रुपये प्रोसेसिंग फी आहे जी तुम्हाला भरावी लागेल.