Solar pump yojana: शेतकऱ्यांनो सोलर पंप योजनेच्या खोट्या संदेशापासून सावध रहा! महाउर्जा विभागाकडून आली सुचना

Solar pump yojana

Solar Pump Yojana Fake SMS केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या सोयी साठी आणि वाढत्या ग्रीड वीजेची मागणी कमी करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.  जुलै 2019 मध्ये या योजनेची सुरुवात केंद्र सरकारमार्फत करण्यात आली.  आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मे 2021 मध्ये राज्यभर योजना राबविण्यास सुरुवात केली.  या योजनेंची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांमार्फत केली जाते. महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकरणाने म्हणजेच महाउर्जा विभागाने सरकारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लाभार्थींना योजनेच्या नावाने लाभार्थी शेअर पेमेंटचा दावा करणारे बनावट मजकूर संदेश SMS प्राप्त झाल्यास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आज आपण या लेखाच्या माध्यमातून अधिक सविस्तर माहिती मिळविणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांसोबत कोणताही गैरकारभार होऊ नये, आणि आर्थिक फसवणूकीला आळा घातला जावा. Solar Pump Yojana Fake massage

काय आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत पीएम कुसुम सोलर पंप योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर देण्यात येतात. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंप घेण्यासाठी अनुदान पास केले जाते. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत त्यांच्या शेतात सोलर कृषी पंप बसवले आहेत आणि त्याचा त्या शेतकऱ्यांना उपयोग देखील होत आहे,

महाराष्ट्र राज्यात काही शेतकऱ्यांना खोटे संदेश पाठवल्याची प्रकरणे उघड Solar Pump Yojana Fake SMS

महाराष्ट्र राज्यातील काही भागात लाभार्थी शेतकऱ्यांना शासकीय संदेशांप्रमाणे SMS पाठवून अनुदानाची रक्कम भरण्यास सांगितली जाण्याची प्रकरणे उघड झाली आहेत. म्हणूनच इतर शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी महाउर्जा विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे. ही शासनामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक फसवणूकीपासून वाचवण्यासाठीची खबरदारी आहे. काही फ्रॉड व्यक्ती शासनाच्या या योजनेचा फायदा घेत शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडत आहेत. कुसुम सोलर पंप योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने सर्व गोष्टी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच कराव्या लागतात. या ऑनलाईन पद्धतीचा फायदा घेत काही जण शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत

कोणत्या नंबरवरुन येतो हा खोटा संदेश?

आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना हा खोटा SMS आला आहे. म्हणूनच इतर शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी महाउर्जा विभागाकडून देखील सुचना देण्यात आली आहे. की, 06357691677 या मोबाईल नंबरवरुन एखादा मॅसेज आला तर त्याला उत्तर देऊ नये. किंवा या नंबरवरून एखादे ऍप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत असेल तर  शेतकऱ्यांनी ऍप डाऊनलोड करु नये.  Solar Pump Yojana Fake SMS

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत मॅसेज आल्यास काय करावे?

शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कुसुम सोलर योजनेअंतर्गत मॅसेज आल्यास सर्वप्रथम त्यांनी ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन त्या मॅसेजची शहानिशा करावी. इथूनच समजू शकेल की तो मॅसेज बरोबर आहे की खोटा. जर का तो मॅसेज खोटा असेल तर त्याला रिप्लाय द्यायची गरज नाही आणि तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून मॅसेज खरा असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्याच आल्यास त्यांनी पुढील कार्यवाही करावी.

कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत फ्रॉड कसा केला जातो. 

  • सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मोबाईलर खोटा मॅसेज पाठवून ते कुसुम सोलर पंप योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.
  • त्यानंतर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास सोलर पंप योजनेअंतर्गत 10%  रक्कम भरायची असते आणि अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5% रक्कम भरायची असते. ही रक्कम भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी सांगितली जाते.
  • त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरण्यास संगितले जाते.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात पीएम कुसुम योजनेद्वारे तीन, पाच व साडेसात एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले गेले आहेत.  Solar Pump Yojana Fake SMS