Solar pump: “तुमची वीज नको आम्ही आमचे समर्थ आहोत” असे म्हणत, संपुर्ण गाव करतंय सोलर पंपावर शेती

Solar pump

Solar pump शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज अत्यंत महत्त्वाची असते. शेताला पाणी लावणे, वाढत्या पीकासाठी सिंचनाची सोय करणे यासाठी शेतकऱ्यांना विजेच्या पंपाने शेतीपर्यंत पाणी न्यावे लागते. परंतु राज्य शासनांतर्गत मिळणाऱ्या ग्रामिण भागातील विजपुरवठा हा तोकडा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. राज्यातील भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत असून त्यांच्या शेतीवर याचा परिणाम होत आहे. या सगळ्या परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्र राज्यातील एक गाव असे आहे जेथील गावकऱ्यांनी शासनाला असा संदेश दिला की, तुमची वीज  आम्हाला नको, आम्ही आमचे समर्थ आहोत. आणि चक्क असे म्हणत त्या गावातील सगळेच शेतकरी सोलर पंपावर शेती करीत आहेत. नक्की कोणते आहे हे गाव आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या लेखामधून

संपूर्ण शेती सोलर पंपावर करणारे कोणते आहे हे गाव?

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा तालुक्यातील बेंबळे हे गाव निसर्गरम्य गाव आहे. येथे सुर्यप्रकाशाची कोणतीच कमी नाही. या बेंबळे गावातील गावकऱ्यांची तब्बल 2600 हेक्टर बागायती शेती आहे. महावितरणच्या रोज रोजच्या कटकटीला कंटाळून गावातील काही महिला प्रतिनिधींनी मिळून सोलर पंप बसविण्याचा निर्णय घेतला. त्या सोलर पंपांच्या मदतीने उत्तम शेती होत असल्याचे पाहून गावातील इतर नागरिंकांनी देखील केंद्र शासानाच्या कुसुम सोलर पंप योजनेसारख्या योजनांचा फायदा घेत आपापल्या शेतीसाठी सोलर पंप बसवून घेतला. Solar pump in Bembale village

आज बेंबळे गावात साडेसात एच.पी. चे 11 आणि पाच एच.पी. चे 260  तसेच तीन एच. पी. चे 155 सोलर पंप आहेत. सर्वांची एकूण संख्या पाहता बेंबळे गावात एकूण 426 सोलर पंप आहत आहेत आणि आता गावातील सगळेच शेतकरी सोलर पंपाच्या माध्यमातून शेती करतात. आणि या गावाची राष्ट्रीय पातळीवर दखल देखील घेण्यात आली आहे.

बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत Solar pump in Bembale village

– माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळेना झाल्याने शेतीसाठी सोलार पंप बसविण्याची कल्पना पुढे आली. सोलार पंप बसविण्यासाठी जयवंत भोसले अग्रेसर होते. अजित जैन यासाठी सहकार्य करण्यास तयार होते. मात्र, सोलारवर मोटारी चालतील यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेना. जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटले.

महाराष्ट्र शासनांतर्गत विविध सोलर योजनेतील अधिकाऱ्यांची मदत

माढा तालुक्यातील बेंबळे गावातील शेतकऱ्यांचे विज पंपामुळे आणि भारनियमनामुळे होणारे हाल पाहता आणि त्यांची शेतीसाठीची तळमळ पाहता. काही शासकीय अधिकारी देखील मदतीला पुढे आले आणि  डॉ. भोसले यांनीही बेंबळे गावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन 100 सोलार पंप बसविण्यास  तत्काळ परवानगी दिली.

शासकीय योजना म्हटल्या की ऑनलाईन अर्ज करणे हे आलेच परंतु  काही  शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तयार नव्हते. त्यातही  5 महिला शेतकरी तयार झाल्या व शेतकरी हिस्सा भरून सोलार पंपावर बागायती शेती सुरू करण्यात आली.  2016 मध्ये चक्क सोलार पंपावर  5 महिलांची बागायत शेती यशस्वी झाल्याने आज गावात साधारण 425 सोलार पंप झाले आहेत. याशिवाय 175 शेतकऱ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. Solar pump in Bembale village

बेंबळे गावातील शेतकरी कोणकोणती पिके घेतात

शासकीय अधिकाऱ्यांममार्फत बोंबळे गावातील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे पंप बसविण्यासाठी मान्यता देण्यात याव्यात अशा यंत्रणेला सूचना दिल्या गेल्या होत्या. पण तरीही कसेबसे 5 शेतकरी तयार झाले आणि 7-8 वर्षांखाली 5 सोलार पंप बसविले गेले. याच 5  सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील  सर्वाधिक सोलार पंपावर  उत्तमरित्या शेती करणारे एकमेव गाव अशी बेंबळेची ओळख झाली आहे. Solar pump village