Call recording app: कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या!

Call recording app

Call recording app आपण एखाद्याला फोन करतो तेव्हा त्याचे बोलणे आपल्याला पुराव्याच्या रुपात जतन करायचे असल्यास अनेक ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग हा पर्याय वापरला जातो. ग्राहकांना कॉल रेकॉर्डिंगची वाढती गरज समजून अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक फोन मध्ये ऍटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंगची सोय केली होती परंतु गुगलने या बाबीवर बंदी घातली आणि आता मोबाईलमध्ये अशा पद्धतीचे कॉल रेकॉर्डिंग ॲप असणे बंद झाले आहे. त्यामुळे आपल्याला प्ले स्टअरच्या माध्यमातून call recording app डाऊनलोड करावे लागते. म्हणून हे ॲप कसे डाऊनलोड करायचे आणि त्याचे काय काय फायदे असतात हे आम्ही या लेखाच्या माध्यमातून माहितीपूर्ण पद्धतीने माडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच  गुगल ने थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप वर नेमकी बंदी का घातली आहे हे देखील आपण या लेखाच्या शेवटी पाहणार आहोत.

असे डाऊनलोड करा कॉल रेकॉर्डिंग ॲप

 • तुमच्या मोबाईलच्या Play store वर सर्च मध्ये Call recording असे टाईप करा, अनेक ऍप येतील, त्यामधील 4 स्टार असलेले एक ऍप निवडा. ते डाऊनलोड
 •  Call recording App तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा.
 • तुमच्या मोबाईलची परमिशन घेतली जाईल ती दिल्याशिवाय ॲप तुमच्या मोबाईलमध्ये सुरु होणार नाही, त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट सेक्शन वापरण्याची परवानही द्यावी लागेल.
 • तुम्ही लगेचच कॉल रेकॉर्डिंग ॲप वापरु शकता आणि तुमचे कॉल रेकॉर्ड करु शकता. Call recording app

कॉल रेकॉर्डिंगचे फायदे समजून घेऊ

       कॉल रेकॉर्डिंगचे खूप फायदे असतात काही मुद्यांच्या माध्यमातून हे फायदे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करुया.

 • न्यायलयीन मान्यताप्राप्त पुरावा

कॉल रेकॉर्डिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, दोन व्यक्तिंमध्ये झालेल्या संभाषणाचा तो एक पुरावा असतो. अशा पद्धतीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयात मान्यताप्राप्त पुराव्यांमध्ये येतात. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातूनच संबंधीत व्यक्तीला न्याय देण्यात आलेला आहे.

 • शिक्षणासाठी महत्त्वाचा दुवा

एखाद्या विषयासंदर्भात डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आपण कॉल रेकॉर्डिंगचा वापर करु शकतो. डॉक्टरेट प्रबंध सादर करताना अनेक व्यक्तिंच्या मुलाखती घ्याव्या लागतात अशावेळी एखाद्या दूरच्या व्यक्तीसोबत अभ्यासाविषयी झालेले बोलणे कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जतन करता येते आणि ते अभ्यासासाठी वापरता येते.

 • ऑफिसच्या डॉक्युमेंटेशनसाठी उपयोग

कोरोना काळानंतर बऱ्याजणांचे ऑफीस घरी भरु लागले. अजूनही अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगतात. किंवा आपण असे म्हणून शकतो की, कोरोना नंतर जास्त प्रमाणात वर्क फ्रॉम होम ची संस्कृती जास्त रुढ झाली. अशावेळी आपल्या बॉसने कामासंबंधी दिलेले इन्स्ट्रक्शन कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यामातून सेव करता येतात आणि त्यावर दिवसभर काम करता येते.

कॉल रेकॉर्डर ॲप मध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतील खालील प्रमाणे

 • Call Recorder – Cube ACR
 • Automatic Call Recorder Pro
 • Easy Voice Recorder
 • Super Call Recorder
 • RMC Android Call Recorder
 • Call Recorder
 • Call Recorder – CallsBox
 • Call Recorder Automatic
 • HD Auto Call Recorder 2022
 • Call Recorder – Lovekara
 •  Call Recorder – CallX

कॉल रेकॉर्डिंगवर गुगलने बंदी का घातली आहे?

Call Recording या ॲपवर  Google ने आत्ताच काही दिवसांपूर्वी बंदी घातली आहे.  त्यामुळे कोणीही मोबाईलमध्ये इन्स्टॉल किंवा थर्ड पार्टीचा ॲप वापर करून कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. सुरुवातीला ब्रँडेड मोबाईलमध्ये इनबिल्ड रेकॉर्डिंगचा ऑप्शन येत असे. किंवा एकदा सेटिंगमध्ये जाऊन डफॉल्ट call recording अशी सेटिंग केली की आपले सगळेच कॉल रेकॉर्ड होत असत.  परंतु कालांतराने ही सिस्टिम बंद झाली आणि आपल्या मॅन्युअली व्यक्तींचे नंबर निवडावे लागत आणि सेटिंगमध्ये त्यांची नोंदणी करावी लागे, मगच आपण त्या व्यक्तीला कॉल केला किंवा नोंदणी केलेल्या व्यक्तीचा कॉल आपल्याला आला तर तो कॉल रेकॉर्ड होतो, तसेच कॉल रोकॉर्ड होण्याआधी एक ऑडियो नोटिफिकेशन पण येते की हा कॉल रेकॉर्ड होत आहे. त्यामुळे दोन्ही कडे बोलणाऱ्या व्यक्तीला समजते की त्यांचा कॉल रेकॉर्ड होत आहे.