Solar Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र राज्यात शेती विषयक विविध प्रकल्प राबवले जातात. महाराष्ट्रातील शेतकरी जे पीक घेतात ते निर्यात देखील केले जाते. असे असताना अनेकदा लोड शेडींमुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी लावताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याना विना अडथळा वीज पुरवठा व्हावा यासाठी एका महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर अधारीत असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदाच होणार आहे. चला तर मग जाणून घेऊन की, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या तरतूदी केल्या आहेत. CM solar Krushi vahini yojana
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
Solar Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची घोषणा केली आहे. या घोषणेअंर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प solar project उभारण्यात येणार असुन त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापुर तालुक्यातील धोंदल गाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. CM solar Krushi vahini yojana
सौर ऊर्जा प्रकल्प
महाराष्ट् राज्यात डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्याने ९२०० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प पुर्णपणे कार्यान्वित केले जातील. असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी सांगितले. धोंदलगाव इथुन सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या १३ एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडुन सबंधित कंपनीला ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला, तसेच १७ रोजी वीजखरेदी करार करण्यात आला असुन त्यानंतर ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. CM solar Krushi vahini yojana
महावितरणच्या उपकेंद्राशी प्रकल्पाची जोडणी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा भाग असलेला हा प्रकल्प धोंदल गाव येथील ३३ KV उपकेंद्राशी जोडण्यात आल्यामुळे या उपकेंद्रातुन निघणाऱ्या पाच वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव अमानतपुरवाडी व संजरपुरवाडी या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. Solar Yojana Maharashtra 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार संभाळल्यावर कमीत कमी ३० टक्के कृषी फिडर्स डिसेंबर २०२५ पर्यत सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी मिशन २०२५ घोषित केले होते. त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करुन त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे.या योजनेतुन सौरऊर्जा निर्मिती क्षमतेचे ध्येय ७ हजार मेगावॅट वाढवुन १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौरऊर्जा क्षमता निर्मिती उदिष्टास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषीपंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. तसेच राज्यात ठिकठिकाणी विकेंद्रीत स्वरूपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यामुळे भविष्यात कृषी क्षेत्राला मोलाची मदत होणार आहे. Solar Yojana Maharashtra 2024
योजनेचे मुख्य संकेतस्थळ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे मुख्य संकेतस्थळाला भेट द्या.
https://www.india.gov.in/website-mukhyamantri-saur-krushi-vahini-yojana-20 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संकेतस्थळाला भेट देऊ शकता. आणि अधिक माहिती मिळवू शकता.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न
महाराष्ट्र शासन सर्वतोपरी राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपण पाहू शकू की पुढील काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा कृषी फिडर्स बसविण्यात येतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्ण वेळ वीज उपलब्ध होईल. तसेच वीजेचे दर देखील या योजनेमुळे कमी होतील. इतकेच नाही तर शेतीची इतर कामे ज्यासाठी वीजेची आवश्यकता असते ती कामे देखील उत्तम पद्धतीने शेतकऱ्यांना पूर्ण करता येतील. महाराष्ट्र राज्य शासनाचा या योजनेसाठी सर्वच शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने होणार असून राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा लवकरात लवकर लाभ घेता येणार आहे.