SSC GD Exam 2024-25: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जनरल ड्यूटी कॉन्स्टेबलची मेगाभरती जाहीर, तब्बल 39481 रिक्त पदे भरली जाणार

SSC GD notification 2024-25: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जनरल ड्यूटी कॉन्स्टेबलची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमार्फत बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एआर, एसएसएफ, एनसीबी या पदांची भरती केली जाणार आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी भरती मानली जात आहे. तरी ज्या तरुण तरुणींना या पदांसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांच्यासाठी आम्ही सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.  New recruitment 2025

कोणत्या पदासाठी किती जागा उपल्बध आहेत

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत  यंदाच्या जाहिरातीमधून 39 हजार 481 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत त्या आपण पुढील आकडेवारीप्रमाणे जाणून घेऊ. SSC GD Exam 2024-25

  • बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफच्या एकूण 13 हजार 306 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सीआरपीएफची 11 हजार 299 पदे भरली जाणार आहेत.
  • सीआयएसएफची 6 हजार 430 पदे  भरली जाणार आहेत
  • आयटीबीपी 2 हजार 564 पदे भरली जाणार आहेत.

https://www.careerpower.in/blog/wp-content/uploads/2024/09/05210003/SSC-GD-Notification-2025.pdf या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधीत पदांची जाहिरात पाहू शकता.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

आवश्यक वयोमर्यादा

अर्जदार उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण आणि कमाल 23 वर्षे वयोमर्यादा देण्यात आली आहे. राखीव प्रवर्गांसाठी काही वर्षांची सूट देण्यात येते. SSC GD Exam 2024-25

भरती प्रक्रियेचे स्वरुप

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 39 हजार 481 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एआर, एसएसएफ, एनसीबी पदे असून भरतीची प्रक्रिया पुढील  प्रमाणे असणार आहे.

  • संगणक आधारित परीक्षा- प्रथम परीक्षा ही संगणक आधारित असेल. संगणकावर ऑनलाईन पद्धतीने सेंटवर जाऊन उमेदवरांना परीक्षा देणे अनिवार्य असेल. ही या भरतीचा पहिला टप्पा असेल.
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी – प्रथम संगणक आधारित परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कायक्षमता आणि मानक चाचणी घेतली जाईल. भरती प्रक्रियेतील हा दुसरा टप्पा असेल.
  • वैद्यकीय तपासणी – शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. हा या भरती प्रक्रियेतील तिसरा टप्पा असेल.
  • कागदपत्रांची तपासणी- वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची तापसणी केली जाईल. हा या भरती प्रक्रियेतील शेवटचा टप्पा असेल. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर उमेदवारांचीन निवड केली जाईल आणि त्यांना योग्य त्या ट्रेनिंगसाठी ट्रेनिंगच्या ठिकाणी पाठविण्यात येईल. SSC GD Exam 2024-25

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://ssc.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकाल.
  • वेबसाईटवर तुमचे रजीस्ट्रेशन केलेले नसेल तर सर्वप्रथम तुमचा इमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने रजीस्ट्रेशन करा.
  • रजीस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉगीन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने बेवसाईटच्या ऍप्लिकेशन विभागात प्रवेश करा.
  • तेथे तुम्हाला बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एआर, एसएसएफ, एनसीबी यापैकी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडा आणि त्याप्रमाणे अर्ज सादर करा.
  • तुमचा फोटो आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • संपुर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि सबमीट बटणावर क्लिक करा. SSC GD Exam 2024-25

परीक्षा अर्ज दुरूस्तीची तारीख

तुम्ही भरलेला परीक्षा अर्ज चुकीच्या असल्याचे तुमच्या लक्षात आल्यात तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यात तुम्ही दिनांक  ५ सप्टेंबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 या तारखापर्यंत करु शकणार आहात. त्यानंतर तुमच्या ऑनलाईन  अर्जात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही. SSC GD Exam 2024-25

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

दिनांक 5 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर उमेदवार या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.  अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर असल्याने जास्तीत जास्त लवकर उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख दिनांक 15 ऑक्टोबर 2024 असल्याचे जाहीरातीत सांगण्यात आले आहे. संबंधीत परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2025 दरम्याने असेल. SSC GD Exam 2024-25