Studio Ghibli Free AI Image Generator: आजकाल आपल्या सोशल मीडिया फीडवर एक नवीन प्रकारची क्रांती घडताना दिसतेय आणि ती म्हणजे एआय-निर्मित कलाकृतींचा ट्रेंड! वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये तयार होणाऱ्या या कलाकृतींमध्ये एक शैली मात्र सर्वांच्या मनावर राज्य करतेय, ती म्हणजे स्टुडिओ घिब्लीच्या स्वप्नवत, जादूई जगाची आठवण करून देणारे फोटोग्राफ्स.
स्टुडिओ घिब्ली म्हणजे काय?
जर तुम्ही ‘माय नेबर टोटोरो’, ‘स्पिरिटेड अवे’, ‘हाऊल्स मूव्हिंग कॅसल’ यांसारखे जपानी ऍनिमेशन चित्रपट पाहिले असतील, तर तुम्ही त्यांची जादू नक्कीच अनुभवली असेल! ही चित्रपटं केवळ कथेनेच नाही, तर त्यांच्या विशिष्ट कलात्मक शैलीमुळेही लोकांच्या मनात घर करून राहिली आहेत. मोठ्या, भावपूर्ण डोळ्यांची पात्रं, जिवंत वाटणारी जादूई दृश्यं आणि निसर्गाचा अतिशय मोहक वापर, हे सगळं घिब्ली ऍनिमेशनला अजूनच खास बनवतं.
आता, आधी हयाओ मियाझाकींसारख्या महान ऍनिमेटर्सच्या हातून तयार होणारी ही जादू, एआयच्या मदतीने आपणही सहज तयार करू शकतो! होय, आता कोणालाही चॅटजीपीटी आणि इतर काही एआय टूल्सच्या मदतीने घिब्ली-शैलीतील कलाकृती बनवता येणार आहेत.
चॅटजीपीटी वापरून घिब्ली-शैलीतील चित्र कसे तयार करावे?
पूर्वी डिजिटल आर्ट शिकण्यासाठी महिने लागायचे, पण आता टेक्नॉलॉजीमुळे सगळं इतकं सोप्प झालंय की फक्त काही क्लिकमध्ये आपण आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवू शकतो.
जर तुम्हालाही एक घिब्ली-प्रेरित सुंदर कलाकृती तयार करायची असेल, तर खाली दिलेली स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया नक्की फॉलो करा:
- या साठी सगळ्यात आधी chat.openai.com वर जा आणि तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करा. जर तुम्ही अजून अकाऊंट क्रिएट केलं नसेल तर ते तुम्ही अगदी फ्रीमध्ये तयार करू शकता.
- लॉगिन झाल्यावर ‘नवीन चॅट’ वर क्लिक करा आणि नवीन इमेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हवा असलेला प्रॉम्प्ट द्या.
- उदाहरणार्थ: “गर्द हिरव्या टेकड्यांमध्ये एक छोटीशी झोपडी, जिच्या दाराशी एक लहानसा, गोलसर, गोंडस प्राणी टोटोरोसारखा उभा आहे.”
- “एका जादूई जंगलात उभी असलेली घिब्ली-शैलीतील सुंदर मुलगी, जिच्या केसांवर सूर्यकिरण पडलेत आणि तिच्या मोठ्या डोळ्यांत चमक आहे.” असं काही.
- त्यानंतर ‘एंटर’ दाबा आणि काही सेकंदांत तुम्हाला हवी असलेली कलाकृती तयार होईल!
- जेव्हा तुमची इमेज तयार होईल, तेव्हा त्यावर उजव्या क्लिकने ‘सेव्ह इमेज ऍज…’ निवडून ती डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
- जर तुम्हाला तुमच्या फोटो ची Ghibli स्टाईल इमेज हवी असेल तर तुम्हाला ChatGPT वर attached या ऑप्शन वर क्लिक करुन तुमचा फोटो तिथे ॲड करावा लागेल.
- हा फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला “create ghibli style image of above photo” हा प्रॉम्प्ट एंटर करावा लागेल. काही सेकंदातच तुमची Ghibli स्टाईल इमेज तुमच्यासमोर असेल.
फक्त चॅटजीपीटी नाही, तर हे मोफत पर्यायही वापरू शकता!
चॅटजीपीटीशिवाय अजूनही काही भन्नाट एआय टूल्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही स्टुडिओ घिब्ली-शैलीतील ईमेजेस तयार करू शकता:
- Gemini किंवा मिडजर्नी (Midjourney): हे एक खूप प्रसिद्ध टूल आहे जे तुम्ही दिलेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टप्रमाणे चित्र निर्माण करतं.
- नाईटकॅफे एआय (NightCafe AI): या वेबसाइटवर अगदी सोप्या पद्धतीने सुंदर डिजिटल आर्ट तयार करता येते.
- स्टेबल डिफ्यूजन (Stable Diffusion): ओपन-सोर्स टूल जे अगदी फ्री आहे आणि प्रॉम्प्टनुसार हाय-क्वालिटी चित्र तयार करतं.
पूर्वी डिजिटल आर्ट शिकण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत घालवावी लागायची. पण आता तंत्रज्ञानामुळे कोणत्याही कलात्मक पार्श्वभूमीशिवाय आपण स्वतःच्या हाताने आपल्याला हवी तशी कलाकृती तयार करू शकतो. घिब्ली-शैलीतील चित्र काढणं हे आता केवळ मोठ मोठ्या ॲनिमेटर्स पुरतं मर्यादित राहिलेलं नसून आता ते तुम्ही सुद्धा करू शकणार आहात.