Subsidy On Solar Panels: सोलार पंप बसविण्यासाठी सबसिडी कशी मिळवायची? जाणून घ्या किती येईल खर्च

Subsidy On Solar Panels देशात शेतकऱ्यांना शेतीसाठी पावसावर अवलंबून तर रहावेच लागते आणि त्यासोबतच पावसाचे पाणी साठवून ठेवल्यानंतर देखील शेतकऱ्यांना ग्रीडच्या विजेवर अवलंबून रहावे लागते. ही वीज अनेकदा शहरी भागातील उद्योगधंद्यांनी विजपुरवठा व्हावा म्हणून लोड शेडिंगमुळे बंद असते त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पंपाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करता येत नाही. आणि याच कारणाने उत्पादन देखील घटत आहे.  म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांना सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना. या योजनेच्या माध्यमातून सबसिडी कशी मिळवायची आणि त्याला किती खर्च येईल या संदर्भात आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत.

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना 2024

भारत सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणे सोपे आणि सोयीस्कर व्हावे यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना सुरु केली आहे. 19 फेब्रुवारी 2019 पासून शासनाने ही योजना सुरु केली आहे.  या योजनेमार्फत शोतकऱ्यांना सोलार पंपावरून सिंचन सुविधा मिळवायची असेल तर सोलार पंप सहज आणि कमी खर्चात मिळविणे शक्य झाले आहे.  फक्त प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत  भारत सरकारकडून अनुदान दिले जात असले तरी,  5 ते 10 टक्के रक्कम ही लाभार्थ्याला खर्च करावी लागते. Subsidy On Solar Panels

सोलर पंप बसविण्यासाठी किती अनुदान मिळते?

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना ही 2019 पासून सुरु करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी सोलार पंप बसविलेले आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना विविध क्षमतेचे सोलार सिस्टिम बसविण्यासाठी कमी पैसे मिळत असत परंतु आता शासनाने ही रक्कम वाढवली आहे आणि शेतकऱ्यांना जास्त रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. चला तर मग पाहू की आधी किती अनुदान मिळत असे आणि आता किती अनुदान मिळत आहे.

 • 1KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 14588/- रुपये अनुदान दिले जात असे परंतु आता 18000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 2KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 29176/- रुपये अनुदान दिले जात असे आता 36000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 3KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 43764/- रुपये अनुदान दिले जात असे आता  54000/- रु. इतके अनुदान दिले जाते.
 • 4KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 51058/- रु. अनुदान दिले जात असे आता 63000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 5KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 58352/- रु. अनुदान दिले जात असे आता 72000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 6KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 65642/- रु.अनुदान दिले जात असे आता 81000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 7KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 72940/- रु, . अनुदान दिले जात असे आता 90000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 8KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 80234/- रु. अनुदान दिले जात असे आता 99000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 9KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 87528     Rs 108000/- इतके अनुदान दिले जाते.
 • 10KW क्षमतेचा सोलार पंप बसविण्यासाठी आधी 94822/- रु. . अनुदान दिले जात असे आता 117000/- इतके अनुदान दिले जाते. Subsidy On Solar Panels

पीएम कुसुम सोलार योजनेची अंतिम मुदत

पीएम कुसुम  सोलार योजनेची मुदत भारत सरकारच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नापीक, पडीक आणि लागवडीयोग्य जमिनींव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना कुरणात आणि पाणथळ जमिनीवरही सौर ऊर्जा प्रकल्प बसवता येणार आहेत.

पीएम कुसुम सोलार योजना 2024 पात्र ठरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड, पॅन कार्ड
 •  नोंदणीची प्रत
 •  बँक खात्याचा तपशील
 • जमिनीची कागदपत्रे
 • सातबारा उतारा, उतारा 8अ
 • अर्जदाराचा मोबाईल नंबर Subsidy On Solar Panels

पीएम कुसुम सोलार योजनेसाठी असा करा अर्ज

 • प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचे लाभार्थी होण्यासाठी सर्वप्रथम शासनातच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  pmkusum.mnre.gov.in या लिंकवर क्लिककरुन तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
 • वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुमच्या नावाने लॉग इन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढे अर्ज करता येणार नाही.
 • लॉगीन केल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय तुम्हाला समोर दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये  अर्जदार शेतकऱ्याने सर्व माहिती भरा आणि तुमची स्वाक्षरी  आणि तुमचा फोटो अपलोड करा.
 • सर्व भरलेली माहिती बरोबर आहे का एकदा तपासून सबमीट करा. योजने संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमचा फॉर्म तपासून 30 दिवसांत तुम्हाला त्यासंबंधीत माहिती दिली जाईल. Subsidy On Solar Panels