Marriage Certificate online registration: मित्रांनो आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला कोणतेही कागदपत्र अगदी सहज रित्या उपलब्ध होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऑनलाइन प्रक्रियेची ओळख करून देणार आहोत.
मित्रांनो लग्नानंतर जवळजवळ प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. लग्नानंतर नावापासून ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांपर्यंत अनेक गोष्टी बदलून जातात. सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे विवाहाचे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र काढून घेण्याचे इतर अनेक फायदे देखील मिळतात. पण तुम्ही हे विवाह प्रमाणपत्र कसे मिळवाल? यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत? ऑनलाइन प्रक्रिया काय आहे? चला तर मग आमच्या या लेखात याबाबत जाणून घ्या सविस्तर… Marriage Certificate online registration
आवश्यक कागदपत्रे | Important Documents
Marriage Certificate online registration
वधू आणि वर यांच्या वयाचा नोंदणी पुरावा
- TC (शाळा सोडल्याचा दाखला) / जन्माचा दाखला
- 10/12 वी चे सर्टिफिकेट
- ड्रायव्हिंग लायसन्स
खालीलपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे:
- वधू आणि वरांचे पासपोर्ट फोटो – तारखेसह
- वधू आणि वराचा लग्नाचा फोटोतीन साक्षीदार, तिन्ही साक्षीदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो – तारखेसह
- • वधू, वर आणि साक्षीदार यांचा वाहा आधीचा रहिवासी पुरावा
- • आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- लाईट बिल/टेलिफोन बिल
- सरकारी आयडी
- वाहन नोंदणीपत्र
- पासपोर्ट
- रेशन कार्ड
- डोमेसाईल प्रमाणपत्र इ. पैकी एकाचे झेरॉक्स.
- मेन विवाह पत्रिका (नसल्यास, 100/- रुपयांच्या नोटराइज्ड बाँडवर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र).
जर या आधी विवाहाची नोंदणी कुठेही झाली नसेल तर रु 100/- च्या नोटराइज्ड बाँड पेपर वर प्रतिज्ञापत्र. - अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती.
- वधू आणि वरासाठी विशिष्ट स्वरूपात प्रतिज्ञापत्र
- वधू आणि वर विधवा/विधुर असल्यास जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र.
फी – 100 ते 200 रुपये
विवाह प्रमाणपत्र नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करा | Apply Online For Marriage Certificate
- यासाठी तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- पुढील वेबपेजवर तुमचा जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा. मग तुमच्या पतीचे पूर्ण नाव टाका आणि मग तुमचे लग्न कुठे आणि कोणत्या तारखेला झाले याबद्दलची माहिती टाका.
- नंतर तुमच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक बरोबर टाका. त्यानंतर पत्नीचे पूर्ण नाव आणि तुमच्या पत्नीचा आधार कार्ड क्रमांक योग्य रीतीने टाका.
- Marriage certificate online registration, या पेजवरील माहिती योग्य रित्या भरल्यानंतर, “सबमिट” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक प्राप्त होईल. पुढील वेबपेजवर तुम्हाला वैयक्तिक डेटासह कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- येथे तुम्हाला दिलेल्या संबंधित माहितीनुसार पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल.
- या अपलोड केलेल्या पासपोर्ट फोटोचा आकार 5KB ते 20KB दरम्यान असावा.
- (20KB पेक्षा मोठे पासपोर्ट फोटो विवाह प्रमाणपत्र अर्जांसाठी स्वीकारले जाणार नाहीत आणि तुम्ही पुढील पेज वर जाऊ शकणार नाहीत.)
- तुम्हाला दोघं नवरा, नवरी चे फोटो अपलोड करावे लागणार आहेत. पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर, “अपलोड डॉक्युमेंट” वर क्लिक करा.
- यानंतर पेमेंट पेजवर जा. इथे तुम्हाला विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली फी भरावी लागेल. तुम्ही एटीएम, upi किंवा नेट बँकिंगद्वारे हे पेमेंट करू शकणार आहात.
- पेमेंट केल्यानंतर दोन ते पाच दिवसांनी तुम्हाला APLE SARKAR पोर्टलला भेट द्यावी लागेल. जर तुम्ही योग्य रीतीने अर्ज भरला असेल, तर तुम्हाला वेबसाइटवर विवाह प्रमाणपत्र दिसून येईल. तिथून तुम्हाला हे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
- त्यांनतर तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइलची कलर प्रिंट काढा. | Marriage Certificate online registration