Success story: ड्रॅगन फ्रूट लागवडीतून शेतकऱ्याने केली कमाल, एकरात 7 ते 8 लाखांची झाली कमाई

Success story आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी शेतपिकांच्या बाबत विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत. अनेक शेतकरी गुगलच्या माध्यमातून माहिती मिळवून शेतात विविध पिके घेत आहेत. पिकांसंदर्भात विविध प्रयोग करीत आहेत. बरेचदा ज्या  शेतकऱ्यांकडे कमी जमीन असते त्या शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की त्यांनी शेतात कोणते पीक घ्यावे. त्यामुळे त्यांना असे पीक निवडावे लागते जे कमी जागेत जास्त उत्पन्न देईल. असाच विचार करुन एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची शेती करुन वर्षाला तब्बल 7 ते 8 लाखाची कमाई केली आहे. चला तर मग पाहूया या यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा

प्रयोगशिल बाळासाहेब लांडगे

दहेगाव बोलका या गावचे रहिवासी असलेले शेतकरी बाळासाहेब लांडगे  यांच्याकडे फक्त एक एकर आठ गुंठे इतकीत शेत जमीन आहे. या शेत जमिनीत ते मका, ऊस, सोयाबीन यासारखी पारंपरिक पिके न घेता यावेळी एक प्रयोग करायचा विचार केला आणि तो प्रयोग यशस्वी देखील झाला. तो म्हणजे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीता प्रयोग. बाबासाहेब लांडगे यांच्या गावाजवळून गोदावरी नदीचा कलवा गेला आहे. परंतु या कालव्याचे पाणी बारमाही नसते. त्यामुळे ते कोरडवाहू पिके घेत होते. परंतु पारंपरिक शेतीचा मार्ग सोडून आहे त्या जमिनीत काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासाने लांडगे यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तसा क्रांतीकारीच होता. कारण बाजारात या फळाला चांगली मागणी असली तरी ते चिन या देशाचे फळ आहे. अनेकांना वाटते की ते तिकडेच पिकवले जाऊ शकते. परंतु एखाद्या शेतकऱ्याने ठरवले तर तो काय करु शकत नाही हे सिद्ध करुन दाखवणाऱ्या दहेगावच्या बाळासाहेब लांडगे यांच्या यशाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. Success story of Dragon fruit farming 

ड्रॅगन फ्रूटची शेती करताना ‘रेड रेड’ जातीच्या रोपांची निवड

बाबासाहेब लांडगे या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट शेतीचा संपूर्ण अभ्यास करुनच ही शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कारण त्यांनी निवड केलेले रोप देखील सर्वोत्तम जातीचे आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठी लांडगे यांनी रेड रेड जातीच्या रोपांची निवड केली आहे. ही रोपे  त्यांना कोलकत्ता येथून मागवली. सुरुवातीला त्यांनी 10 गुंठे जमिनीमध्ये 8 फूट बाय 10 फूट या रोपांची लागवड केल्याचे बाबासाहेब लांडगे सांगतात. हा एक ड्रॅगन फ्रूट शेतीतील प्रयोग होता. त्यात त्यांना उत्तम यश मिळाले आणि मगच त्यांनी आठ गुंठे जमिनीत शेततळे तयार केले. ज्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला बारमाही पाणी देणे शक्य झाले. पाण्याच्या नियोजनाने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत योग्य ते यश मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला 8 बाय 10 फूटमध्ये केलेला प्रयोगा सफल झाल्यानंतर त्यांनी एका एकरात ही रेड रेड जातीची रोपे लावण्यास सुरुवात केली. शेततळ्याचे पाणी होतेच. या नियोजबद्ध कामामुळेच त्यांना आजच ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत यश मिळाले आहे. Success story of Dragon fruit farming 

खत व्यवस्थापन करण्याची पद्धत

बाबासाहेब लांडगे या शेतकऱ्याने त्यांच्या 10 गुंठ्यामध्ये ड्रॅगन फ्रूट या चिनी फळाची लागवड केली. ही शेती आता एक एकरावर बहरली आहे. या संपूर्ण शेतासाठी त्यांना वर्षाला 4 ते 5 ट्रॉली शेणखत आणि सेंद्रिय कंपोस्ट खत लागते. रासायनिक खतांचा वापत ते ड्रॅगन फ्रूट शेतीत करत नाहीत. त्यामुळे येणारे फळ चांगले येत नाही असे त्यांचे मत आहे. नियमित वेळेवर ड्रॅगन फ्रूटच्या बागेची छाटणी करुन घेतात. इतकेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी शेडनेटचा वापर सुरु केला आहे. Success story of Dragon fruit farming 

लांडगे यांना किती उत्पन्न मिळाले?

ड्रॅगन फ्रूटची शेती करणाऱ्या लांडगे यांना दरवर्षी एका एकरात सरासरी 10 ते 11 टन ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न मिळते. त्यांनी शेतात पिकवलेल्या ड्रॅगन फ्रूटचा आकार आणि गुणवत्तेनुसार प्रति किलो 80 ते 200 रुपयांपर्यंत बाजारात भाव मिळतो. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रॅगन शेती करणारे शेतकरी लांडगे  थेट बांधावरच त्यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूट विक्री करतात. कधी कधी तर ते ड्रॅगन फ्रूट नाशिकच्या बाजारात पाठवले जाते. त्यातून ते वार्षिक 8 ते 10 लाखाचे उत्पन्न मिळवतात. पिकासाठी केलेला खर्च वजा करुन त्यांना 7 ते 8 लाखाचा निव्वळ नफा दरवर्षी होतो. इतकेच नाही तर ड्रॅगनची छाटणी केलेल्या फांद्यांमधून लागवड करण्यासारख्या रोपांची निर्मिती करुन लांडगे हे 15 ते 20 रुप दराने ती रोपे विकतात. त्यातूनही त्यांना चांगली कमाई होत असते.  Success story of Dragon fruit farming