t20 world cup 2024 schedule वर्ल्डकप म्हटले की सर्व क्रिकेटप्रेमींचे कान टवकारले जातात. आत्ताच IPL ची चित्तथरारक मॅच झाली आणि सर्वच क्रिकेटप्रेमींनी त्याचा आनंद देखील घेतला. तोच आनंद कायम ठेवत आता काहीच दिवसात t20 world cup 2024 सामने सुरु होणार आहेत. आत्ताच्या IPL मधील भारतीय खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहिला तर t20 वर्ल्ड कप चा प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहता येईल. हे t20 वर्ल्ड कपचे सामने केव्हा सुरु होणार आहेत? त्यामध्ये भारताचे सामने कोणत्या तारखेला आणि कोणासोबत असणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या आपल्या या लेखात पाहणार आहोत. तसेच लेखाच्या शेवटी यावर्षीत्या t20 वर्ल्ड कपचे पूर्ण वेळापत्रक देखील आम्ही देत आहोत.
कोणत्या देशात होणार आहेत t20 वर्ल्ड कप सामने?
यावर्षी जून 2024 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकपचे सामन होणार आहेत. आयसीसी ने आयोजित केलेल्या हे सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेतील स्टेडिअमवर होणार आहेत. या दोन देशांमधील फ्लोरीडा, न्यूयॉर्क, बारबाडोस, गुयाना, एंटीगुआ, डलास, त्रिनिदाद, सेंच लूसिया, सेंट विंसेंट या शहरांमध्ये यावर्षीच्या t20 वर्ल्ड कप सामने खेळले जाणार आहेत. वेस्टइंडीज आणि यूएसए या दोन देशांमधील एकूण 9 मैदानावर हे t20 वर्ल्ड कप 2024 चे सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने होणार असून पहिला सामना यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. t20 world cup 2024 schedule
भारतीय संघाचे सामने असे असतील
- 5 जून या दिवशी भारत – आयर्लंड सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे
- 9 जून या दिवशी भारत – पाकिस्तान सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे
- 12 जून या दिवशी भारत – अमेरिका सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे
- 15 जून या दिवशी भारत – कॅनडा सामना फ्लोरीडा येथे होणार आहे
भारताच्या या चार सामन्यांपैकी पाकिस्तान विरुद्ध असलेला 9 जून 2024 रोजीचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी भारत पाकिस्तान या दोनेही संघाचे एकमेकांविरुद्धचे सामने पाहणे ही एक मेजवानीच असते. t20 world cup 2024 schedule
उपांत्य फेरी कधी असेल?
दरवर्षीच्या t20 वर्ल्ड कप मधील सर्वात महत्त्वाचा सामना असतो तो म्हणजे उपांत्य फेरीचा. यावर्षी उपांत्य फेरीचे सामना 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत आणि सर्वात मत्त्वाचे म्हणजे अंतिम सामना ज्याला आपण फिनाले असे म्हणजो तो सामना 29 जून रोजी Barbados (वेस्ट इंडीज )येथे होणार आहे. त्यामुळे तुम्ही टिव्हीवर जरी हा सामना बघणार असाल तरी हा दिवस तुमच्या शेड्यूलमधून राखून ठेवा. कारण नक्कीच यावर्षी भारतीय क्रिकेट प्रेमींना वाटते तसे आपला भारत t20 वर्ल्ड कप फिनाले मध्ये नक्की असेल.
टि-ट्वेंटी वर्ल्डकप 2024 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
- 1 जून 2024 यूएसए विरुद्ध कनाडा (डलास)
- 2 जून 2024 वेस्ट इंडीज़ विरुद्ध पापुआ न्यू गिनी (गुयाना)
- 2 जून 2024 नामीबिया विरुद्ध ओमान बारबाडोस
- 3 जून 2024 श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका (न्यूयॉर्क)
- 3 जून 2024 अफगानिस्तान विरुद्ध युगांडा (गुयाना)
- 4 जून 2024 इंग्लैंड विरुद्ध स्कॉटलैंड (बारबाडोस)
- 4 जून 2024 नीदरलैंड विरुद्ध नेपाल (डलास)
- 5 जून 2024 भारत विरुद्ध आयरलैंड (न्यूयॉर्क)
- 5 जून 2024 पापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडा (गुयाना)
- 5 जून 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान (बारबाडोस)
- 6 जून 2024 यूएसए विरुद्ध पाकिस्तान (डलास)
- 6 जून 2024 नामीबिया विरुद्ध स्कॉटलैंड (बारबाडोस)
- 7 जून 2024 कनाडा विरुद्ध आयरलैंड (न्यूयॉर्क)
- 7 जून 2024 न्यूजीलैंड विरुद्ध अफगानिस्तान (गुयाना)
- 7 जून 2024 श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (डलास)
- 8 जून 2024 नीदरलैंड विरुद्ध दक्षिण अफ्रीका (न्यूयॉर्क)
- 8 जून 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लैंड (बारबाडोस)
- 8 जून 2024 वेस्ट इंडीज़ विरुद्ध युगांडा (गुयाना)
- 9 जून 2024 भारत विरुद्ध पाकिस्तान (न्यूयॉर्क)
- 9 जून 2024 ओमान विरुद्ध स्कॉटलैंड (एंटीगुआ)
- 10 जून 2024 दक्षिण अफ्रीका विरुद्ध बांग्लादेश (न्यूयॉर्क)
- 11 जून 2024 पाकिस्तान विरुद्ध कनाडा (न्यूयॉर्क)
- 11 जून 2024 श्रीलंका विरुद्ध नेपाल (फ्लोरिडा)
- 11 जून 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामीबिया (एंटीगुआ)
- 12 जून 2024 अमेरिका विरुद्ध भारत (न्यूयॉर्क)
- 12 जून 2024 वेस्ट इंडीज़ विरुद्ध न्यूज़ीलैंड (त्रिनिदाद)
- 13 जून 2024 इंग्लैंड विरुद्ध ओमान (एंटीगुआ)
- 13 जून 2024 बांग्लादेश विरुद्ध नीदरलैंड (सेंट विंसेंट)
- 13 जून 2024 अफगानिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी (त्रिनिदाद)
- 14 जून 2024 यूएसए विरुद्ध आयरलैंड (फ्लोरिडा)
- 14 जून 2024 दक्षिण अफ्रीका विरुद्ध नेपाल (सेंट विंसेंट)
- 14 जून 2024 न्यूज़ीलैंड विरुद्ध युगांडा (त्रिनिदाद)
- 15 जून 2024 भारत विरुद्ध कनाडा (फ्लोरिडा)
- 15 जून 2024 नामीबिया विरुद्ध इंग्लैंड (एंटीगुआ)
- 15 जून 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलैंड (सेंट लूसिया)
- 16 जून 2024 पाकिस्तान विरुद्ध आयरलैंड (फ्लोरिडा)
- 16 जून 2024 बांग्लादेश विरुद्ध नेपाल (सेंट विंसेंट)
- 16 जून 2024 श्रीलंका विरुद्ध नीदरलैंड (सेंट लूसिया)
- 17 जून 2024 न्यूज़ीलैंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (त्रिनिदाद)
- 17 जून 2024 वेस्ट इंडीज विरुद्ध अफगानिस्तान (सेंट लूसिया)
- 19 जून 2024 A2 विरुद्ध D1 (एंटीगुआ)
- 19 जून 2024 B1 विरुद्ध C2 (सेंट लूसिया)
- 20 जून 2024 C1 विरुद्ध A1 (बारबाडोस)
- 20 जून 2024 B2 विरुद्ध D2 (एंटीगुआ)
- 21 जून 2024 B1 विरुद्ध D1 (सेंट लूसिया)
- 21 जून 2024 A2 विरुद्ध C2 (बारबाडोस)
- 22 जून 2024 A1 विरुद्ध D2 (एंटीगुआ)
- 22 जून 2024 C1 विरुद्ध B2 (सेंट विंसेंट)
- 23 जून 2024 A2 विरुद्ध B1 (बारबाडोस)
- 23 जून 2024 C2 विरुद्ध D1 (एंटीगुआ)
- 24 जून 2024 B2 विरुद्ध A1 (सेंट लूसिया)
- 24 जून 2024 C1 विरुद्ध D2 (सेंट विंसेंट)
- 26 जून 2024 सेमी फाइनल-1 (गुयाना)
- 27 जून 2024 सेमी फाइनल-2 (त्रिनिदाद)
- 29 जून 2024 फाइनल (बारबाडोस)