Vehicle Driving Documents रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांच्या काही जबाबदाऱ्या असतात. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच वाहन चालकाकडे महत्त्वाचे काही कागदपत्रे असणे अनिवार्य असते. आणि महत्त्वाचे कागदपत्रे नसतील आणि टॅफिक हवालदारांनी विचारल्यास ही महत्त्वाची कागदपत्रे वाहनचालकाकडे नसतील तर त्या चालकाला 15000 पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. वाहनचालकाकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक असते आणि ती कागदपत्रे नसतील तर कोणत्या कारणासाठी किती दंड लागतो हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
चालक परवाना- driving licence
वाहन कायदा 1988 नुसार केंद्रिय मोटर नियम 1989 नुसार प्रत्येक वाहन चालविणाऱ्या व्यक्तिकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना देखील वाहन परवाना विचारण्यात येतो. Vehicle Driving Documents
वाहन चालकाचे ओळखपत्र – ident card
आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड ही महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जातात. वाहन चालकाची ओळख पटण्यासाठी ही ओळखपत्रे अत्यंत महत्त्वाचे असतात.
वाहन नोंदणी प्रमाणपत्र- vehicle registration certificate
वाहन खरेदी केल्यानंतर वाहन मालकाच्या नावावर वाहनाची नोंद केली जाते. यामुळे ट्रॅफिक इन्स्पेक्टरला समजते की कोणते वाहन कोणाच्या नावावर आहे. RC बुकमध्ये वाहन नोंदणी क्रमांक, वाहन मालकाचा पत्ता, वाहन उत्पादनाचे वर्ष, नोंदणीची तारीख, चेसिस क्रमांक या सर्व बाबी असतात. त्यामुळे RC बुक म्हणजेच registration certificate हा देखील वाहन चालवताना अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र ठरतो. Vehicle Driving Documents
गाडीचा विमा – vehicle insurance
सन 1988 च्या मोटर वाहन कायद्याप्रमाणे वाहन भारतीय रस्त्यांवर चलविण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे अनिवार्य झाले आहे. हा विमा अपघात प्रकरणी कामी येतो. एखाद्या वाहनामुळे तिसऱ्याच व्यक्तीचा अपघात झाल्यास त्या व्यक्तीला गाडीचा विमा असेल तर अपघात उपचारासाठी पैसे मिळतात. Vehicle Driving Documents
प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र – PUC certificate
पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या प्रत्येक वाहनातून कार्बन उत्सर्जन होत असते. परंतु कार्बन उत्सर्जनाची पुष्टी करणारे कागदपत्रं म्हणजे PUC प्रमाणपत्र प्रत्येक वाहन चालकाकडे असणे अनिवार्य असते. ते नसेल तर मात्र 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. Vehicle Driving Documents
वाहतुकीचे नियम अधिक कठोर
2024 वर्षामध्ये अपघातांचे वाढते प्रमाण पाहता वाहतुकीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. आणि त्यामध्ये आधीपेक्षा जास्त दंड आकारला जात आहे. Vehicle Driving Documents
क्र. | वाहतुक नियमांचा भंग | जुने दंड (रु.) | नवीन दंड (रु.) |
१ | रस्ते नियमांचा भंग | 100 | 500 |
२ | प्रशासनाचा आदेशभंग | 500 | 2000 |
३ | परवाना नसलेले वाहन चालवणे | 500 | 5000 |
४ | पात्र नसताना वाहन चालवणे | 500 | 10000 |
५ | वेगमर्यादा तोडणे | 400 | 2000 |
६ | धोकादायक वाहन चालवणे | 1000 | 5000 |
७ | दारु पिऊन वाहन चालवणे | 2000 | 10000 |
८ | विनापरवाना वाहन चालवणे | 5000 | 10000 |
९ | सीटबेल्ट न लावणे | 100 | 1000 |
१० | दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास | 100 | 2000 |
११ | दुचाकीवर हॅल्मेट न घातल्यास | 100 | 500 |
१२ | विमा नसताना वाहन चालवणे | 1000 | 2000 |
१३ | अल्पवयीन मुला मुलींमकडून गुना – पालक दोषी | – | 25000 व 3 वर्षे तुरुंगवास |
भरधाव वाहने चालवल्याने आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे रस्तांवर अपघातांची प्रकरणे वाढत आहेत. म्हणून शासनाने वाहतुकीचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध ठिकाणी ट्रॅफिक सग्नलची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या सर्व गोष्टी असताना वाहनचालकाकडे वरती सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर तो देखील एक गुन्हा मानला जातो आणि वाहन चालकावर दंड लावला जातो. Vehicle Driving Documents