Tadpatri anudan yojana 2024: ताडपत्री अनुदान योजना2024, आजच अर्ज करा आणि पावसाळ्यात चिंतामुक्त व्हा!

suryoday solar rooftop scheme 2024 सौर ऊर्जेचा वापर भारतात वाढावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबविण्याचे जाहिर केले आहे. ग्रीडच्या माध्यमातून घरोघरी मिळणाऱ्या विजेवर नागरिकांना अवलंबून राहू नये आणि जास्तीत जास्त सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढावा यासाठी देखील भारत सरकार विविध योजना राबवित आहे. घरा घरात या सौर ऊर्जेचा वापर देखील होऊ लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री सुर्योदय योजना.

काय आहे प्रधानमंत्री सुर्योदय योजना?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरात 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्याचा देखील निश्चय केला आहे. या योजनेचा लाभ अल्प-मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घेता येणार आहे. लाभार्थी नागरिकांच्या घरांच्या छतावर बसविण्यात येणारे हे पॅनेल सूर्यप्रकाशात चार्ज होतील आणि लोकांच्या घरात वीज पुरविली जाईल. यामुळे ग्रीडच्या विजेची मागणी आरोआप कमी होण्यास मदत होईल. suryoday solar rooftop scheme 2024

कोणाला मिळणार प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचा लाभ?

प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचा लाभ केवळ भारताच्या नागरिकांना घेता येणार आहे. तसेच अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील  नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

योजनेचे लाभार्थी ठरण्यासाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.
 • अर्जदार आरक्षित असल्यास त्याच्याकडे प्रमाणपत्र असावे.
 • अर्जदार कोणत्याही सरकारी नोकरीचा लाक्षार्थी नसावा. suryoday solar rooftop scheme 2024

योजनेचा लाभार्थी ठरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरात सौर पॅनेल बसविण्यासाठी अर्जदराकडे खालील कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे.

 • आधार कार्ड, रेशन कार्ड
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • वीज बिल
 • बँक तपशील
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

असा करा अर्ज

 • प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय या विभागाच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. तुम्ही https://www.pmsuryaghar.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
 • प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तेथे सांगितल्या प्रमाणे तुम्ही PM Surya Ghar Muft Bijali Yojana या पर्यायावर क्लिक करा.
 • तेथे विचारल्याप्रमाणे तुमची माहिती आणि तुमच्या आधीच्या बीलाचा ग्राहक क्रमांक देखील जोडणे आवश्यक आहे.
 • तुमची इतर माहिती म्हणजे फोन नंबर, इमेल आयडी आणि राज्य, जिल्हा तसेच तुमच्या घराचा पत्ता ही सर्व माहिती योग्य त्या रकान्यात भरा.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या भागात उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत सौर ऊर्जा पॅनल विक्रेत्यांची यादी सरकारकडून दिली जाईल.
 • भारत सरकारमार्फत अधिकृत विक्रेता यादीतील विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पाठविण्यात येईल.
 •  डिस्कॉमच्या माध्यमातून सोलर पॅनल बसविण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. suryoday solar rooftop scheme 2024

प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचे फायदे

 • भारत सरकारमार्फत रावबिण्यात येणाऱ्या पंतप्रधान सुर्योदय योजनेच्या माध्यमातून पुढील 25 वर्षांसाठी प्रतिदिन 8 रुपये या दराने वीज वापरता येणार आहे.
 • सरकराच्या अधिकृत वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे 3Kw क्षमतेच्या प्लांटसाठी प्रकल्पाची किंमत सुमारे 1.26 लाख रुपये असून त्यापैकी भारत सरकार 54 हजार रुपये अनुदान जेत आहे. याचा अर्थ  हा  सौर ऊर्जा प्रकल्प  उभारण्यासाठी नागरिकांना फक्त 72 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.  
 • ग्रीडच्या विजेवर अवलंबून रहावे लागणार नाही.
 • या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसविल्यानंतर घरातील सर्वच उपकरणे नागरिक या सौरऊर्जेवर वापरू शकणार आहेत. म्हणजे त्यांना ही वीज मोफतच मिळाल्यासारखे आहे. suryoday solar rooftop scheme 2024