Tata Power Solar Dealership: आज अनेक तरुणांकडे काम करण्याची उत्तम क्षमता असूनही त्यांना घरी बेरोजगार म्हणून बसावे लागत आहे. अनेक तरुण असे आहेत ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे असूनही त्यांना व्यवसायाची योग्य दिशा सापडत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी असा एक पर्याय घेऊन आलो आहोत जो तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकेल. तो व्यवसाय म्हणजे टाटा पावर सोलर डीलरशिपचा. या सोलर कंपनीची डीलरशिप घेऊन तुम्ही तुमच्या भागातील ग्राहकांना योग्य दरात विक्री केल्यास दरमहा तुम्ही उत्तम नफा कमऊ शकता. चला तर मग विविध मुद्द्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की हा व्यवसाय नेमका करायचा कसा!
टाटा सोलर पॅनल ची डीलरशिप का घ्यायची ते समजून घेऊ Tata Solar Power
भारतातील टाटा हा नंबर सर्वात पहिल्या क्रमांकाचा ब्राँड आहे आणि तितकाच विश्वासू देखील आहे. अनेक ग्राहकांचा त्यावर विश्वास आहे. भारताच्या जीडीपीमध्ये टाटा कंपनीचे 5.6 टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे. इतकेच काय 100 हून जास्त देशांमध्ये टाटा च्या कंपन्या आहेत त्यामुळे तुम्ही टाटा सोलर पैनल डीलरशिप घेऊन टाटा सोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही योग्य मार्गी आहात. मग ही डिलरशिप कशी घ्यायची याची माहिती आता आपण जाणून घेऊया. Tata Power Solar Dealership
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी किती जागेची आवश्यकता आहे?
टाटा पॉवर सोलर डिलरशिप घेतालाना तुम्हाला जागेची आवश्यकता असणार आहे. किमान शॉपसाठी तुम्हाला 200 ते 250 स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता असेल. गोडाऊनसाठी 550 ते 800 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता लागेल, सांगायचेच झाले तर तुम्हाला किमान 1000 ते 1300 स्क्वेअर फुट इतकी जागा लागेल.
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावे लागेल.
टाटा पावर सोलर डीलरशिपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 15 ते 20 लाखांच्या गुंतवणूकीची आवश्यकता असते. ज्याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- डिस्ट्रीब्यूटर शिप
- स्टोरेज व गोडाऊन खर्च
- शॉप खर्च
- डीलरशिप साठी कर्मचारी
- इतर चार्जेस लॅपटॉप गाडी व लाईट
वरील दिलेले यादीनुसार जर शॉप किंवा गोडाऊन साठी जर जागा तुमची असेल तर तो खर्च वगळून बाकीची इन्वेस्टमेंट तुम्हाला करणे गरजेचे असते Tata Power Solar Dealership
टाटा पॉवर सोलर डीलरशिप घेताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
टाटा पावर सोलर डीलरशिप घेताना तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. डीलरशिपसाठी अर्ज करताना म्हणजेच ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करुन सबमीट करावी लागतात.
- आधारकार्ड, पॅनकार्ड
- रेशनकार्ड
- बँक पासबुक
- मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
- पत्त्याचा पुरावा
- अर्जदार आरक्षणपात्र असल्यास जात प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- पोलीस पडताळणी चारित्र्य प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे 5 फोटो
अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी वरील सर्व कागदपत्र जवळ बाळगावी जेणेकरून अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण अर्जदारांना येणार नाही.
टाटा सोलर डीलरशिप घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
टाटा पॉवर सोलर डीलरशिप घेण्यासाठी तुम्ही https://www.tatapowersolar.com/ लिंक वर ती जाऊन तुम्ही संपूर्ण फॉर्म भरु शकता. विचारलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित भरा. योग्य ती कागदपत्रे सबमीट करा. त्यानंतर तुम्हाला टाटा कंपनीकडून कॉल येईल व तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल आणि डिलरशिप संबंधी पुढील प्रोसेस करण्यासाठी सांगितले जाईल. Tata Power Solar Dealership
या पद्धतीने तुम्ही तुमचा टाटा कंपनीसोबतचा व्यवसाय सुरु करु शकता. बरेचदा स्टार्टअप इंडियाकडून व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल देखील पुरवले जाऊ शकते. म्हणजे तुमच्या किमान 20 लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता नसेल तर तुम्ही तुमचा प्लॅन तयार करुन स्टार्टअप इंडिया या वेबसाईटवर सबमीट करु शकता, त्यांचे अधिकारी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचा टाटा कंपनीसोबतच्या डिलरशिपच्या व्यवसायाचा प्लॅन पास झाला तर तुम्हाला आर्थिक मदत देखील केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक नसेल तरी गुंतवणूक मिळवून हा व्यवसाय सुरु करु शकता. Tata Power Solar Dealership