Thane Police Bharti 2024: ठाणे पोलिस विभागांतर्गत भरती, 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Thane Police Bharti 2024: तुमचे जर का पोलीसात नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर आम्ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.  ठाणे पोलीस विभागांतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 686 पदांसाठी ही जाहीरात देण्यात आली आहे.  संबंधीत अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.  दोन पदांसाठी भरती जाहीर झाली असल्याने पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  यावेळी ठाणे पोलीस विभागांतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशा दोन विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 12 वी उत्तीर्ण देखील या भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत.

मग तुम्ही देखील 12 वी उत्तीर्ण असाल तर ही संधी गमावू नका. आजच भरतीसाठी अर्ज दाखल करा. आणि पोलीसात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण करा. Thane Police Bharti 2024

किती जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे

ठाणे पोलीस विभागांतर्गत तब्बल 686 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 666 जागा आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी 20 जागा भरण्यात येणार आहेत.  जास्तीत जास्त तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.  उमेदवारांची भरती झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण ठाणे हे असणार आहे. ठाणे विभागांतर्गत ग्रामिण आणि शहरी या दोन्ही ठिकाणी कुठेही निवड केलेल्या उमेदवारास नोकरीची संधी दिली जाऊ शकते. Thane Police Bharti 2024

ठाणे पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

ठाणे पोलीस भरतीअंतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या दोन प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत. तर त्यांची एकच शैक्षणिक आर्हता आहे ती म्हणजे उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच जे उमेदवार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. Thane Police Bharti 2024

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्जदाराची आवश्यक वयोमर्यादा

ठाणे पोलीस भरती अंतर्गत दोन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी विविध वयोमर्यादा आहे ती आपण पुढे जाणून घेऊ.

  • पोलीस शिपाई – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय- 18 ते 28 वर्षे; तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे असावे.
  • पोलीस शिपाई चालक – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय – 19 ते 28 वर्षे; तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय – 19 ते 33 वर्षे असावे.

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल?

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्ज करताना उमेदवार  खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला 450 रुपये शुल्क भरावे लागेल आणि उमेदवार जर  मागास प्रवर्गासाठी  असेल तर त्याला 350 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. Thane Police Bharti 2024

ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक –

  • ठाणे पोलीस भरती अंतर्गत तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करुन अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
  • या वेबासाईटला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम वेबसाईटवर लॉगीन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडा.
  • त्यासाठी तुमचे नाव, पत्ता, शिक्षण सर्व माहिती भरा
  • तुमची कागदपत्रे सोबत जोडणे किंवा अपलोड करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर परीक्षा शुल्क भरा.
  • संपूर्ण माहिती बरोबर असल्याचे तपासून सबमीट बटणावर क्लिक करा.

उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी असेल?

ठाणे पालीस भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया ही शासनाच्या ठरलेल्या पद्धतीनुसारच असणार आहे. ती पुढील प्रमाणे

  • सर्वप्रथम लेखी परीक्षा
  • लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी
  • उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय चाचणीद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वरील पद्धतीने निवड होणार असून शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी तयारी असणे आवश्यक असल्याचे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. Thane Police Bharti 2024

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतीम तारीख

ठाणे पोलीस भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतीम तारीख ही 31 मार्च 2024 असल्याने आता अगदी काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. पोलीस खात्यात नोकरी करण्याची ही संधी 12 उत्तीर्णांनी गमावू नये. Thane Police Bharti 2024