Truecaller New Feature: आता स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! ट्रुकॉलरमध्ये हे आहे नवीन AI फीचर

Truecaller New Feature: आपण ज्या तांत्रिक जगात वावरतो आहोत तेथे सध्या Artificial intolerance म्हणजेच AI ला अत्यंत महत्त्व आहे. कारण कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य करु शकतो. हेच वैशिष्ट्याचा वापर करुन  Truecaller या ऍपने ग्राहकांसाठी नवी सेवा आणली आहे. या सेवेचा कसा वापर करायचा हे आम्ही आजच्या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

स्पॅम कॉल्सपासून सुटका होणार

आपल्याला दिवसभरात अनेक विविध जाहिरातींचे मॅसेज आणि कॉल्स येत असतात. ते कॉल्स दुर्लक्षित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स करीत असतो. कधी कधी या स्पॅम कॉल्समुळे फ्रॉड देखील होतात. मग हे चुकीचे कॉल्सचा त्रास संपवण्यासाठी आता AI टेक्नॉलॉजीची ची मदत घेण्यात येणार आहे. आता Truecaller या ऍपमध्ये AI च्या मदतीने या स्पॅम कॉल्स कसे बंद करायचे त्याबद्दल नवे तंत्रज्ञान बनविण्या तआले आहे. स्पॅम कॉल्समुळे ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता Truecaller या ऍपने हे नवे तंत्राज्ञान वापरात आणले आहे. त्यामुळे ग्राहकांची  स्पॅम कॉल्सपासून सुटका होऊ शकणार आहे. मग हे फीचर नेमकं कसे काम करेल? या संबंधित अधिक माहिती पण पुढे जाणून घेऊयात. Truecaller New Feature  

Truecaller मध्ये कोणते आहे AI नवीन वैशिष्ट्य

खरंतर, Truecaller ने त्याच्या प्रीमियम यूजर्ससाठी एक नवीन मॅक्स प्रोटेक्शन(Max Protection) लेव्हल फीचर लाँच केले आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) म्हणजेच AI टेक्नॉलॉजी वापरून Unproved Contacts चे सर्व कॉल ब्लॉक करतात. ग्राहकांना कॉल करणारी व्यक्ती ट्रूकॉलरच्या डेटाबेसमध्ये नसली तरीही हे ॲप त्याचा कॉल ब्लॉक करेल आणि यूजर्सना स्पॅम कॉलच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकेल. Truecaller या ऍपमध्ये सध्या सामान्य ग्राहकांसाठी म्हणजे जे मोफत हे ऍप वापरतात त्यांच्यासाठी पुरेसे सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये केवळ तेच स्पॅम कॉल्स ब्लॉक केले जातात  जे  मोबाईल नंबर Truecaller च्या डेटाबेसमध्ये आधिच उपलब्ध आहेत. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक ऍडव्हान्स सेवा  Truecaller च्या माध्यमातून मिळवायची असेल तर तुम्हाला या Max level Protection ऍक्टिवेट करावे लागले आणि त्यासाठी काही पैसे देखील मोजावे लागणार आहेत. Max level Protection मोबाईलमध्ये ऍक्टिवेट कसे करायचे ते पुढे पाहू.  Truecaller New Feature 

Truecaller Max Protection हे ऍप वापरा पुढील पद्धतीने?

  • तुमच्या मोबाईल मधील play store मधून Truecaller चे नवीन फीचर अपडेट v13.58 करा.
  • AI अंतर्भूत नवीन फीचर वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचे Truecaller ॲप अपडेट करावं लागेल.
  • आता Truecaller ॲप ओपन करा आणि वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स आयकॉनवर क्लिक करा.
  • आता setting  पर्यायावर जा आणि Block ऑप्शन सिलेक्ट करा.
  • आता MAX लेव्हलच्या नवीन प्रोटेक्शन लेव्हलचं ऑप्शन सिलेक्ट करा. 
  • शेवटी हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या प्लॅनला सबस्क्रायब करा. Truecaller New Feature
  • हा प्लॅन सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला Max level Protection  हे Truecaller चे वैशिष्टय वापरता येणार नाही. त्यासंबंधीत संपूर्ण माहिती पुढिल प्रमाणे.

केवळ प्रमियम ग्राहक मिळवू शकतील AIयुक्त नवी सेवा

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, Truecaller या कंपनीने फक्त आणि फक्त प्रिमियम ग्राहकांसाठीच ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला देखील या सेवेचा उपभोग घ्यायचा असेल तर तुम्ही ट्रूकॉलरचे Truecaller Subscription प्लॅन अॅक्टिवेट करु शकता.  अजून एक गोष्ट, लक्षात ठेवण्यासाठी आहे ती म्हणजे हे  Truecaller चे नवीन Max level Protection  केवळ Android यूजर्ससाठी उपलब्ध आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे  Apple TrueCaller सारख्या Caller ID या सुविधांसाठी स्पॅमर्सना ब्लॉक करण्याची कोणतीही परवानगी देत ​​नाही. त्यामुळे Android व्यतिरिक्त इतर फोन्सचे वापरकर्ते ही सेवा उपभोगू शकणार नाही. Truecaller New Feature