Tips for buying a plot: जमीन खरेदी करताय? या गोष्टींची काळजी घ्या नाहीतर होईल नुकसान!

Buy Property Guide Articles बरेचदा काही लोक कोणतीही पडताळणी न करता जमीन खरेदी करतात आणि कालांतराने आर्थिक नुकसान तर होतेच परंतू मानसिक त्रास देखील सहन करावा लागतो. तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आधी हा लेख पूर्ण वाचा. यामध्ये आम्ही जमीन खरेदी करण्याच्या आधी कोणकोणती काळजी घ्यावी, Things to ensure when buying land कोणकोणती कागदपत्रे तपासावी याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. Buy Property Guide Articles

तुम्ही खरेदी केलेल्या जमीनीपर्यंत रस्ता आहे का ते तपासा

ग्रामिण भागात जमीन विकत घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी करीत असलेल्या जमीनीपर्यंत सार्वजनिक रस्ता जातो का हे तपासा. कारण जर का तुमच्या जमिनीपर्यंत जाणारा रस्ता नसेल तर जमीन खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी ज्या व्यक्तीच्या जमिनीतून तुमच्या जागेपर्यंत रस्ता जात आहे त्या व्यक्तीला तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील. हा जास्तीचा आर्थिक भार टाळण्यासाठी सुरुवातीलाच खबरदारी घ्या. Buy Property Guide Articles

जमिनीचा सातबारा आणि फेरफार तपासा

तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात त्या जमिनीचा सातबारा उतारा आणि फेरफार तपासा. त्यामध्ये जमीन आधी कोणाच्या नावावर होती त्या जमीनीबद्दलचा संपूर्ण इतिहास सातबारा उताऱ्यामध्ये तुम्ही तपासू शकता. Things to ensure when buying land

भूधारणा पद्धत तपासा

जमिनीचा सातबारा तपासताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की, भोगवाटदार वर्ग 1 किंवा भोगवाटदार वर्ग 2 यापैकी कोणतातरी एक पर्याय सातबारा उताऱ्यामध्ये दिसेल. जर का तुम्ही खरेदी करीत असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये भोगवाटादार वर्ग 2 आहे तर त्या जमीनीची सरकारच्या परवानगी शिवाय विक्री करता येणार नाही. तुकडा बंदी कायद्यांतर्गत किंवा अशा जमीनी ग्रामिण मंदिरांना, भूमिहिन शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या असतात. या जमिनी चुकून जरी खरेदी केल्या तरी खरेदी दारावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा त्याची एक किंमत मोजावी लागू शकते. Tips for buying a plot

जमीन सामायिक असेल विक्रेत्यां व्यतिरिक्त व्यक्तींचे ना हरकत घ्या.

बरेचदा खरेदी दाराला जमीन ज्या प्रमाणात हवी तशी मिळते, किंवा हायवेला लागून किंवा बाजारपेठेला लागून असते परंतु अनेकदा विक्रेत्या व्यक्ती व्यतिरिक्त ती जमीन इतर कुटुंबियांमध्ये सामायिक असते. अशावेळी सामायिक असलेल्या व्यक्तींचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवा आणि मगच संपूर्ण आर्थिक व्यवहार करा. सामायिक असलेल्या व्यक्तींचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसेल तर कोणत्याही परिस्थितीत जमिनीचा आर्थिक व्यवहार पूर्ण करु नये. कारण जमीन खरेदी केल्या नंतर आणि आर्थिक व्यवहार पूर्ण केल्यानंतर विक्रीदार बाजूला होतात आणि जमिनीत सामायिक असलेले त्याचे नातेवाईक समोर येतात आणि पैशांची मागणी करु लागतात. अशावेळी जमीन खरेदी करणाऱ्याला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. Tips for buying a plot

खरेदी खत

वरील सर्व खबरदारी घेऊन जमीन खरेदी केल्यानंतर आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कागदपत्रांची पूर्तता करा. त्यानंतर तुम्हाला तुम्ही खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदी खत मिळेल. त्यामध्ये तुमचे नाव असेल. तेव्हाच ती जमीन तुमच्या नावावर झाले असे समजता येईल. खरेदी खत हा जमीन मालकी सिद्ध करणारा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही निबंधकाकडून तयार करुन घेतलेल्या खरेदी खतामध्ये महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या असतात.  जमिनीचा गट क्रमांक, मूळ मालकाचे नाव, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, चतुःसीमा, क्षेत्र तपासणी या सर्व अत्यंत महत्त्वाच्या आणि त्या जमिनीशी संबंधीत गोष्टींची माहिती खरेदी खतामध्ये देण्यात असते. Tips for buying a plot

अशा पद्धतीने जमीन खरेदी करताना तुमची कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी संपूर्ण अभ्यास करुन हा लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लेख आवडला तर कमेंट करायला विसरु नका. आणि अशा विषयांचे माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या. Tips for buying a plot