Tractor subsidy scheme Maharashtra 2025: शेतकऱ्याच्या आयुष्यातलं खरं सुख म्हणजे शेतीसाठी योग्य साधनं असणं. मात्र यंत्रसामग्रीची किंमत पाहता अनेक गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसारखी गरजेची साधनं खरेदी करणं जमत नाही आणि त्यांचं हे स्वप्न केवळ स्वप्नच राहून जातं. पण आता मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य सरकारच्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल ५०% पर्यंत अनुदान (Tractor subsidy for small farmers) देण्यात येणार आहे.
सुमारे २०४ कोटी रुपयांच्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेस नुकतीच केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. योजनेत केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के हिस्सा असेल. म्हणजेच केंद्र सरकार १२२.४८ कोटी रुपये तर राज्य सरकार ८१.६५ कोटी रुपये योजनेसाठी खर्च करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी आणि अल्पभूधारकांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार आहे.
महाडीबीटी (mahadbt.maharashtra.gov.in) या पोर्टलवरून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या योजनेतून अनुसूचित जाती, जमातीच्या महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या एकूण किंमतीच्या ५०% रक्कम किंवा १.२५ लाख रुपये (जे कमी असेल ते) अनुदान मिळणार आहे. तर सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४०% किंवा १ लाख रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे.
या योजनेचा (Mahadbt tractor yojana 2025) लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.४० हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. याशिवाय, मागील ५ वर्षांमधे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून घेतलेलं नसावं. यासोबतच शेतकऱ्यांना अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र आणि ट्रॅक्टर खरेदीचं कोटेशन ही कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत.
या योजनेसाठी मंजूर केलेल्या निधीचा वापर पुढीलप्रमाणे होणार आहे, सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १६४.२३ कोटी रुपये, अनुसूचित जातीसाठी २२.२७ कोटी, तर अनुसूचित जमातीसाठी १७.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतीसाठी ट्रॅक्टर असणं म्हणजे फक्त सोय नव्हे, तर यामुळे प्रत्येक दिवसाच्या श्रमाला दिलासा मिळतो. या योजनेमुळे गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आता आधुनिक शेतीकडे वाटचाल करता येणार आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि किफायतशीर होणार आहे.
जर आपणही या योजनेच्या पात्रतेत बसत असाल, तर वेळ वाया घालवू नका. आजच mahadbt पोर्टलवर जाऊन अर्ज भरा, कारण निधी मर्यादित आहे आणि लाभ मिळवण्याची संधी लवकरच संपेल.
शेतकऱ्यांचं शेतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध असण्याचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहिलं नाही, ते आता सत्यात उतरायला सुरूवात झाली आहे. सरकारचा (Central government subsidy for tractor purchase) हा निर्णय खरंच शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणणारा ठरेल. अशाच उपयोगी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नक्की भेट द्या.