Deloitte Internship 2025: कॉलेज संपवून बाहेर पडल्यानंतर नोकरी किंवा इंटर्नशिप मिळवणं हे खरंतर सोपं काम नाही. अनेक जण महिने महिने अर्ज करत राहतात, अपॉइंटमेंटसाठी वाट पाहतात आणि तरीही त्यांना अपेक्षेप्रमाणे संधी मिळत नाही. त्यात जर सुरुवातीलाच पगारही कमी असेल तर अनेकांच्या मनात निराशा निर्माण होते. पण अशाच काळात जर एखादी मोठी कंपनी थेट तुमच्यासाठी उंबरठ्यावर संधी घेऊन आली, तर? होय, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देणारी ही सुवर्णसंधी डेलॉइट इंडिया (Deloitte India) कडून देण्यात येत आहे!
डेलॉइटने नुकतेच त्यांच्या २०२५ सालच्या इंटर्नशिप प्रोग्रामची (Deloitte India Internship) घोषणा केली आहे आणि विशेष म्हणजे, या इंटर्नशिपमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा तब्बल ३०,००० रुपयांचे Stipend दिले जाणार आहे. केवळ शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी नाही, तर आर्थिकदृष्ट्याही ही एक अत्यंत फायदेशीर संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही सध्या शिक्षणाच्या अंतिम टप्प्यावर असाल आणि भविष्यात मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.
डेलॉइट इंटर्नशिप प्रोग्रामची संपूर्ण माहिती
डेलॉइटच्या या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये संगणक विज्ञान (Computer Science), माहिती तंत्रज्ञान (IT) किंवा तत्सम तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. इंटर्नशिपचा कालावधी सुमारे २ ते ६ महिन्यांचा असणार आहे. आणि ही संधी केवळ गोष्टी शिकण्याचा अनुभव देणार नाही, तर प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव देणारी सशुल्क अशी इंटर्नशिपची संधी आहे.
या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थी थेट क्लायंट प्रोजेक्ट्सवर काम करतील. त्यांना डेलॉइट युनिव्हर्सिटीच्या ऑनलाइन शिक्षण साधनांचा मुक्त वापर करता येईल. तसंच, विद्यार्थ्यांना अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे कॉर्पोरेट वर्क कल्चर समजून घेणं आणि भविष्यातील त्यांचा स्वतःचा मार्ग निश्चित करणं खूपच सोपं होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला एक समर्पित Mentor दिला जाईल, जो संपूर्ण इंटर्नशिपदरम्यान त्यांना मदत करेल.
या इंटर्नशिपमध्ये मिळणारे फायदे
या इंटर्नशिपच्या (Deloitte Careers) माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने उद्योग जगतातल्या तंत्रज्ञानाचा थेट अनुभव मिळणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष क्लायंट मिटिंगमध्ये सहभागी होऊ शकता, रिअल-टाइम प्रोजेक्ट्सवर काम करू शकता आणि तुमचे टेक्निकल आणि कम्युनिकेशन कौशल्य अधिक मजबूत करू शकता.
इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. विशेष म्हणजे, जर तुमचं काम उत्कृष्ट राहिलं तर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट Deloitte मध्ये नोकरी करण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे अनेकांसाठी ही केवळ इंटर्नशिप नाही, तर भविष्यातील उज्वल करिअरचा दार उघडणारी पहिली पायरी ठरणार आहे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे? | How to apply Deloitte Internship.
डेलॉइटच्या या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला Deloitte India च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे. तसेच, तुम्ही पूर्वी केलेले प्रकल्प (Projects), तांत्रिक कौशल्ये (Technical Skills) आणि जर हॅकाथॉन, टेक क्लब्स किंवा कोडिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असेल, तर त्या गोष्टीही तुम्हाला त्या ठिकाणी नमूद कराव्या लागतील.
Deloitte फक्त तुमच्या तांत्रिक कौशल्याकडेच नाही, तर तुमच्या शिकण्याच्या इच्छेला आणि उपक्रमशीलतेलाही प्राधान्य देते. त्यामुळे अर्ज करताना तुमचं प्रोफाइल जितकं जास्त आकर्षक असेल, तितकी जास्त तुम्हाला इंटर्नशिप ची ही संधी मिळण्याची शक्यता वाढते.
डेलॉइटसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कंपनीत काम करण्याचा अनुभव तुमच्या संपूर्ण करिअरचा पाया मजबूत करू शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे योग्य पात्रता आहे, आत्मविश्वास आहे आणि शिकण्याची जिद्द आहे, तर अजिबात वेळ न घालवता या संधीचा फायदा घ्या. तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल, मोठ्या कंपनीत पाय रोवायचे असतील तर ही संधी सोडू नका. आजच अर्ज करा आणि तुमच्या यशस्वी भवितव्याची सुरुवात Deloitte सारख्या प्रतिष्ठित संस्थेबरोबर करा!