Voter ID Card Mobile Number Link 2024: आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी मतदार ओळखपत्र हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मतदान करण्यासाठी आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु, आजच्या डिजिटल युगात तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक करणे आणखी महत्त्वाचे झाले आहे, कारण त्याद्वारेच तुम्ही मतदार ओळखपत्राची सर्व माहिती सहज ऑनलाइन अपडेट करू शकणार आहात. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरबसल्या मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी कसा लिंक करावा? यासोबतच त्याचे महत्त्व सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत.
मोबाईल नंबर लिंक करण्याचे महत्त्व
कधी कधी आपले मतदार ओळखपत्र हरवते किंवा खराब होते, आणि त्यावेळी ते ऑनलाइन डाउनलोड करून ठेवणे आपल्यासाठी आवश्यक असते. मात्र, हे डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी जोडलेला असणे गरजेचे आहे. हा मोबाईल नंबर तुमच्या EPIC क्रमांकाशी जोडला असल्यास तुम्ही मतदार ओळखपत्र सहजपणे पुन्हा मिळवू शकता. त्यामुळे मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळपत्राशी लिंक करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. Voter ID Card Mobile Number Link 2024
तुमचा मोबाईल नंबर लिंक केला आहे का?
अनेक लोकांची अशी समस्या असते की, त्यांचे मतदार ओळखपत्र कुठेतरी हरवते आणि त्यांनतर त्यांना कोणता मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केला आहे हे आठवत नाही. तसेच, अनेकांचे मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी लिंक केलेले नसतात. अशा परिस्थितीत, मोबाईल नंबर लिंक न केल्यास भविष्यात याबाबत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी कसा लिंक करावा?
मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी लिंक करणे आता फारच सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करता येते. येथे या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सहजपणे मतदार ओळखपत्राशी लिंक करू शकणार आहात.
Voter ID Card Mobile Number Link करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
यासाठी सर्वप्रथम, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल पत्ता आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर आधी स्वतःची नोंदणी करा.
नोंदणीसाठी तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आणि कॅप्चा कोड द्या. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
हा OTP तिथे प्रविष्ट करा आणि नंतर तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राशी मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी “फॉर्म 8” भरावा लागेल.
फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून तो फॉर्म सबमिट करा.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक 48 तासांच्या आत तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला जातो. तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र सहजपणे तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक करू शकता.
मोबाईल नंबर लिंक करणे का महत्त्वाचे आहे?
तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला असताना, जरी तुमचे मतदार ओळखपत्र हरवले तरी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तुमचा मोबाइल नंबर लिंक केला असल्यामुळे तुम्ही मतदार ओळखपत्र अगदी सहज पुन्हा एकदा प्राप्त करू शकता. यासोबतच, मतदार यादीतील माहिती अपडेट करणे, आणि त्यात काही बदल करणे सुद्धा यामुळे अधिक सोपे होते. Voter ID Card Mobile Number Link 2024