Weather Alert on Mobile वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वादळामुळे अनेकांची घरे, शेती आणि झाडांची नासधुस होते. परंतु वादळ येणार आहे हे आधिच समजल्यास काही अंशी आपले होणारे नुकसान वाचवता येते आणि सावध राहता येते. त्यामुळे किमान जिवित हानी तरी टाळता येते. आता तुमच्या हातातील मोबाईलवर वादळी अलर्ट मिळवणे सोपे झाले आहे. मग हे हवामानेच अलर्ट कसे मिळवायचे तर त्याची एक सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये करावी लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे होणारे नुकसान तुम्हाला टाळता यावे यासाठीच हा आजचा लेख आणि घेऊन आलो आहोत.
तुमच्या हातातील फोनवर मिळेल हवामान अलर्ट
वादळी वाऱ्याचे अलर्ट जर तुम्हाला तुमच्या फोनवर हवे असतील तर यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड आणि iPhone मध्ये एक सेटिंग इनेबल करावी लागेल. ही सेटिंग ऑन केल्यावर तुम्हाला वादळ येण्यापूर्वीच एक अलर्ट मिळेल. यासाठी तुम्हाला दुसरे कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज नसते. तुमच्या हातातील स्मार्टफोन्समध्येच ही सुविधा तुम्हाला देण्यात आलेली असते. तुमच्या फोनमधील एक सेटिंग enable केल्यानंतर Notificationच्या माध्यामातून हवामान Alert दिला जातो. वादळी वाऱ्यांचा अलर्ट मिळाल्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. तुमच्या मोबाईलमधील हे फीचर नेमकं कसं वापरायचं हे माहित नसेल तर पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे, चला पाहूया. Weather Alert on Mobile
Android फोनमध्ये अलर्ट मिळविण्यासाठी पुढील सेटिंग करा
तुमचा फोन Android प्रकारातील असेल आणि तुम्हाला हवामानाचे अलर्ट येत नसतील तर तुम्ही पुढे दिलेली सेटिंग करुन घ्या म्हणजे तुम्हाला हवामानाचे सर्व अलर्ट मिळतील आणि वादळ कधी होणार किंवा जास्ता पाऊस कधी पडणार हे देखील समजू शकेल.
- सर्वप्रथम तुमच्या Android मोबाईलमधील सेटिंग अॅप ओपन करा.
- सेटिंगमध्ये गेल्यानंतर Wireless Emergency Alerts असे शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर emergency notifications मध्ये related topic या पर्यायावर क्लिक करा.
- Enable alert करण्यासाठी समोर असलेला स्विच टॉगल करा.
- तसेच तुम्ही तुमच्या मोबाईलमधील मेसेज मध्ये Wireless Emergency Alerts ऑन करून देखील हवामाचे नोटिफिकेशन्स मिळवू शकता. फक्त त्यासाठी सुद्धा तुम्हाला मेसेज सेटिंगमध्ये जाऊन योग्य ती प्रोसेस करावी लागणार आहे.
- येथे सांगितल्याप्रमाणे सेटिंग नसेल तर आम्ही सांगू इच्छितो की, प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये सेटिंग वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. परंतु वरती दिलेले पर्याय जरुर असतील त्यांवर क्लिक करुन तुम्ही Weather Alert मिळवू शकता.
iOS फोनमध्ये सेटिंग अशी ऑन करा
तुमचा फोन iOS प्रकारचा म्हणजच Mac किंवा Apple चा असेल तर पुढील प्रमाणे सेटिंग करुन तुम्ही हवामानासंबंधीत नोटिफिकेशन्स मिळवू शकता. तसेच वादळी वाऱ्यांपासून सतर्क देखील राहू शकता.
- तुमच्या मोबाईलमध्ये आधिच हवामान सांगणारे ऍप असेल. ते प्रत्येक फोनमध्ये असते. ते तुम्ही हाईड केलेले असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येणार नाहीत.
- सर्वप्रथम तुमच्या फोनमधील weather app ओपन करा. त्यामध्ये खालच्या बाजूला उजवीकडे लिस्ट आयकॉनवर क्लिक करा.
- त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
- त्यानंतर नोटिफिकेशन बटनवर टॅप करा.
- Severe weather च्या समोर आलेला स्विच टॉगल करा.
जर तुमच्या मोबाईलमध्ये अनेक लोकेशन सेव्ह असतील तर तुम्हाला वेदर अॅपला एखाद्या ठराविक लोकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल. असं केल्यास फोनवरच हवामानासंबंधी अलर्ट असलेले नोटिफिकेशन्स मिळायला सुरुवात होईल. Weather Alert on Mobile
Weather Alert चे फायदे
भारतीत तंत्रज्ञान विविध माध्यमातून विकसित होत आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जिवित हानी रोखण्यासाठी करणे हे शासनाचे काम आहे. नासा या भारतीय अंतराळ संशोधन विभागामार्फत दरवर्षी उपग्रह अंतराळात पाठवले जातात. हे याच कामासाठी असतात. त्यामुळे आपल्याला हवामानाची इत्यंभूत माहिती मिळते आणि शासनाकडून ही माहिती नागरिकांना दिली जाते. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे हे Weather Alert मोबाईलवर मिळवून नागरिक वादळ, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचू शकतात. Weather Alert on Mobile