Western Railway Apprentice Bharti 2024: मुंबई पश्चिम रेल्वेत भरती सुरु; 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी! 5066 पदांवर भरती…

Western Railway Apprentice Bharti 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचं बघायला मिळत आहे. तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही अतिशय योग्य संधी आहे. पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत तब्बल 5066 प्रशिक्षणार्थी पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती प्रक्रिया अनेकांच रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्नं पूर्ण करू शकते. त्यामुळे सगळ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे हे लक्षात ठेवावी. या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. भरती प्रक्रिया कशी आहे, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा हे आता आपण या लेखात सविस्तरपणे पाहूया. Western Railway Apprentice Bharti 2024

पदाचे नाव | Western Railway Apprentice Bharti 2024 Post Name

या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. रेल्वेच्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

पदसंख्या | Post Numbers

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5066 रिक्त पदं उपलब्ध आहेत, यामुळे सगळ्याच इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत आपला सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता | Western Railway Apprentice Bharti 2024 Eligibility Criteria

जर तुम्ही 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असाल आणि ITI-NCVT/SCVT या क्षेत्रांमध्ये आवश्यक शिक्षण पूर्ण केलं असेल, तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. अशा प्रकारे, उमेदवारांनी या भरतीसाठी योग्य ती सगळी कागदपत्रं तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करावा.

ITI अंतर्गत पुढील शैक्षणिक पात्रता अवश्य तपासा:

फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, कारपेंटर, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटार वाहन), प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर, फॉरगर आणि हीट ट्रीटर, मेकॅनिक (इलेक्ट्रिकल पॉवर ड्राइव्ह्स).

अर्ज शुल्क | Application Fees

सामान्य/OBC उमेदवारांसाठी: ₹100

SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी: शुल्क नाही.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून, या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ऑक्टोबर 22, 2024 ही आहे आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही महत्त्वाची तारीख लक्षात ठेवून वेळेत अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्ज प्रक्रिया | Application Process

अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि ऑनलाईन पद्धतीने या भरतीचा अर्ज भरून आपला सहभाग नोंदवावा. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

अधिकृत वेबसाईट

https://www.rrc-wr.com/?AspxAutoDetectCookieSupport=1